सध्याच्या digital age मध्ये, आमच्याकडे संपत्ती आहे, गाडी-बंगले आहेत, position/ power आहे.
परंतु हे सर्व असूनसुद्धा आज थोडा विचार केला तर असे दिसते, की आमच्या जीवनातील शांती, समाधान आणि आनंद हरवला आहे. आमचे जीवन हे tension / stress यांनी दुःखमय झाले आहे. 24 तास mobile फोन communication साठी असूनसुद्धा मी एकटा आहे... दररोज पेपर मधील बातम्या वाचल्यानंतर असे लक्षात येते, की "Man is rational animal" या वाक्यातील rational हा शब्द जाऊन, माणूस हा पशुसमान होतो आहे का ? अशी भीती वाटायला लागली आहे....
जर आम्हाला आमचे जीवन आनंदी करायचे असेल, तर त्यासाठी आनंद कोठे आहे याचा शोध घेतला पाहिजे... याच समाजात राहून, इथेच सर्व प्रसंगातून जात असताना, तीच tension / stress असताना, मी कसा आनंदी राहू शकेन याचे उत्तर मला भगवतगीतेमध्ये मिळू शकते. हीच भगवतगीता मराठी भाषेत आणून, त्यावर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून माउलींनी आमच्यावर उपकार केले आहेत.
या ज्ञानेश्वरी ग्रंथांचा अभ्यास करणे आणि तो उपदेश आमच्या जीवनात आचरणात आणणे आणि जीवनात आनंद, सुख आणि समाधान प्राप्त करून घेणे हा उद्देश या अभ्यास वर्गाचा आहे....
४ फेब्रुवारी २०१७ रोजी माउलींच्या आशीर्वादाने आम्ही हा उपक्रम चालू केला - "ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग"
ज्ञानेश्वरी यथार्थ समजून घेण्याच्या दृष्टीने, अध्ययन करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण दर शनिवारी/रविवारी सकाळी एकत्र येतो. बंगलोर सारख्या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वरी अध्ययनाचे स्वप्न पूर्ण होतेय हे आमचे भाग्यच आहे. आमच्या विनंतीला मान देऊन श्रीमती विजयाताई श्रीकांत सबनीस आणि सध्या श्री. विवेक सबनीस निरुपण करायला तयार झाले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
करोना महामारीमुळे आणि lockdown मुळे ऑफलाइन अभ्यास वर्ग खंडित झाला होता.
परंतु ३ मे २०२० पासून अभ्यास वर्ग ONLINE SKYPE वर चालू झाला. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या साधकांना अभ्यास वर्ग त्यांच्या घरून जॉइन करता आले.
३० जानेवारी २०२२ रोजी सहा महीने चालू असलेला अठरावा अध्याय समाप्त झाला. त्याबरोबरच ज्ञानेश्वरीची सांगता झाली. गेले ५ वर्ष चालू असलेला गीता / ज्ञानेश्वरी ज्ञानयज्ञ संपन्न झाला.
तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा.
dnyaneshwaripravachane@gmail.comCell: 9880002099
ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग
बंगलोर
फारच उत्तम उपक्रम. आपण सर्वांनी एकत्र येऊन बंगलोर मध्ये हा सत्संग आणि सुंदर उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. माऊलींचे आशीर्वाद आपणा सर्वांच्या पाठीशी असतीलच.
ReplyDeleteहरी ओम.
Dhanyawad AjitJi
Delete