भगवतगीतेची महती

२४ नोव्हेंबर  २०१८ रोजी ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गासाठी श्री. बाठे काका यांचे खूप छान निरुपण  झाले. भगवतगीता हा काकांचा आवडता विषय. काकांच्या शब्दात सांगायचे तर गीतेचा एक श्लोक घ्यावा आणि त्यात डुंबून जावे. एक श्लोकाचे चिंतन आयुष्यभर केले तरी पुरे होईल. भगवतगीतेची महती त्यांनी त्यांच्या स्वाध्यायातूनही सांगितली. ह्या निरुपणात पहिले सहा अध्यायाबद्दल त्यांनी आपल्या सहज आणि ओघवत्या वाणीने विवेचन केले आहे.

त्यांचे निरुपण  ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099