चातुर्मास साधना 2020

 यावर्षी कोरोना संकटामध्ये "चातुर्मास साधना" याअंतर्गत परमेश्वराने आपल्याकडून वेगवेगळ्या साधना करून घेतल्या. खरंतर फारसे planning नसताना, आपण सर्वांनी आणि नातेवाईकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

आषाढात मानस वारी/ दिंडी-2020 आणि श्रीज्ञानेश्वरी पारायण, श्रावणात गीता अध्याय 12 - भक्तियोग स्वाध्याय महिना, भाद्रपदात बाप्पाचे श्रीअथर्वशीर्ष अनुष्ठानपुरुषोत्तम मासामध्ये श्रीविष्णूसहस्त्रनाम अनुष्ठान आणि नामदिवस असे भरगच्च उपक्रम झाले. शेवटी अश्विन महिन्यात नामस्मरण, श्रीसूक्त पठण आणि श्रीसमर्थ यांची प्रस्थानत्रयी - "दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्मराम" यांचे वाचन असे साधनेचे तीन track चालू होते. 

सर्वं summary खालील table मध्ये दिली आहे. साधक संख्या, आवर्तन संख्या खरोखरंच उल्लेखनीय आहे.


आपल्या साधनेचा भाग म्हणून आषाढामध्ये ती. विजया सबनीस यांनी श्रीविष्णूसहस्त्रनाम यावर दोन महिने 10 sessions घेऊन भगवंताविषयी गोडी वाढवली. 

श्रीविष्णूसहस्त्रनाम निरूपणे ऐकण्यासाठी इथे क्लिक करा

श्रावणात भक्तियोगावर अमित/ प्राची ब्रह्मे, धनश्री कुलकर्णी, अस्मिता ओक, डॉ. स्वाती आणि डॉ. सुनील देशपांडे, गायत्री गलगलीकर,  अर्चना खानझोडे, मंजिरी सबनीस आणि गोठखिंडीकर यांनी चिंतनपर अनेक दिवसांची सदरे चालवली. एकूण 44 जणांचे स्वाध्याय अभ्यासपूर्ण झाले.

हे सर्व स्वाध्याय वाचण्यासाठी / ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

गेल्या दोन महिन्यात डॉ. रहाळकर, पुणे यांनी  श्रीविष्णूसहस्त्रनाम भावार्थ  यावर अभ्यासपूर्ण सदर चालवले. 

 श्रीविष्णूसहस्त्रनाम भावार्थ वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

श्री बाठे, बेंगलोर यांची श्रीरामचरितमानस यावरील अयोध्याकांडपर्यंतची रसाळ रामकथा सांगून मन तृप्त केले. 

श्री अमित ब्रह्मे, बेंगलोर यांचे हरिपाठ चिंतन, 

ही प्रवचने ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. 

तसेच श्री अनिल पानसे,सातारा यांची दासबोध आणि आत्माराम यावरील सहज-सुंदर निरुपणे यामुळे अधिक आणि अश्विन जास्त अभ्यासपूर्ण झाले. हे सर्वं सर्वांसाठी blog वर उपलब्ध आहे.

ही प्रवचने ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. 

गेले पाच महिने अभंग, गवळण, धावा, आरती, जोगवा, गाणी असे सुरेख वातावरण आपल्या अनेक साधक/ साधिका यांनी तयार केले. हा भाव खरोखरच दिवसभर भक्तीमध्ये, आनंदामध्ये डुंबवणारा होता. ही सुद्धा एक प्रकारची साधनाच होती. सगळ्यांचा उस्फूर्तपणे सहभाग ही आनंदाची गोष्ट. विशेष नमूद करायचे म्हणजे सौ. मंदा कानडे यांनी गेले तीन महिने दररोज एक नवीन अभंग सादर करून सर्वांची सकाळ भक्तिमय केली.


गेल्या पाच महिन्यात आम्हांला काय मिळाले याचा विचार केला तर खालील गोष्टी लक्षात येतात -

अनुष्ठानामध्ये संकल्प असतो/ नियम असतात आणि सातत्य किंवा consistancy असते. सामूहिक साधनेमुळे एकमेकांचा उत्साह वाढतो, सामूहिक मन तयार होऊन आम्हांला प्रेरणां मिळते. आनंद मिळतो. या सर्वांमुळे कळत नकळत मनाची शक्ती/ सामर्थ्य वाढते. आयुष्यातील कोणत्याही संकटाला मोठया आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी बळ मिळते. 

सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार. 

आता उद्यापासून आपली सामूहिक साधना नाही. परत पुढच्या वर्षी भेटू. पण साधना कधी संपत नसते, तो एक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जसे आम्ही दररोज जेवण करतो किंवा शरीर तंदुरुस्त राहावे म्हणून आम्ही व्यायाम करतो, तसे मनाची शक्ती कायम राहावी म्हणून प्रत्येकांनी आपली दररोजची साधना संकल्प करून करत राहावी म्हणजे आपली ही चातुर्मासातील सामूहिक साधना फळाला आली असे म्हणता येईल. 


ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् , पूर्ण मुदच्यते,  पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्णमेवा वशिष्यते। 

| ॐ शांति: शांति: शांतिः ।

।। ॐ तत् सत् ।।

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099