संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा २०२०

 कार्तिक वद्य त्रयोदशी  हा श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा दिवस. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी, शके 1218, संत शिरोमणी श्रीज्ञानेश्वर महाराज समाधिस्त झाले.

श्रीज्ञानेश्वरी,अमृतानुभव,चांगदेवपासष्ठी, हरिपाठ असे अद्भूत ग्रंथ, त्याबरोबर अनेक अभंग, विराण्या आणि वारकरी संप्रदायाचा पाया असे अफाट कार्य करून माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत विसोबा खेचर अशी संतांची मांदीयाळी, गुरू आणि थोरले बंधू निवृत्तीनाथ, धाकटा सोपान आणि छोटी मुक्ताबाई यांच्या बरोबरच प्रत्यक्ष पांडुरंग संजीवन समाधीच्या वेळी उपस्थित होते. या सोहळ्याचे वर्णन संत नामदेवांनी समाधी अभंगातून अतिशय हृदयद्रावक पद्धतीने केले आहे. हे अभंग नामदेवगाथा या ग्रंथात आहेत. अ भ्यास वर्गानी यावर्षी हा सोहळा अनुभवला. 

 ती. विजया सबनीस यांनी  संत नामदेव यांच्या समाधी अभंगातून आमच्यासमोर या सोहळ्याचे चित्र उभे केले. 

त्याचे रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. 

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099