अध्याय ४ : ओव्या ८१-१०२

२५ फेब्रुवारी २०१८ निरुपण
अध्याय ४ : ज्ञानकर्मसंन्यासयोग  (गीता श्लोक १५-१८/ ज्ञानेश्वरी ओव्या ८१-१०२)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः । कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥ १५॥
मागील मुमुक्षु जे होते । तिहीं ऐशिया जाणोनि मातें । कर्में केलीं समस्तें । धनुर्धरा ॥ ८२ ॥
परि तें बीजें जैसीं दग्धलीं । नुगवतींचि पेरिलीं । तैशीं कर्मेंचि परि तयां जाहलीं । मोक्षहेतु ॥ ८३ ॥
एथ आणिकही एक अर्जुना । हे कर्माकर्मविवंचना । आपुलिये चाडें सज्ञाना । योग्यु नोहे ॥ ८४ ॥
किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः । तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १६॥
कर्म म्हणिपे तें कवण । अथवा अकर्मा काय लक्षण । ऐसें विचारितां विचक्षण । गुंफोनि ठेले ॥ ८५ ॥
जैसें कां कुडें नाणें । खयाचेनि सारखेपणें । डोळ्यांचेंहि देखणें । संशयीं घाली ॥ ८६ ॥
तैसें नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें । गिंवसिजत आहाती कर्में । जे दुजी सृष्टी मनोधर्में । करूं सकती ॥ ८७ ॥
वांचूनि मूर्खाची गोठी कायसी । एथ मोहले गा क्रांतदर्शी । म्हणौनि आतां तेंचि परियेसीं । सांगेन तुज ॥ ८८ ॥
कर्मण्यो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः । अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ १७॥
तरी कर्म म्हणजे स्वभावें । जेणें विश्वाकारु संभवे । तें सम्यक् आधीं जाणावें । लागे एथ ॥ ८९ ॥
मग वर्णाश्रमासि उचित । जें विशेष कर्म विहित । तेंही वोळखावें निश्चित । उपयोगेंसी ॥ ९० ॥
पाठीं जें निषिद्ध म्हणिपे । तेंही बुझावें स्वरूपें । येतुलेनि कांहीं न गुंफे । आपैसेंचि ॥ ९१ ॥
एर्‍हवीं जग हें कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन । परी तें असो आइकें चिन्ह । प्राप्तांचें गा ॥ ९२ ॥
कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्‍नकर्मकृत् ॥ १८॥

जो सकळकर्मीं वर्ततां । देखैं आपुली नैष्कर्म्यता । कर्मसंगें निराशता । फळाचिया ॥ ९३ ॥
आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं । ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगीं । बोधला असे ॥ ९४ ॥
तरी क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा । तोचि तो ये चिन्हीं जाणावा । ज्ञानिया गा ॥ ९५ ॥
जैसा कां जळापाशीं उभा ठाके । तो जरी आपणपें जळामाजिं देखे । तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहें ॥ ९६ ॥
अथवा नावें हन जो रिगे । तो थडियेचें रुख जातां देखे वेगें । तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हण अचळ ॥ ९७ ॥
तैसें सर्व कर्मीं असणें । ते फुडें मानूनि वायाणें । मग आपणया जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा ॥ ९८ ॥
आणि उदोअस्तुचेनि प्रमाणें । जैसें न चालतां सूर्याचें चालणें । तैसें नैष्कर्म्यत्व जाणें । कर्मींचि असतां ॥ ९९ ॥
तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे । जैसें जळामाजीं न बुडे । भानुबिंब ॥ १०० ॥
तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केलें । न भोगितां भोगिलें । भोग्यजात ॥ १०१ ॥
एकेचि ठायीं बैसला । परि सर्वत्र तोचि गेला । हें असो विश्व जाहला । आंगेंचि तो ॥ १०२ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099