२० मे २०१७ निरुपण
अध्याय 2: सांख्ययोग(गीता श्लोक 2६-२७ / ज्ञानेश्वरी ओव्या १५२-१६३ )
अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् । तथापि त्वं महाबाहो नैवं शौचितुमर्हसि ॥ २६॥
अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि मानिसी । तर्ही शोचूं न पवसी । पंडुकुमरा ॥ १५२ ॥
जो आदि स्थिति अंतु । हा निरंतर असे नित्यु । जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥ १५३ ॥
तें आदि नाहीं खंडलें । समुद्रीं तरी असे मीनलें । आणि जातचि मध्यें उरलें । दिसे जैसें ॥ १५४ ॥
इयें तिन्ही तयापरी । सरसींच सदा अवधारीं । भूतांसी कवणीं अवसरीं । ठाकती ना ॥ १५५ ॥
म्हणौनि हें आघवें । एथ तुज नलगे शोचावें । जे स्थितीचि हे स्वभावें । अनादि ऐसी ॥ १५६ ॥
ना तरी हें अर्जुना । नयेचि तुझिया मना । जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ॥ १५७ ॥
तरी एथ कांहीं । तुज शोकासि कारण नाहीं । हे जन्ममृत्यु पाहीं । अपरिहर ॥ १५८ ॥
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च । तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ २७॥

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र जैसें । परिभ्रमे गा ॥ १५९ ॥
ना तरी उदो अस्तु आपैसें । अखंडित होत जात जैसें । हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥ १६० ॥
महाप्रळयावसरें । हें त्रैलोक्यहि संहरे । म्हणौनि हा न परिहरे । आदि अंतु ॥ १६१ ॥
तूं जरी हें ऐसें मानिसी । तरी खेदु कां करिसी ? । काय जाणतुचि नेणसी । धनुर्धरा ॥ १६२ ॥
एथ आणीकही एक पार्था । तुज बहुतीं परी पहातां । दुःख करावया सर्वथा । विषो नाहीं ॥ १६३ ॥

सारांश:-
ज्ञान होणे म्हणजे मी आणि तो परमात्मा एकच आहे, आत्मरूप आहे हे खऱ्या अर्थाने समजणे. आत्मा हा स्थूल, सूक्ष्म, कारण शरीर यांच्यापासून वेगळा पंचाकोशाच्या पलीकडचा, चैतन्यमय आहे आणि तो तिन्ही अवस्थांचा (स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती) सूर्याप्रमाणे साक्षी आहे.
आत्म्याला जन्म आणि मृत्यू नाही. तोच आत्मा सर्वांच्या मध्ये आहे. याच ज्ञानाला "प्राप्तस्य प्राप्ती" असे म्हणतात. भगवंत अर्जुनाला नंतर सांगतात कि तू तुझ्या स्वकीयांकडे शरीर म्हणून बघू नकोस तर एक आत्मा म्हणून बघ.
मग तो जर माझ्या आत आहे तर मला तो का दिसत नाही? त्याचे कारण काय असावे?
हे आपण खालील प्रयोगाद्वारे समजून घेऊ.
सूर्याला बिंब समजले आणि ते जर अनेक पाण्याने भरलेल्या घटांमध्ये पाहिले तर सगळ्या घटांमध्ये सूर्याचे प्रतिबिंब दिसेल. आता जर हे पाणी (अंतःकरण) जर गढूळ झाले (दुःखी होणे, विकार येणे, चंचलता येणे) तर बिंब स्पष्ट दिसत नाही.
दुसरे उदाहरण पहिले तर मी जेंव्हा स्वच्छ आरश्यात बघतो तेंव्हा मला स्वच्छ प्रतिबिंब दिसते, पण तोच आरसा जर विकारांमुळे अस्वच्छ झाला ( काम, क्रोध, मत्सर, मद, मोह, लोभ) तर मला स्वतःची बिंब दिसत नाही.
सर्वसाधारण पणे मनाचे दोष हे - मळभ (मलीनता) , मलविक्षेप , आवरण (अज्ञान) हे होत. हे दोष नाहीसे करण्यासाठी दूर करण्यासाठी सांगितलेले उपाय - मळभ दूर करण्यासाठी शुद्ध कर्मे, मलविक्षेप दूर करण्यासाठी साधन, आवरण (अज्ञान) दूर करण्यासाठी ज्ञानार्जन
जशी आपण, निष्काम कर्मे, साधना (जप, ध्य्यान) करू त्या नंतर तो आरसा हळुवार स्वच्छ होतो. भगवंतानी १०व्या अध्यायामध्ये मी म्हणजे मन आहे असे सांगितले आहे. मन हे सत्वान्शामध्ये गणले असल्यामुळे त्यालाच प्रतिबिंब दाखवण्याची शक्ती आहे.
ज्याप्रमाणे डॉक्टरने आपला रोग दूर करण्यासाठी दिलेले औषध पथ्य पाळून, दीर्घ काळ आणि योग्य प्रमाणात घेणे गरजेचे आहे त्याप्रमाणे आपल्याला झालेला भवरोगाचे निवारण सतत चांगली कर्मे, दीर्घकाळ उपासना, योग्य साधना केल्याने होते.
भगवंत अर्जुनाला पुढे म्हणतात जर जन्माला येणारा माणूस जर लयाला जाणार असेल हा सृष्टीचा त्रिकालबद्ध नियम हा अनादी काळापासून चालत आला असेल तर तू शोक का करतोस? (जसा गंगेचा पाण्याचा प्रवाह उगम पावतो आणि सागराला मिळतो, पाणी हे बाष्प होऊन पावसात रूपांतर होते) तसेच एखाद्याचा जरी नाश झाला तरी तो परत जन्माला येणार आहे.
No comments:
Post a Comment