२८ ऑक्टोबर २०१७ निरुपण
अध्याय ३: कर्मयोग (गीता श्लोक २१-२६ / ज्ञानेश्वरी ओव्या १५८-१७६ )
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ २१॥
एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥ १५८ ॥
हें ऐसें असे स्वभावें । म्हणौनि कर्म न संडावें । विशेषें आचरावें । लागे संतीं ॥ १५९ ॥

न मे पार्थाऽस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ २२॥
आतां आणिकांचिया गोठी । कायशा सांगों किरीटी । देखैं मीच इये राहाटी । वर्तत असें ॥ १६० ॥
काय सांकडें कांहीं मातें । कीं कवणें एकें आर्तें । आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥ १६१ ॥
तरी पुरतेपणालागीं । आणिकु दुसरा नाहीं जगीं । ऐसी सामुग्री माझ्या अंगीं । जाणसी तूं ॥ १६२ ॥
मृत गुरुपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला । तोही मी उगला । कर्मीं वर्तें ॥ १६३ ॥

यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । मम वत्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ २३॥
परी स्वधर्मीं वर्तें कैसा । साकांक्षु कां होय जैसा । तयाचि एका उद्देशा- । लागोनियां ॥ १६४ ॥
जे भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ । तरी न व्हावें बरळ । म्हणौनियां ॥ १६५ ॥

उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् । सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ २४॥
आम्ही पूर्णकाम हौनी । जरी आत्मस्थिति राहुनी । तरी प्रजा हे कैसेनि । निस्तरेल ? ॥ १६६ ॥
इहीं आमुची वास पाहावी । मग वर्ततीपरी जाणावी । ते लोकस्थिति आघवी । नासिली होईल ॥ १६७ ॥
म्हणौनि समर्थु जो येथें । आथिला सर्वज्ञते । तेणें सविशेषें कर्मातें । त्यजावें ना ॥ १६८ ॥

सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत । कुर्याद्विद्वांस्तथाऽसक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम् ॥ २५॥
देखैं फळाचिया आशा । आचरे कामकु जैसा । कर्मीं भरु होआवा तैसा । निराशाही ॥ १६९ ॥
जे पुढतपुढतीं पार्था । हे सकळ लोकसंस्था । रक्षणीय सर्वथा । म्हणौनियां ॥ १७० ॥
मार्गाधारें वर्तावें । विश्व हें मोहरें लावावें । अलौकिक नोहावें । लोकांप्रति ॥ १७१ ॥

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् । जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् ॥ २६॥
जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी । म्हणौनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥ १७२ ॥
तैशी कर्मीं जयां अयोग्यता । तयांप्रति नैष्कर्म्यता । न प्रगटावी खेळतां । आदिकरुनी ॥ १७३ ॥
तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी । नैष्कर्मींही दावावी । आचरोनी ॥ १७४ ॥
तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं । तो कर्मबंधु आंगीं । वाजैल ना ॥ १७५ ॥
जैसी बहुरुपियांचीं रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥ १७६ ॥

No comments:
Post a Comment