अध्याय ७: ओव्या १४५-१६५

२० जानेवारी २०१९ निरुपण 
अध्याय ७: ज्ञानविज्ञानयोग  (गीता श्लोक २२-२६ / ज्ञानेश्वरी ओव्या १४५-१६५)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते । लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥ २२॥
मग तिया श्रद्धायुक्त । तेथिंचें आराधन जें उचित । तें सिद्धिवरी समस्त । वर्तो लागे ॥ १४५ ॥
ऐसें जेणें जें भाविजे । तें फळ तेणें पाविजे । परी तेंही सकळ निपजे । मजचिस्तव ॥ १४६ ॥
अन्तवत्तु फलं तेषां तद्‍भवत्यल्पमेधसाम् । देवान्देवयजो यान्ति मद्‍भक्ता यान्ति मामपि ॥ २३॥
परी ते भक्त मातें नेणती । जे कल्पनेबाहेरी न निघती । म्हणौनि कल्पित फळ पावती । अंतवंत ॥ १४७ ॥
किंबहुना ऐसें जें भजन । तें संसाराचेंचि साधन । येर फळभोग तो स्वप्न । नावभरी दिसे ॥ १४८ ॥
हें असो परौंते । मग हो कां आवडे तें । परी यजी जो देवतांतें । तो देवत्वासीचि ये ॥ १४९ ॥
येर तनुमनुप्राणी । जे अनुसरले माझेयाचि वाहणीं । ते देहाच्या निर्वाणीं । मीचि होती ॥ १५० ॥
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः । परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ २४॥
परी तैसें न करिती प्राणिये । वायां आपुलिया हितीं वाणिये । जें पोहताती पाणियें । तळहातींचेनि ॥ १५१ ॥
नाना अमृताच्या सागरीं बुडिजे । मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे ? । आणि मनीं तरी आठविजे । थिल्लरोदकातें ? ॥ १५२ ॥
हें ऐसें कासया करावें । जे अमृतींही रिगोनि मरावें । तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ? ॥ १५३ ॥
तैसा फळहेतूचा पांजरा । सांडूनियां धनुर्धरा । कां प्रतीतिपाखीं चिदंबरा । गोसाविया नोहावें ? ॥ १५४ ॥
जेथ उंचावलेनि पवाडें । सुखाचा पैसारु जोडे । आपुलेनि सुरवाडें । उडों ये ऐसा ॥ १५५ ॥
तया उमपा माप कां सुवावें । मज अव्यक्ता व्यक्त कां मानावें । सिद्ध असतां कां निमावें । साधनवरी ? ॥ १५६ ॥
परी हा बोल आघवा । जरी विचारीजतसे पांडवा । तरी विशेषें या जीवां । न चोजवे गा ॥ १५७ ॥
नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः । मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥ २५॥
कां जे योगमायापडळें । हे जाले आहाति आंधळे । म्हणौनि प्रकाशाचेनि देहबळें । न देखती मातें ॥ १५८ ॥
एर्‍हवीं मी नसें ऐसें । काय वस्तुजात असे ? । पाहें पां कणव जळ रसें- । रहित आहे ? ॥ १५९ ॥
पवनु कवणातें न शिवेचि । आकाश कें न समायेचि । हें असो एकु मीचि । विश्वीं आहें ॥ १६० ॥
वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन । भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ २६॥
येथें भूतें जियें अतीतलीं । तियें मीचि होऊनि ठेलीं । आणि वर्तत आहाति जेतुलीं । तींही मीचि ॥ १६१ ॥
कां भविष्यमाणें जियें हीं । तींहीं मजवेगळीं नाहीं । हा बोलचि एर्‍हवीं कांहीं । होय ना जाय ॥ १६२ ॥
दोराचिया सापासी । डोंबा बडिया ना गव्हाळा ऐसी । संख्या न करवे कोण्हासी । तेवीं भूतांसि मिथ्यत्वें ॥ १६३ ॥
मी ऐसा पंडुसुता । अनुस्यूतु सदा असतां । या संसार जो भूतां । तो आनें बोलें ॥ १६४ ॥
तरी तेचि आतां थोडीसी । गोठी सांगिजेल परियेसीं । जै अहंकारा तनूंसीं । वालभ पडिलें ॥ १६५ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099