१० जून २०१७ निरुपण
अध्याय २: सांख्ययोग(गीता श्लोक ३२-३८ / ज्ञानेश्वरी ओव्या १९१-२२९ )
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् । सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥ ३२॥
अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो कां जें दैव तुमचें । कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटलें असे ॥ १९१ ॥
हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें । मूर्त कां प्रतापें । उदो केला ॥ १९२ ॥
ना तरी गुणाचेनि पतिकरें । आर्तीचेनि पडिभरें । हें कीर्तीचि स्वयंवरें । आली तुज ॥ १९३ ॥
क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तैं झुंज ऐसें लाहिजे । जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणि ॥ १९४ ॥
ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयूख । तैसा संग्रामु हा देख । पातला असे ॥ १९५ ॥

अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि । ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ ३३॥
आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिलें शोचूं बैसिजे । तरी आपण आहाणा होईजे । आपणपेयां ॥ १९६ ॥
पूर्वजांचें जोडलें । आपणचि होय धाडिलें । जरी आजि शस्त्र सांडिलें । रणीं इये ॥ १९७ ॥
असती कीर्ति जाईल । जगचि अभिशापु देईल । आणि गिंवसित पावतील । महादोष ॥ १९८ ॥
जैसीं भातारेंहीन वनिता । उपहती पावे सर्वथा । तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ॥ १९९ ॥
ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरी गिधीं विदारिजे । तैसें स्वधर्महीना अभिभविजे । महादोषीं ॥ २०० ॥

अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् । संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ ३४॥
म्हणौनि स्वधर्मु हा सांडसील । पापा वरपडा होसील । आणि अपेश तें न वचेल । कल्पांतवरी ॥ २०१ ॥
जाणतेनि तंवचि जियावें । जंव अपकीर्ति आंगा न पवे । आणि सांग पां केवीं निगावें । एथोनियां ? ॥ २०२ ॥
तू निर्मत्सर सदयता । येथूनि निघसील कीर माघौता । परी ते गती समस्तां । न मनेल ययां ॥ २०३ ॥
हे चहूंकडूनि वेढितील । बाणवरी घेतील । तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळुपणें ॥ २०४ ॥
ऐसेनिहि प्राणसंकटें । जरी विपायें पां निघणें घटे । तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥ २०५ ॥
भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः । येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥ ३५॥

तूं आणिकही एक न विचारिसी । एथ संभ्रमें झुंजों आलासी । आणि सकणवपणें निघालासी । मागुता जरी ॥ २०६ ॥
तरी तुझें तें अर्जुना । या वैरियां दुर्जनां । कां प्रत्यया येईल मना । सांगैं मज ॥ २०७ ॥
अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः । निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ॥ ३६॥

हे म्हणती गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला । हा सांगैं बोलु उरला । निका कायी ? ॥ २०८ ॥
लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुलीं जीवितें । परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ॥ २०९ ॥
ते तुज अनायासें । अनकळित जोडिली असे । हें अद्वितीय जैसें । गगन आहे ॥ २१० ॥
तैसी कीर्ती निःसीम । तुझ्या ठायीं निरुपम । तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं ॥ २११ ॥
दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती । जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥ २१२ ॥
ऐसी महिमा घनवट । गंगा जैसी चोखट । जया देखीं जगीं सुभट । वाट जाहली ॥ २१३ ॥
तें पौरुष तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त । जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ॥ २१४ ॥
जैसा सिंहाचिया हाकां । युगांतु होय मदमुखा । तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ॥ २१५ ॥
जैसे पर्वत वज्रातें । ना तरी सर्प गरुडातें । तैसे अर्जुना हे तूतें । मानिती सदा ॥ २१६ ॥
तें अगाधपण जाईल । मग हीणावो अंगा येईल । जरी मागुता निघसील । न झुंजतुचि ॥ २१७ ॥
आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनिं अवकळा करिती । न गणित कुटी बोलती । आइकतां तुज ॥ २१८ ॥
मग ते वेळीं हियें फुटावें । आतां लाठेपणें कां न झुजावें ? । हे जिंतलें तरी भोगावें । महीतळ ॥ २१९ ॥
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् । तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ३७॥

ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित । तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥ २२०॥
म्हणौनि ये गोठी । विचारु न करी किरीटी । आतां धनुष्य घेऊनि उठीं । झुंजैं वेगीं ॥ २१॥
ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित । तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥ २२० ॥
म्हणौनि ये गोठी । विचारु न करी किरीटी । आतां धनुष्य घेऊनि उठीं । झुंजैं वेगीं ॥ २२१ ॥
देखैं स्वधर्मु हा आचरतां । दोषु नाशे असता । तुज भ्रांति हे कवण चित्ता । पातकाची ॥ २२२ ॥
सांगैं प्लवेंचि काय बुडिजे । कां मार्गीं जातां आडळिजे । परी विपायें चालों नेणिजे । तरी तेंही घडे ॥ २२३ ॥
अमृतें तरीच मरिजे । जरी विखेंसि सेविजे । तैसा स्वधर्मीं दोषु पाविजे । हेतुकपणें ॥ २२४ ॥
म्हणौनियां पार्था । हेतू सांडोनि सर्वथा । तुज क्षात्रवृत्ति झुंजतां । पाप नाहीं ॥ २२५ ॥
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥ ३८॥

सुखीं संतोषां न यावें । दुःखीं विषादा न भजावें । आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं ॥ २२६ ॥
एथ विजयपण होईल । कीं सर्वथा देह जाईल । हें आधींचि कांही पुढील । चिंतावेना ॥ २२७ ॥
आपणयां उचिता । स्वधर्में राहाटतां । जें पावे तें निवांता । साहोनि जावें ॥ २२८ ॥
ऐसियां मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें । म्हणौनि आतां झुंजावें । निभ्रांत तुवां ॥ २२९ ॥
श्रीकृष्ण अर्जुनाला वेगवेगळ्या प्रकारे ( साम, दाम, दंड, भेद) युद्ध का करावे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न चालूच ठेवतात.
तू युद्धातून माघार घेतली तर तुझी खूप अपकीर्ती होईल, स्वधर्म सोडल्याचे पाप लागेल, महादोष लागतील , लोक तुझी निंदा करतील, कौरव तूला "भित्रा क्षत्रिय" म्हणुन तुला नावं ठेवतील.
कधी भगवंत अर्जुनाची खूप स्तुती करून त्याला युद्धासाठी प्रेरीत करतात. त्याच्या शौर्याची प्रसिंद्धी तिन्ही लोकांत आहे हेही सांगतात.स्वधर्माच्या दृष्टींनी जर विचार केला तर क्षत्रियाला युद्ध करण्याशिवाय दुसरे कोणतेच कल्याणाचे साधन नाही.
जर अर्जुन युद्धात मारला गेला तर त्याला स्वर्गाप्राप्ती होईल व जिंकला तर तो पृथ्वीचे राज्य भोगेल.
कुठल्याही दृष्टीने विचार केला तर तुझा फायदाच आहे. म्हणून अर्जुना, आता तू धनुष्य उचल आणि युद्धाला तयार हो. स्वधर्माच्या नावेत बसून आपले आचरण केले असता , कुठलेही दोष लागत नाही. पण ते करताना फळाची आशा ठेवू नये. यातुन संदेश असा की आपल्या जीवनात कर्तव्यापासून मागे सरू नये.
आपले कर्तव्य चोखपणे करत राहणे हाच आपला स्वधर्म आहे. माझ्या वाट्याला आलेले काम ( म्हणजेच स्वधर्म) अगदी मनापासून व आनंदात करावे ( कारण *work is worship*!). पण कर्म करताना फळाची अपेक्षा मनात असू नये.
दैनंदीन जीवनामध्ये अश्या अनेक प्रसंगांना आपल्याला सामोरे जावे लागते जिथे मनामधे सदैव संकल्प/विकल्प याचे सतत वादळ सुरू होते. अश्या प्रसंगी निश्चयात्मक बुद्धी चा वापर करून योग्य तो सुवर्णमध्य काढून निर्णय घ्यावा. (*Decision making process*: Observation, data collection, analysis, options elimination, decision and finally action). अशी बुद्धीच आपल्याला या चक्रातून बाहेर काढू शकते.
सुख/दुःख, जय/पराजय, पाप/ पुण्य याचा विचार करू नये. कारण या सर्व गोष्टी म्हणजे दृश्य जगातील मायीक खेळ आहे. म्हणून त्याचा विचार न करता साधकाने आपले कर्तव्य उत्कृष्ठपणे करत असताना आत्म्याच्या अनुभवाचा विचार करावा. अश्या निष्काम कर्मयोगाचा विचार भगवंत आपल्याला पुढील श्लोकात सांगतात.
No comments:
Post a Comment