अध्याय १३ : ओव्या ८६५-८७३

 १६ ऑगस्ट २०२० निरुपण 

अध्याय १३  : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक १२ / ज्ञानेश्वरी ओव्या ८६५-८७३ )


निरूपण ऐकताना खाली दिलेली इमेज आणि pdf जरूर बघा. 



ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ञात्वा~मृतमश्नुते  | अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥ १२॥


तरि ज्ञेय ऐसें म्हणणें । वस्तूतें येणेंचि कारणें । जें ज्ञानेंवांचूनि कवणें । उपायें नये ॥ ८६५ ॥
आणि जाणितलेयावरौतें । कांहींच करणें नाहीं जेथें । जाणणेंचि तन्मयातें । आणी जयाचें ॥ ८६६ ॥
जें जाणितलेयासाठीं । संसार काढूनियां कांठीं । जिरोनि जाइजे पोटीं । नित्यानंदाच्या ॥ ८६७ ॥
तें ज्ञेय गा ऐसें । आदि जया नसे । परब्रह्म आपैसें । नाम जया ॥ ८६८ ॥
जें नाहीं म्हणों जाइजे । तंव विश्वाकारें देखिजे । आणि विश्वचि ऐसें म्हणिजे । तरि हे माया ॥ ८६९ ॥
रूप वर्ण व्यक्ती । नाहीं दृश्य दृष्टा स्थिती । तरी कोणें कैसें आथी । म्हणावें पां ॥ ८७० ॥
आणि साचचि जरी नाहीं । तरी महदादि कोणें ठाईं । स्फुरत कैचें काई । तेणेंवीण असे ? ॥ ८७१ ॥
म्हणौनि आथी नाथी हे बोली । जें देखोनि मुकी जाहली । विचारेंसीं मोडली । वाट जेथें ॥ ८७२ ॥
जैसी भांडघटशरावीं । तदाकारें असे पृथ्वी । तैसें सर्व होऊनियां सर्वीं । असे जे वस्तु ॥ ८७३ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099