स्नेहा विरगावकर स्वाध्याय

 स्नेहा विरगावकर यांनी संत जीवनातील भक्तियोग सांगितला. 

४ ऑगस्ट 

अध्याय 12 भक्तियोग

पूर्ण भक्तिमय आसा आध्याय आहे. योगी, संन्यासी व साधकाला भगवंताकडे जाण्यासाठी, भगवंताने अनेक मार्ग सांगितले आहेत

परमात्मांच्या ठिकाणी मन व बुद्धी स्थिर केली की व्यक्तिचा निवास परमात्मांत होतो. त्यात निवास होणे म्हणजे उध्दार होणे. मन व बुद्धी भगवंताला अर्पण करणे होय. म्हणजेच सर्व विकारांचा व विचारांचा परमात्मा हाच आहे असे वाटणे यालाच 'स्थित - प्रज्ञ' असे म्हणतात. 

दुसरा मार्ग म्हणजे मन व बुद्धी भगवंताला अर्पण करणे योगाभ्यासाने समाधी अवस्थेत ध्यान करीत मनात खोल खोल बुडी घ्यायची व इंद्रिये - मन-बुद्धी - अहंकार हे एक एक कोश उलगडित आत प्रवेश करीत जायचे. अहंकाराचा पलिकडे आत्मा आहे. 'आत्मदर्शन 'झाले तर परमात्मां प्राप्ति सुलभ होते. 

नंतरचा मार्ग म्हणजे जीवनातील सर्व कर्म करावयाची परंतु ती सर्व भगवंता साठी करावयाची म्हणजे च ' जे जे भेटे भूत | ते ते मानिजे भगवंत | हा भक्तियोग निश्चित | जाण माझा || कोणतेही कर्म व काम हे भगवंता साठी करीत आहे ते कोणतेही व कोणासाठी का असेना ते भगवंतासाठीच करीत आहे असे समजावे. 

नंतरचा मार्ग म्हणजे साधकासाठी व सोपा असा तो म्हणजे सर्व फलांचा त्याग करणे.

 'वृक्ष का वेली | लोटती फळे आली' | त्याचप्रमाणे `फलद्रूप झालेली कर्मेही जाऊ दे शून्यी ||

यालाच निष्काम कर्मयोग म्हणतात . 

५ ऑगस्ट 

भक्ति व उपासना

भक्ति

भगवंताशी एकरूप होण्यासाठी जी श्रद्धा लागते तीला भक्ति असे म्हणतात. ' जो विभक्त नव्हे तो भक्त' 'असे रामदास स्वामी नी सांगितले आहे. निश्चयात्मक बुद्धी, दृढ संकल्प, मन हे सर्व भगवंताच्या चरणी ठेवणे हिच खरी भक्ति होय असे ज्ञानेश्वर माऊलीनी म्हटले आहे ज्याने भगवंताचा मार्ग अनुसरला आहे अशा भक्ताची भक्ति तो स्व :ताहा करून घेतो म्हणजे भगवंताशी एकरूप होणे होय

उदा-नामदेव महाराज सतत विठ्ठलाचा जप करत सर्व ठिकाणी त्यान विठ्ठल दिसत असे. पशु पक्षी. झाडे पाने तेच काय तर दगडातही विठ्ठल च दिसत असे.

एकदा त्याची पोळी कुत्र्याने पळवली त्यातही त्याना विठ्ठल दिसला. पोळीला तुप नाही तर विठ्ठल कसा कोरडी पोळी खाईल म्हणून ते कुत्र्याचा मागे तुपाची वाटि घेऊन पळत सुटले.

केवढी भक्ति होती नामदेवाची विठ्ठलावर...... 

उपासना

जप, तप, व्रत, पुजा म्हणजे उपासना होय भगवंताच्या चरणी लिन होणे उपासना होय उपासना ने भक्ति ला जवळ करता येते सच्चिदानंद परमात्मा विषयी अभिन्न भावनेत नित्य निरतंर दृढ स्थितित रहाणे हिच उपासना होय. भक्ती व उपासना या एकमेकांना पूरक आहे दृढतेने केलेल्या उपासनेचे रुपांतर भक्तित होते. परंतु कधी कधी उपासना वर वर होते त्यामुळे त्याचे रूपांतर भक्तित होत नाही

उदा. व्रत किंवा पुजा करतांना ती करतांना हाताने सर्व होते परंतु डोक्यात वेगळेच विचार चालू असताना त्यामुळे त्या पुजेत भक्ति भाव उतरत नाही व भगवंताकडे पोहचू शकत नाही.

७ ऑगस्ट 

भक्त कसा असावा व कोणता भक्त देवाला प्रिय आहे ते भगवंताने सांगितले आहे

कोणाचा न करी द्वेष |दया मैत्री वसे मनी ||

मी-माझे न म्हणे |सुखदुःखे क्षमाबले ||

सदा संतुष्ट जो योगी |संयमी दृढनिश्चय ||

ज्यास नाही हर्ष, मत्सर |विकारापासुन तो मुक्त ||

असी जो अंतर्बाह्य शुध्द |दु:खा पासून सुटलेला ||

जेचे असती इंद्रीय वश |असतो तो ध्यान योगयुक्त ||

सर्व जीव सम-समान |ना ठेवी फल अपेक्षा ||

जो सर्व फलांचा त्याग करी |असतो देवास प्रिय ||

८ ऑगस्ट 

प्रपंचात आपले कर्तव्य व कर्म करीत राहाणे व त्यातून अलिप्त होवून पहाणे हि एक प्रकारची परिपक्वता आहे 

जसे फळ पिकले, परिपक्व झाले की आपोआप झाडापासून वेगळे होते. परंतु तोडले तर देठातून चीक गळत राहतो. त्या फळाची सुटण्याची तयारी नसते. म्हणजेच झाडापासून त्याला वेगळे व्हायचे नसते. तसेच या प्रपंचात राहुन अशी परिपक्वता येणे व इतरांना मधुर रसपान देऊन स्व:ता 'मुक्त होणे' हेच खर भक्ति चे लक्षण आहे. 

या परिस्थितीत प्रपंच आपण उभा केला आहे. हि भावना लोप, पावते. व जणु कर्मांच्या आरंभाचा परित्याग केला आहे, असे होणे. म्हणजेच घरातील सर्वांबद्दल आपुलकी, प्रेम, वात्सल्य असुनही'कमालीची अलिप्ताता' हे सर्व म्हणजे एक प्रकारची परिपक्वता आहे त्यामुळे भक्ति मार्ग मोकळा होतो. अशा व्यक्ती ची बुद्धी स्थिर होवून तो भगवंताला प्रिय असते. 

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099