५ सप्टेंबर २०२१ निरुपण
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना । करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रहः ॥ १८॥
जें ज्ञान ज्ञाता ज्ञेय । हें जगाचें बीज त्रय । ते कर्माची निःसंदेह । प्रवृत्ति जाण ॥ ४६१ ॥
आतां ययाचि गा त्रया । व्यक्ति वेगळालिया । आइकें धनंजया । करूं रूप ॥ ४६२ ॥
तरी जीवसूर्यबिंबाचे । रश्मी श्रोत्रादिकें पांचें । धांवोनि विषयपद्माचे । फोडिती मढ ॥ ४६३ ॥
कीं जीवनृपाचे वारु उपलाणें । घेऊनि इंद्रियांचीं केकाणें । विषयदेशींचें नागवणें । आणीत जे ॥ ४६४ ॥
हें असो इहीं इंद्रियीं राहाटे । जें सुखदुःखेंसीं जीवा भेटे ।तें सुषुप्तिकालीं वोहटे । जेथ ज्ञान ॥ ४६५ ॥
तया जीवा नांव ज्ञाता । आणि जें हें सांगितलें आतां । तेंचि एथ पंडुसुता । ज्ञान जाण ॥ ४६६ ॥
जें अविद्येचिये पोटीं । उपजतखेंवो किरीटी । आपणयातें वांटी । तिहीं ठायीं ॥ ४६७ ॥
आपुलिये धांवे पुढां । घालूनि ज्ञेयाचा गुंडा । उभारी मागिलीकडां । ज्ञातृत्वातें ॥ ४६८ ॥
मग ज्ञातया ज्ञेया दोघां । तो नांदणुकेचा बगा । माजीं जालेनि पैं गा । वाहे जेणें ॥ ४६९ ॥
ठाकूनि ज्ञेयाची शिंव । पुरे जयाची धांव । सकळ पदार्थां नांव । सूतसे जें ॥ ४७० ॥
तें गा सामान्य ज्ञान । या बोअला नाहीं आन । ज्ञेयाचेंही चिन्ह । आइक आतां ॥ ४७१ ॥
तरी शब्दु स्पर्शु । रूप गंध रसु । हा पंचविध आभासु । ज्ञेयाचा तो ॥ ४७२ ॥
जैसें एकेचि चूतफळें । इंद्रियां वेगवेगळे । रसें वर्णें परीमळें । भेटिजे स्पर्शें ॥ ४७३ ॥
तैसें ज्ञेय तरी एकसरें । परी ज्ञान इंद्रियद्वारें । घे म्हणौनि प्रकारें । पांचें जालें ॥ ४७४ ॥
आणि समुद्रीं वोघाचें जाणें । सरे लाणीपासीं धावणें । कां फळीं सरे वाढणें । सस्याचें जेवीं ॥ ४७५ ॥
तैसें इंद्रियांच्या वाहवटीं । धांवतया ज्ञाना जेथ ठी । होय तें गा किरीटी । विषय ज्ञेय ॥ ४७६ ॥
एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया । तिहीं रूप केलें धनंजया । हे त्रिविध सर्व क्रिया\- । प्रवृत्ति जाण ॥ ४७७ ॥
जे शब्दादि विषय । हें पंचविध जें ज्ञेय । तेंचि प्रिय कां अप्रिय । एकेपरीचें ॥ ४७८ ॥
ज्ञान मोटकें ज्ञातया । दावी ना जंव धनंजया । तंव स्वीकारा कीं त्यजावया । प्रवर्तेचि तो ॥ ४७९ ॥
परी मीनातें देखोनि बकु । जैसा निधानातें रंकु । कां स्त्री देखोनि कामुकु । प्रवृत्ति धरी ॥ ४८० ॥
जैसें खालारां धांवे पाणी । भ्रमर पुष्पाचिये घाणीं । नाना सुटला सांजवणीं । वत्सुचि पां ॥ ४८१ ॥
अगा स्वर्गींची उर्वशी । ऐकोनि जेंवी माणुसीं । वराता लावीजती आकाशीं । यागांचिया ॥ ४८२ ॥
पैं पारिवा जैसा किरीटी । चढला नभाचिये पोटीं । पारवी देखोनि लोटी । आंगचि सगळें ॥ ४८३ ॥
हें ना घनगर्जनासरिसा । मयूर वोवांडे आकाशा । ज्ञाता ज्ञेय देखोनि तैसा । धांवचि घे ॥ ४८४ ॥
म्हणौनि ज्ञान ज्ञेय ज्ञाता । हे त्रिविध गा पंडुसुता । होयचि कर्मा समस्तां । प्रवृत्ति येथ ॥ ४८५ ॥
परी तेंचि ज्ञेय विपायें । जरी ज्ञातयातें प्रिय होये । तरी भोगावया न साहे । क्षणही विलंबु ॥ ४८६ ॥
नातरी अवचटें । तेंचि विरुद्ध होऊनि भेटे । तरी युगांत वाटे । सांडावया ॥ ४८७ ॥
व्याळा कां हारा । वरपडा जालेया नरा । हरिखु आणि दरारा । सरिसाचि उठी ॥ ४८८ ॥
तैसें ज्ञेय प्रियाप्रियें । देखिलेनि ज्ञातया होये । मग त्याग स्वीकारीं वाहे । व्यापारातें ॥ ४८९ ॥
तेथ रागी प्रतिमल्लाचा । गोसांवी सर्वदळाचा । रथु सांडूनि पायांचा । होय जैसा ॥ ४९० ॥
तैसें ज्ञातेपणें जें असे । तें ये कर्ता ऐसिये दशे । जेवितें बैसलें जैसें । रंधन करूं ॥ ४९१ ॥
कां भंवरेंचि केला मळा । वरकलुचि जाला अंकसाळा । नाना देवो रिगाला देऊळा\- । चिया कामा ॥ ४९२ ॥
तैसा ज्ञेयाचिया हांवा । ज्ञाता इंद्रियांचा मेळावा । राहाटवी तेथ पांडवा । कर्ता होय ॥ ४९३ ॥
आणि आपण हौनी कर्ता । ज्ञाना आणी करणता । तेथें ज्ञेयचि स्वभावतां । कार्य होय ॥ ४९४ ॥
ऐसा ज्ञानाचिये निजगति । पालटु पडे गा सुमति । डोळ्याची शोभा रातीं । पालटे जैसी ॥ ४९५ ॥
कां अदृष्ट जालिया उदासु । पालटे श्रीमंताचा विलासु । पुनिवेपाठीं शीतांशु । पालटे जैसा ॥ ४९६ ॥
तैसा चाळितां करणें । ज्ञाता वेष्टिजे कर्तेपणें । तेथींचीं तियें लक्षणें । ऐक आतां ॥ ४९७ ॥
तरी बुद्धि आणि मन । चित्त अहंकार हन । हें चतुर्विध चिन्ह । अंतःकरणाचें ॥ ४९८ ॥
बाह्य त्वचा श्रवण । चक्षु रसना घ्राण । हें पंचविध जाण । इंद्रियें गा ॥ ४९९ ॥
तेथ आंतुले तंव करणें । कर्ता कर्तव्या घे उमाणें । मग तैं जरी जाणें । सुखा येतें ॥ ५०० ॥
तरी बाहेरीलें तियेंही । चक्षुरादिकें दाहाही । उठौनि लवलाहीं । व्यापारा सूये ॥ ५०१ ॥
मग तो इंद्रियकदंंबु । करविजे तंव राबु । जंव कर्तव्याचा लाभु । हातासि ये ॥ ५०२ ॥
ना तें कर्तव्य जरी दुःखें । फळेल ऐसें देखे । तो लावी त्यागमुखें । तियें दाहाही ॥ ५०३ ॥
मग फिटे दुःखाचा ठावो । तंव राहाटवी रात्रिदिवो । विकणवातें कां रावो । जयापरी ॥ ५०४ ॥
तैसेनि त्याग स्वीकारीं । वाहातां इंद्रियांची धुरी । ज्ञातयातें अवधारीं । कर्ता म्हणिपे ॥ ५०५ ॥
आणि कर्तयाच्या सर्व कर्मीं । आउतांचिया परी क्षमी । म्हणौनि इंद्रियांतें आम्ही । करणें म्हणों ॥ ५०६ ॥
आणि हेचि करणेंवरी । कर्ता क्रिया ज्या उभारी । तिया व्यापे तें अवधारीं । कर्म एथ ॥ ५०७ ॥
सोनाराचिया बुद्धि लेणें । व्यापे चंद्रकरीं चांदणें । कां व्यापे वेल्हाळपणें । वेली जैसी ॥ ५०८ ॥
नाना प्रभा व्यापे प्रकाशु । गोडिया इक्षुरसु । हें असो अवकाशु । आकाशीं जैसा ॥ ५०९ ॥
तैसें कर्तयाचिया क्रिया । व्यापलें जें धनंजया । तें कर्म गा बोलावया । आन नाहीं ॥ ५१० ॥
एवं कर्म कर्ता करण । या तिहींचेंही लक्षण । सांगितलें तुज विचक्षण\- । शिरोमणी ॥ ५११ ॥
एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय । हें कर्माचें प्रवृत्तित्रय । तैसेंचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो ॥ ५१२ ॥
वन्हीं ठेविला असे धूमु । आथी बीजीं जेवीं द्रुमु । कां मनीं जोडे कामु । सदा जैसा ॥ ५१३ ॥
तैसा कर्ता क्रिया करणीं । कर्माचें आहे जिंतवणीं । सोनें जैसें खाणी । सुवर्णाचिये ॥ ५१४ ॥
म्हणौनि हें कार्य मी कर्ता । ऐसें आथि जेथ पंडुसुता । तेथ आत्मा दूरी समस्ता । क्रियांपासीं ॥ ५१५ ॥
यालागीं पुढतपुढती । आत्मा वेगळाचि सुमती । आतां असो हे किती । जाणतासि तूं ॥ ५१६ ॥
ज्ञानं कर्म च कर्ताच त्रिधैव गुणभेदतः । प्रोच्यते गुणसण्ख्याने यथावच्छृणु तान्यपि ॥ १९॥
परी सांगितलें जें ज्ञान । कर्म कर्ता हन । ते तिन्ही तिहीं ठायीं भिन्न । गुणीं आहाती ॥ ५१७ ॥
म्हणौनि ज्ञाना कर्मा कर्तया । पातेजों नये धनंजया । जे दोनी बांधती सोडावया । एकचि प्रौढ ॥ ५१८ ॥
तें सात्विक ठाऊवें होये । तो गुणभेदु सांगों पाहे । जो सांख्यशास्त्रीं आहे । उवाइला ॥ ५१९ ॥
जें विचारक्षीरसमुद्र । स्वबोधकुमुदिनीचंद्र । ज्ञानडोळसां नरेंद्र । शास्त्रांचा जें ॥ ५२० ॥
कीं प्रकृतिपुरुष दोनी । मिसळलीं दिवोरजनीं । तियें निवडितां त्रिभुवनीं । मार्तंडु जें ॥ ५२१ ॥
जेथ अपारा मोहराशी । तत्वाच्या मापीं चोविसीं । उगाणा घेऊनि परेशीं । सुरवाडिजे ॥ ५२२ ॥
अर्जुना तें सांख्यशास्त्र । पढे जयाचें स्तोत्र । तें गुणभेदचरित्र । ऐसें आहे ॥ ५२३ ॥
जे आपुलेनि आंगिकें । त्रिविधपणाचेनि अंकें । दृश्यजात तितुकें । अंकित केलें ॥ ५२४ ॥
एवं सत्वरजतमा । तिहींची एवढी असे महिमा । जें त्रैविध्य आदी ब्रह्मा । अंतीं कृमी ॥ ५२५ ॥
परी विश्वींची आघवी मांदी । जेणें भेदलेनि गुणभेदीं । पडिली तें तंव आदी । ज्ञान सांगो ॥ ५२६ ॥
जे दिठी जरी चोख कीजे । तरी भलतेंही चोख सुजे । तैसें ज्ञानें शुद्धें लाहिजे । सर्वही शुद्ध ॥ ५२७ ॥
म्हणौनि तें सात्विक ज्ञान । आतां सांगों दे अवधान । कैवल्यगुणनिधान । श्रीकृष्ण म्हणे ॥ ५२८ ॥
No comments:
Post a Comment