अध्याय १४ : ओव्या ४१- ८६

 १ नोव्हेंबर  २०२० निरुपण 

अध्याय १४ : । गुणत्रयविभागयोगः । ( श्लोक १-३ / ज्ञानेश्वरी ओव्या ४१-८६  )


निरुपणात सांगितलेली इमेज  खाली दिली  आहे.
‘आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु। बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रगहमेव च॥
इन्द्रियाणि हयानाहुíवषयांस्तेषु गोचरान्‌। आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः॥’


श्रीभगवानुवाच ।
परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् । यद्‍ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः ॥ १॥

म्हणौनि गा पुढती । सांगिजैल तुजप्रती । पर म्हण म्हणौनि श्रुतीं । डाहारिलें जें ॥ ४१ ॥
एर्‍हवीं ज्ञान हें आपुलें । परी पर ऐसेनि जालें । जे आवडोनि घेतलें । भवस्वर्गादिक ॥ ४२ ॥
अगा याचि कारणें । हें उत्तम सर्वांपरी मी म्हणें ।जे वन्हि हें तृणें । येरें ज्ञानें ॥ ४३ ॥
जियें भवस्वर्गातें जाणती । यागचि चांग म्हणती ।पारखी फुडी आथी । भेदीं जया ॥ ४४ ॥
तियें आघवींचि ज्ञानें । केलीं येणें स्वप्नें । जैशा वातोर्मी गगनें । गिळिजती अंतीं ॥ ४५ ॥
कां उदितें रश्मिराजें । लोपिलीं चंद्रादि तेजें । नाना प्रळयांबुमाजें । नदी नद ॥ ४६ ॥
तैसें येणें पाहलेया । ज्ञानजात जाय लया । म्हणौनियां धनंजया । उत्तम हें ॥ ४७ ॥
अनादि जे मुक्तता । आपुली असे पंडुसुता । तो मोक्षु हातां येता । होय जेणें ॥ ४८ ॥
जयाचिया प्रतीती । विचारवीरीं समस्तीं । नेदिजेचि संसृती । माथां उधऊं ॥ ४९ ॥
मनें मन घालूनि मागें । विश्रांति जालिया आंगें । ते देहीं देहाजोगे । होतीचि ना ॥ ५० ॥
मग तें देहाचें बेळें । वोलांडूनि एकेचि वेळे । संवतुकी कांटाळें । माझें जालें ॥ ५१ ॥

इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः । सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च ॥ २॥

जे माझिया नित्यता । तेणें नित्य ते पंडुसुता । परिपूर्ण पूर्णता । माझियाची ॥ ५२ ॥
मी जैसा अनंतानंदु । जैसाचि सत्यसिंधु । तैसेचि ते भेदु । उरेचि ना ॥ ५३ ॥
जें मी जेवढें जैसें । तेंचि ते जाले तैसें । घटभंगीं घटाकाशें । आकाश जेवीं ॥ ५४ ॥
नातरीं दीपमूळकीं । दीपशिखा अनेकीं । नलिया अवलोकीं । होय जैसें ॥ ५५ ॥
अर्जुना तयापरी । सरली द्वैताची वारी । नांदे नामार्थ एकाहारीं । मीतूंविण ॥ ५६ ॥
येणेंचि पैं कारणें । जैं पहिलें सृष्टीचें जुंपणें । तेंही तया होणें । पडेचिना ॥ ५७ ॥
सृष्टीचिये सर्वादी । जयां देहाची नाहीं बांधी । ते कैचें प्रळयावधी । निमतील पां ? ॥ ५८ ॥
म्हणौनि जन्मक्षयां- । अतीत ते धनंजया । मी जालें ज्ञाना इया । अनुसरोनी ॥ ५९ ॥
ऐसी ज्ञानाची वाढी । वानिली देवें आवडी । तेवींचि पार्थाही गोडी । लावावया ॥ ६० ॥
तंव तया जालें आन । सर्वांगीं निघाले कान । सणई अवधान । आतला पां ॥ ६१ ॥
आतां देवाचिया ऐसें । जाकळीजत असे वोरसें । जें निरूपण आकाशें । वेंटाळेना ॥ ६२ ॥
मग म्हणे गा प्रज्ञाकांता । उजवली आजि वक्तृत्वता । जे बोलायेवढा श्रोता । जोडलासी ॥ ६३ ॥
तरि एकु मी अनेकीं । गोंविजे देहपाशकीं । त्रिगुणीं लुब्धकीं । कवणेपरी ॥ ६४ ॥
कैसा क्षेत्रयोगें । वियें इयें जगें । तें परिस सांगें । कवणेपरी ॥ ६५ ॥
पैं क्षेत्र येणें व्याजें । यालागीं हें बोलिजे । जे मत्संगबीजें । भूतीं पिके ॥ ६६ ॥

मम योनिर्महद्‍ब्रह्म तस्मिन्गर्भं दधामहम्यम् । संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥ ३॥

एर्‍हवीं तरी महद्‍ब्रह्म । यालागीं हें ऐसें नाम । जे महदादिविश्राम । शालिका हें ॥ ६७ ॥
विकारां बहुवस थोरी । अर्जुना हेंचि करी । म्हणौनि अवधारीं । महद्‍ब्रह्म ॥ ६८ ॥
अव्यक्तवादमतीं । अव्यक्त ऐसी वदंती । सांख्याचिया प्रतीती । प्रकृति हेचि ॥ ६९ ॥
वेदांतीं इयेतें माया । ऐसें म्हणिजे प्राज्ञराया । असो किती बोलों वायां । अज्ञान हें ॥७० ॥
आपला आपणपेयां । विसरु जो धनंजया । तेंचि रूप यया । अज्ञानासी ॥ ७१ ॥
आणिकही एक असे । जें विचारावेळे न दिसे । वातीं पाहतां जैसें । अंधारें कां ॥ ७२ ॥
हालविलिया जाय । निश्चळीं तरी होय । दुधीं जैसी साय । दुधाची ते ॥ ७३ ॥
पैं जागरु ना स्वप्न । ना स्वरूप अवस्थान । ते सुषुप्ति कां घन । जैसी होय ॥ ७४ ॥
कां न वियतां वायूतें । वांझें आकाश रितें । तया ऐसें निरुतें । अज्ञान गा ॥ ७५ ॥
पैल खांबु कां पुरुखु । ऐसा निश्चयो नाहीं एकु । परी काय नेणों आलोकु । दिसत असे ॥ ७६ ॥
तेवीं वस्तु जैसी असे । तैसी कीर न दिसे । परी कांहीं अनारिसें । देखिजेना ॥ ७७ ॥
ना राती ना तेज । ते संधि जेवीं सांज । तेवीं विरुद्ध ना निज । ज्ञान आथी ॥ ७८ ॥
ऐसी कोण्ही एकी दिशा । तिये वादु अज्ञान ऐसा ।  तया गुंडलिया प्रकाशा । क्षेत्रज्ञु नाम ॥ ७९ ॥
अज्ञान थोरिये आणिजे । आपणपें तरी नेणिजे । तें रूप जाणिजे । क्षेत्रज्ञाचें ॥ ८० ॥
हाचि उभय योगु । बुझें बापा चांगु । सत्तेचा नैसर्गु । स्वभावो हा ॥ ८१ ॥
.आतां अज्ञानासारिखें । वस्तु आपणपांचि देखे । परी रूपें अनेकें । नेणों कोणें ॥ ८२ ॥
जैसा रंकु भ्रमला । म्हणे जा रे मी रावो आला ।  मूर्च्छितु गेला । स्वर्गलोकां ॥ ८३ ॥
तेवीं लचकलिया दिठी । मग देखणें जें जें उठी ।  तया नाम सृष्टी । मीचि वियें पैं गा ॥ ८४ ॥
जैसें कां स्वप्नमोहा । तो एकाकी देखे बहुवा । तोचि पाडु आत्मया । स्मरणेंवीण असे ॥ ८५ ॥
हेंचि आनीभ्रांती । प्रमेय उपलवूं पुढती । परी तूं प्रतीती । याचि घे पां ॥ ८६ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099