अध्याय 1: अर्जुनविषादयोग(गीता श्लोक ३१ ते ३० / ज्ञानेश्वरी ओव्या १५१ ते २०६ )
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव । न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ ३१॥
या कौरवां जरी वधावें । तरी युधिष्ठीरादिकां कां न वधावें । हे येरयेर आघवे । गोत्रज आमुचे ॥ २०७ ॥
म्हणोनि जळो हें झुंज । प्रत्यया न ये मज । एणें काय काज । महापापें ॥ २०८ ॥
देवा बहुतापरी पाहतां । एथ वोखटे होईल झुंजतां । वर कांहीं चुकवितां । लाभु आथी ॥ २०९ ॥

न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च । किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥ ३२॥
येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च । त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ ३३॥
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः । मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥ ३४॥

तया विजयवृत्ती कांहीं । मज सर्वथा काज नाहीं । एथ राज्य तरी कायी । हे पाहुनियां ॥ २१० ॥
या सकळांतें वधावें । मग हे भोग भोगावे । ते जळोत आघवे । पार्थु म्हणे ॥ २११ ॥
तेणें सुखेंविण होईल । तें भलतैसें साहिजेल । वरी जीवितही वेंचिजेल । याचिलागीं ॥ २१२ ॥
परी यांसी घातु कीजे । मग आपण राज्यसुख भोगिजे । हें स्वप्नींही मन माझें । करूं न शके ॥ २१३ ॥
तरी आम्हीं कां जन्मावें । कवणलागीं जियावें । जरी वडिलां यां चिंतावें । विरुद्ध मनें ॥ २१४ ॥
पुत्रातें इच्छी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ । जे निर्दळिजे केवळ । गोत्र आपुलें ॥ २१५ ॥
हें मनींचि केविं धरिजे । आपण वज्राचेया होईजे । वरी घडे तरी कीजे । भलें इयां ॥ २१६ ॥
आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें । हें जीवितही उपकारावें । काजीं यांच्या ॥ २१७ ॥
आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि सकळ । मग संतोषविजे कुळ । आपुलें जें ॥ २१८ ॥
तेचि हे समस्त । परी कैसें कर्म विपरीत । जे जाहले असती उद्यत । झुंजावया ॥ २१९ ॥
अंतौरिया कुमरें । सांडोनियां भांडारें । शस्त्राग्रीं जिव्हारें । आरोपुनी ॥ २२० ॥
ऐसियांतें कैसेनि मारूं ? । कवणावरी शस्त्र धरूं ? । निजहृदया करूं । घातु केवीं ? ॥ २२१ ॥
हें नेणसी तूं कवण । परी पैल भीष्म द्रोण । जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत ॥ २२२ ॥
एथ शालक सासरे मातुळ । आणि बंधु कीं हे सकळ । पुत्र नातू केवळ । इष्टही असती ॥ २२३ ॥
अवधारी अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे । म्हणौनि दोष आथी वाचे । बोलितांचि ॥ २२४ ॥

एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन । अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ ३५॥
हे वरी भलतें करितु । आतांचि येथें मारितु । परि आपण मनें घातु । न चिंतावा ॥ २२५ ॥
त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल प्राप्त । तरी हें अनुचित । नाचरें मी ॥ २२६ ॥
जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कवणाच्या मनीं उरिजे ? । सांगे मुख केवीं पाहिजे । तुझें कृष्णा ? ॥ २२७ ॥
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन । पापमेवाऽऽश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥ ३६॥

जरी वधु करोनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा । मज जोडिलासि तुं हातींचा । दूरी होसी ॥ २२८ ॥
कुळहरणीं पातकें । तिये आंगीं जडती अशेखें । तये वेळीं तुं कवणें कें । देखावासी ? ॥ २२९ ॥
जैसा उद्यानामाजीं अनळु । संचारला देखोनि प्रबळु । मग क्षणभरी कोकिळु । स्थिरु नोहे ॥ २३० ॥
का सकर्दम सरोवरु । अवलोकूनि चकोरु । न सेवितु अव्हेरु । करूनि निघे ॥ २३१ ॥
तयापरी तुं देवा । मज झकवूं न येसीं मावा । जरी पुण्याचा वोलावा । नाशिजैल ॥ २३२ ॥

तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् । स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ ३७॥
म्हणोनि मी हें न करीं । इये संग्रामीं शस्त्र न धरीं । हें किडाळ बहुतीं परी । दिसतसे ॥ २३३ ॥
तुजसीं अंतराय होईल । मग सांगे आमुचें काय उरेल ? । तेणें दुःखें हियें फुटेल । तुजवीण कृष्णा ॥ २३४ ॥
म्हणौनि कौरव हे वधिजती । मग आम्ही भोग भोगिजती । हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे ॥ २३५ ॥

यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः । कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥ ३८॥
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् । कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ ३९॥
हे अभिमानमदें भुललें । जरी पां संग्रामा आले । तर्ही आम्हीं हित आपुलें । जाणावें लागे ॥ २३६ ॥
हें ऐसें कैसें करावें ? । जे आपुले आपण मारावे ? । जाणत जाणतांचि सेवावें । काळकूट ? ॥ २३७ ॥
हां जी मार्गीं चालतां । पुढां सिंहु जाहला आवचिता । तो तंव चुकवितां । लाभु आथी ॥ २३८ ॥
असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा । तरी तेथ कवणु देवा । लाभु सांगे ? ॥ २३९ ॥
कां समोर अग्नि देखोनी । जरी न वचिजे वोसंडोनी । तरी क्षणा एका कवळूनी । जाळूं सके ॥ २४० ॥
तैसे दोष हे मूर्त । अंगी वाजों असती पहात । हें जाणतांही केवीं एथ । प्रवर्तावें ? ॥ २४१ ॥
ऐसें पार्थु तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं । या कल्मषाची थोरी । सांगेन तुज ॥ २४२ ॥
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः । धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥ ४०॥

जैसें कष्ठें काष्ठ मथिजे । तेथ वन्हि एक उपजे । तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि ॥ २४३ ॥
तैसा गोत्रींचीं परस्परें । जरी वधु घडे मत्सरें । तरी तेणें महादोषें घोरें । कुळचि नाशे ॥ २४४ ॥
म्हणौनि येणें पापें । वंशजधर्मु लोपे । मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजीं ॥ २४५ ॥
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः । स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ॥ ४१॥

एथ सारासार विचारावें । कवणें काय आचारावें । आणि विधिनिषेध आघवे । पारुषती ॥ २४६ ॥
असता दीपु दवडिजे । मग अंधकारीं राहाटिजे । तरी उजूचि कां अडळिजे । जयापरी ॥ २४७ ॥
तैसा कुळीं कुळक्षयो होय । तये वेळीं तो आद्यधर्मु जाय । मग आन कांहीं आहे । पापावांचुनी ? ॥ २४८ ॥
जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रिये सैरा राहाटती । म्हणौनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥ २४९ ॥
उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती । जातिधर्म ॥ २५० ॥
जैसी चोहटाचिये बळी । पाविजे सैरा काउळीं । तैसीं महापापें कुळीं । संचरती ॥ २५१ ॥

सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च । पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥ ४२॥
मग कुळा तया अशेखा । आणि कुळघातकां । येरयेरां नरका । जाणें आथी ॥ २५२ ॥
देखें वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित । मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ॥ २५३ ॥
जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक क्रिया पारुखे । तेथ कवणा तिळोदकें । कवण अर्पी ? ॥ २५४ ॥
तरी पितर काय करिती ? । कैसेनि स्वर्गीं वसती ? । म्हणौनि तेही येती । कुळापासीं ॥ २५५ ॥
जैसा नखाग्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें । तेवीं आब्रह्म कुळ अवघें । आप्लविजे ॥ २५६ ॥

दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः । उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥ ४३॥
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन । नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ ४४॥
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् । यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ ४५॥
देवा अवधारी आणीक एक । एथ घडे महापातक । जे संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे ॥ २५७ ॥
जैसा घरीं आपुला । वानिवसें अग्नि लागला । तो आणिकांहीं प्रज्वळिला । जाळूनि घाली ॥ २५८ ॥
तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती । तेही बाधा पावती । निमित्तें येणें ॥ २५९ ॥
तैसें नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे तें कुळ । मग महाघोर केवळ । निरय भोगी ॥ २६० ॥
पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतींही उकलु नाहीं । येसणें पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे ॥ २६१ ॥
देवा हें विविध कानीं ऐकिजे । परी अझुनिवरी त्रासु नुपजे । हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारीं पां ॥ २६२ ॥
अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक । ऐसे जाणतांही दोख । अव्हेरू ना ? ॥ २६३ ॥
जे हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पां काय थेंकुलें । घडलें आम्हां ? ॥ २६४ ॥
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः । धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ॥ ४६॥

आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवें । जे शस्त्र सांडुनि साहावे । बाण यांचे ॥ २६५ ॥
तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें । परी येणें कल्मषें । चाड नाहीं ॥ २६६ ॥
ऐसें देखून सकळ । अर्जुनें आपुलें कुळ । मग म्हणे राज्य तें केवळ । निरयभोगु ॥ २६७ ॥
सञ्जय उवाच ।
एवमुक्त्वाऽर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् । विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ ४७॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
अर्जुनविषादयोगोनाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
अर्जुनविषादयोगोनाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
ऐसे तिये अवसरी । अर्जुन बोलिला समरीं । संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ॥ २६८ ॥
मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहींवरु आला । तेथ उडी घातली खालां । रथौनियां ॥ २६९ ॥
जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहतु । कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥ २७० ॥
नातरी महासिद्धिसंभ्रमें । जिंतिला तापसु भ्रमें । मग आकळूनि कामें । दीनु कीजे ॥ २७१ ॥
तैसा तो धर्नुधरु । अत्यंत दुःखें जर्जरु । दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ॥ २७२ ॥
मग धनुष्य बाण सांडिले । न धरत अश्रुपात आले । ऐसें ऐक राया वर्तलें । संजयो म्हणे ॥ २७३ ॥
आतां यापरी तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु । कवणेपरी परमार्थु । निरूपील ॥ २७४ ॥
ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकतां । ज्ञानदेव म्हणे आतां । निवृत्तिदासु ॥ २७५ ॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां प्रथमोऽध्यायः ॥मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहींवरु आला । तेथ उडी घातली खालां । रथौनियां ॥ २६९ ॥
जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहतु । कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥ २७० ॥
नातरी महासिद्धिसंभ्रमें । जिंतिला तापसु भ्रमें । मग आकळूनि कामें । दीनु कीजे ॥ २७१ ॥
तैसा तो धर्नुधरु । अत्यंत दुःखें जर्जरु । दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ॥ २७२ ॥
मग धनुष्य बाण सांडिले । न धरत अश्रुपात आले । ऐसें ऐक राया वर्तलें । संजयो म्हणे ॥ २७३ ॥
आतां यापरी तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु । कवणेपरी परमार्थु । निरूपील ॥ २७४ ॥
ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकतां । ज्ञानदेव म्हणे आतां । निवृत्तिदासु ॥ २७५ ॥
सारांश - अध्याय 1: अर्जुनविषादयोग(गीता श्लोक ३१ ते ३० / ज्ञानेश्वरी ओव्या १५१ ते २०६ )
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या
रथाचे सारथ्य करत आहे. अर्जुनाच्या सांगण्याप्रमाणे श्रीकृष्णाने दोन्ही
सैन्याच्या मधोमध रथ उभा केलेला आहे. रथ उभा केल्यानंतर अर्जुनाला असे दिसले की
ज्या ज्या लोकांशी त्याला युद्ध करायचे आहे, लढायचे आहे, त्या शत्रुसैन्यात सगळे आपलेच
लोकं आहेत. आपले बांधव, नातू, पणतू, पितामह भीष्मांचार्य, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि इतर आप्तेष्ट
आहेत. ह्या सगळ्या लोकांशी लढायचे आहे. ह्यांना मारून राज्य मिळवायचे आहे आणि नंतर
सिहांसनावर बसायचे आहे. ह्या कल्पनेने अर्जुन भाववश झालेला आहे. त्याला वाटते आहे
की हे युद्ध व्हायलाच नको. आपले गांडीव धनुष्य खाली टाकून युद्धाला नकार
देण्याच्या भूमिकेत अर्जुन आहे. भगवान श्रीकृष्णाला तो युद्ध न करण्याची आपली भूमिका आणि त्यामागचे तत्वज्ञान सांगतो आहे. हे कृष्णा ! आपल्याच माणसांशी युद्ध
करून मला काय मिळणार आहे? आपल्या
आप्तेष्टाना मारायचे आणि मग राज्य तरी कोणावर करायचे? वास्तविक तो क्षत्रिय आहे.
युद्ध करणे त्याचा स्वधर्म आहे. खरे तर अर्जुन ह्या युद्धात लढायला तयार झालेला
होता. कारण कौरवांनी खूप अन्यायकेलेला आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्यांना
जिंकायचे आहे अशा तयारीने तो युद्धात आलेला आहे. असे असताना देखील आपल्या
आप्तेष्टांना मारण्याच्या कल्पनेने युद्ध न करण्याचा मोह त्याला होतो आहे. पुढे
अर्जुन म्हणतो आहे, मला तर
असे वाटते आहे की ह्या युद्धाचे सर्व काही वाईटच परिणाम होणार आहेत. जर युद्ध झाले
नाही तर आपल्या गोत्रजांना मारण्याचे पाप आम्हाला लागणार नाही. ज्यांच्या सोबत
लढायचे आहे ते आपले सर्वस्व पणाला लावून आलेले आहेत. आपली बायकामुले, धनसंपत्ती, घरदार ह्यांचा त्याग करून आलेले
आहेत. युद्धात ते मारले गेले तर सर्व काही संपणार आहे. ह्या सर्व गोष्टींची जाणिव कौरवांना असताना देखील ते युद्धाला उभे राहिले आहे. ह्या युद्धात विजय मिळवून
राज्य करावे असे मला वाटत नाही.
आपल्या सगळ्या आप्तेष्टांना मारून राज्याचा उपभोग
भोगायचा त्यामधे काय आनंद
वा सुख आहे. आमचे प्राण जरी खर्च झाले तरी चालेल पण त्यांना मारण्याचा विचार
मी स्वप्नात सुद्धा करू शकत नाही. आपल्या स्वकीयांचा वध करून राज्य मिळवण्यासाठी
का आमचा जन्म झाला आहे? वडीलधाऱ्या लोकांच्या वधाची इच्छा करायची असेल तर
आम्ही जगावं तरी कशाला? पुत्र हा कुळाचा उद्धार करण्यासाठी असताना आम्ही तर त्यांचा
वध करायला निघालो आहे. त्यांचा घात करावा असे आम्ही मनात तरी कसे आणावे?
आमचे ह्रदय आम्ही वज्राप्रमाणे कठीण कसे करावे? अवतीभवतीच्या राज्यांचा पराभव
करून जिंकलेली राज्ये आपल्या वडीलधाऱ्यांच्या चरणांशी अर्पावे आणि त्यांचे आशिर्वाद घ्यावे. असे न करता त्यांनाच कसे मारावे? आपली धनसंपत्ती धर्म, देश आणि समाज ह्यासाठी पणाला लावून युद्धाला जे वीर उभे आहेत त्यांच्याशी मी कसा लढू? त्यांना आपले हित कळत नाही. पण आम्हाला समाजाचे हित कळत असताना देखील आम्ही युद्ध करावं का? आपलाच घात आपण कसा करावा? ज्यांच्या विषयी आमचे काही कर्तव्य आहे त्यांच्याशी लढाई करणे म्हणजे आपलाच आपण घात करण्यासारखे आहे असे तो श्रीकृष्णाला सांगतो आहे.

मेव्हणे, सासरे, मामा, मातुल ( माते कडील नातेसंबंधी ), बंधू, पुत्र आणि सर्व सखेसोयरे
ह्यांच्याशी युद्ध करून ह्यांना मारावे असे नुसते मुखाने बोलणे ह्याचा सुद्धा आम्हाला
दोष लागेल. युद्ध जिंकून हस्तिनापूरचे राज्य मिळेल. पण आता आम्हाला त्रैलोक्याचे
राज्य मिळाले तरी नको आहे. आम्हीच जर वाईट मार्गाने गेलो तर आम्ही तुला कसे
सामोरे जाऊ? महत भाग्याने तू मला गुरु म्हणून लाभला आहेस. मीच जर अनाचाराने
वागलो तर तू मला दुरावशील. तुझी माझ्यावर अवकृपा होईल. अवतीभवती कुणालाच
आमच्याविषयी प्रेम राहणार नाही. म्हणून मी गोत्रजांना मारायला तयार नाही. पापांचा
भागीदार व्हायला तयार नाही. कुळाचा नाश करण्याचे पातक मला लागेल.

दृष्टांत १: ज्याप्रमाणे
बागेत आग लागली तर झाडावर बसलेली कोकिळ पटकन तेथून
निघून जाते त्याप्रमाणे तुला जर वाटले की आम्ही वाईट वागतो आहे तर तू आमच्याजवळ थांबणार नाही.

दृष्टांत २: किंवा चिखलाने
भरलेल्या सरोवरात चकोर पक्षी थांबत नाही. त्याप्रमाणे तू
आमच्या जवळ थांबणार नाही.
आमच्या जवळ थांबणार नाही.
मी मायेत अडकलेलो आहे. मायेत
अडकल्यामुळे माझे पुण्य संपून जाईल आणि मला
पुन्हा तू प्राप्त होणार नाही. तू मला सोडून जावू नकोस, माझ्यावर तुझी अखंड कृपा राहू दे. आपल्या गोत्रजनांना मारण्याचे निंद्य कर्म आम्ही करणार नाही. तू जर आम्हाला
दुरावला तर आमच्याजवळ काय उरले? दुःखाने आमचे अंतःकरण फाटून जाईल. युद्ध सुरु
झाले तर मोठमोठाले वीर रणांगणावर मारले जातील.घरातील कर्ते पुरुष मारले जातील.
घराघरात फक्त स्त्रिया आणि लहान मुले उरतील. समाजाची सर्व व्यवस्था बिघडून जाईल
आणि ह्या कुलक्षयाला आम्ही कारणीभूत ठरू. कुलक्षयामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील.
घरातील कुलधर्म, कुळाचार, सनातन धर्म (पूर्वजांपासून चालत आलेले संस्कार ) कोण
सांभाळेल? स्त्रियांना कोणाचा आधार होईल? त्या इतरत्र आधार शोधतील त्यामुळे वर्णसंकर
चे प्रश्न निर्माण होतील. सगळी समाजव्यवस्था बिघडून जाईल. ह्या सगळ्यांना आम्ही
कारणीभूत ठरू. हे एवढे मोठे पातक आम्हाला लागेल. त्यापेक्षा एकवेळ राज्य मिळाले नाही तरी चालेल.

हे कृष्णा ! काळेकुट्ट विष कोणी
प्राशन करेल का? सिंह
असणाऱ्या वाटेवर कोणी जाईल का? दिव्याचा प्रकाश असताना कोणी अंधारात राहील का? वणवा पेटलेला असताना
त्याच्याजवळ मुद्दाम कोणी जाईल का? आणि गेला तर तो होरपळून जाईल.
लाकडावर लाकुड घासले तर अग्नि
निर्माण होतो. नंतर अग्निमध्ये दोन्हीही लाकडे जळून नष्ट होतात. त्याचप्रमाणे
कुळातील लोकआपसात लढल्याने सगळ्यांचाच विनाश होणार आहे. संपूर्ण कुळात अधर्म
माजेल. समाजातील लोक यमनियम पाळणार नाही. यमनियम संपले तर इंद्रिये स्वैर होतील.
समजा पायाच्या टोकाला साप चावला तर ते विष भराभर संपूर्ण अंगात पसरते, तसे एखाद्या घरात कुलक्षय झाला
तर तो एका कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही. एका कुटुंबात दुराचार बघून समाजातील
इतरही लोक वाईट वागायला लागतात. ज्यावेळी कुटुंबात अनाचार माजतो त्या वेळी नित्य
आणि नैमित्तिक कर्म व्यवस्थित पाळली जात नाही. त्याने सर्वांचेच स्वाथ्य बिघडेल.
सर्वांना नरकवास भोगावा लागेल. एकाद्या ठिकाणी महापातक घडले तर त्याचा दुसऱ्या
कुटुंबावर सुद्धा परिणाम होतो. एका घरात आग लागली तर शेजारील घर सुद्धा जळून जाते.
त्याचप्रमाणे एखाद्या घरात कोणी वाईट वागला तर दुसऱ्याला वाटेल त्याचे काय बिघडले, मग मी पण तसे वागले तर काय फरक
पडतो. कारण वाईट वागण्याचा परिणाम लगेच न दिसता काही काळानंतर दिसतो पण ज्या
वेळेस वाईट परिणाम दिसतात त्या वेळेस काहीच उपयोग होत नाही. त्या कुळाबरोबर जे
संबंध ठेवतील ते सुद्धा नाश पावतील.
हे कृष्णा! ह्या देहाला
राज्याचा उपभोग व्हावा, मानसन्मान
मिळावा म्हणून आम्ही एवढे मोठे पातक करावे का ? ज्या देहासाठी हे सर्व करायचे
तो तर नश्वर आहे. ही सुखं कायम टिकणारी नाही. क्षणिक असणाऱ्या देहासाठी एवढे पाप
करावे का ? आप्तेष्टांचा वध
करावा का? वध करण्याच्या हेतुने त्यांच्यावर नजर जरी टाकली तरी मला पाप लागेल.
दुर्योधनाने मला मारले तरी चालेल पण मी युद्ध करणार नाही. मी मरायला तयार आहे.
पण पापाचा वाटेकरी होण्यासाठी तयार नाही. अशा प्रकारचे राज्य मिळवणे म्हणजे
नरकवास सोसण्यासारखे आहे. असे पाप करणे नको, युद्ध नको आणि नरकवास हि नको.
हा सर्व वृत्तांत संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे. धृतराष्ट्राचे सर्व लक्ष युद्धभूमीवर लागले
आहे. आपली मुले जिंकतील का? पंडूच्या मुलांचे काय होईल? संजय सांगतो आहे की
अर्जुन अतिशय उद्विग्न झाला आहे आणि त्याला खूप गहिवरून आले आहे. त्याने रथातून
खाली उडी मारली आहे.

दृष्टात: राज्यावर बसलेल्या
एखाद्या राजकुमाराचे राज्य गेल्यावर तो जसा निस्तेज दिसतो किंवा सूर्यग्रहण लागले
तर सूर्य जसा तेजोहीन दिसतो किंवा सगळ्या सिद्धी प्राप्त करून घेतल्या आणि
सिद्धीतच अडकल्याने वासनांमधे जो गुरफटतो आणि केलेलं सर्व तप वाया जाते व तो
निस्तेज दिसतो. तसाच अर्जुन सुद्धा निस्तेज आणि तेजोहीन दिसतो आहे. ज्याला आपल्या
गांडीव धनुष्याचा अभिमान आहे, ज्याचा अपमान केलेला त्याला आवडत नाही, ते धनुष्य अर्जुनाने स्वतः खाली
टाकून दिले आहे. त्याच्या डोळ्याला अखंड अश्रुधारा लागल्या आहेत. अर्जुनाला असे
वाटते आहे कि आता तो खाली उतरल्याने युद्ध टळणार आहे.
आता हे सगळे घडल्यानंतर भगवान
वैकुंठनाथ श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगणार आहे हे आपण पुढील अध्यायात अभ्यासणार आहोत.
Note: अष्टांग योग: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी.
यम मध्ये पुन्हा पाच गोष्टी
आहेत. त्या म्हणजे अहिंसा ( दुसऱ्याचे मन दुखावणे सुद्धा
अहिंसा आहे), सत्य, अस्तेय (कुणाची चहाडी न करणे, निंद्य कर्म न करणे) , ब्रह्मचर्य
आणि अपरिग्रह (अति साठा न करणे ) .

नियम मधे येणाऱ्या गोष्टी
म्हणजे संतोष, शौच (
देहाची आणि मनाची शुचिता), तपश्चर्य,
स्वाध्याय ( आत्मचिंत्तन करणे ), आणि ईश्वरप्रणीधान

No comments:
Post a Comment