अध्याय १७ : ओव्या १७१-२२४

 २०  जून २०२१ निरुपण 

अध्याय १७ ।  श्रद्धात्रयविभागयोगः । ( श्लोक ११-१५ / ज्ञानेश्वरी ओव्या १७१-२२४ )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.  


अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते  यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥ ११॥

तरी एकु प्रियोत्तमु-/ । वांचोनि वाढों नेदी कामु । जैसा का मनोधर्मु । पतिव्रतेचा ॥ १७१ ॥
नाना सिंधूतें ठाकोनि गंगा । पुढारां न करीचि रिगा । का आत्मा देखोनि उगा । वेदु ठेला ॥ १७२ ॥
तैसें जे आपुल्या स्वहितीं । वेंचूनियां चित्तवृत्ती । नुरवितीचि अहंकृती । फळालागीं ॥ १७३ ॥
पातलेया झाडाचें मूळ । मागुतें सरों नेणेंचि जळ । जिरालें गां केवळ । तयाच्याचि आंगीं ॥ १७४ ॥
तैसें मनें देहीं । यजननिश्चयाच्या ठायीं । हारपोनि जें कांहीं । वांछितीना ॥ १७५ ॥
तिहीं फळवांच्छात्यागीं । स्वधर्मावांचूनि विरागीं । कीजे तो यज्ञु सर्वांगीं । अळंकृतु ॥ १७६ ॥
परी आरिसा आपणपें । डोळां जैसें घेपें । कां तळहातींचें दीपें । रत्‍न पाहिजे ॥ १७७ ॥
नाना उदितें दिवाकरें । गमावा मार्गु दिठी भरे । तैसा वेदु निर्धारें । देखोनियां ॥ १७८ ॥
तियें कुंडें मंडप वेदी । आणीकही संभारसमृद्धी । ते मेळवणी जैसी विधी । आपणपां केली ॥ १७९ ॥
सकळावयव उचितें । लेणीं पातलीं जैसीं आंगातें । तैसे पदार्थ जेथिंचे तेथें । विनियोगुनी ॥ १८० ॥
काय वानूं बहुतीं बोलीं । जैसी सर्वाभरणीं भरली ।ते यज्ञविद्याचि रूपा आली । यजनमिषें ॥ १८१ ॥
तैसा सांगोपांगु । निफजे जो यागु । नुठऊनियां लागु । महत्त्वाचा ॥ १८२ ॥
प्रतिपाळु तरी पाटाचा । झाडीं कीजे तुळसीचा । परी फळा फुला छायेचा । आश्रयो नाहीं ॥ १८३ ॥
किंबहुना फळाशेवीण । ऐसेया निगुती निर्माण । होय तो यागु जाण । सात्त्विकु गा ॥ १८४ ॥

अभिसन्धाय तु फलं दंभार्थमपि चैव यत् । इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम् ॥ १२॥

आतां यज्ञु कीर वीरेशा । करी पैं याचि{ऐ}सा । परी श्राद्धालागीं जैसा । अवंतिला रावो ॥ १८५ ॥
जरी राजा घरासि ये । तरी बहुत उपेगा जाये । आणि कीर्तीही होये । श्राद्ध न ठके ॥ १८६ ॥
तैसा धरूनि आवांका । म्हणे स्वर्गु जोडेल असिका । दीक्षितु होईन मान्यु लोकां । घडेल यागु ॥ १८७ ॥
ऐसी केवळ फळालागीं । महत्त्व फोकारावया जगीं । पार्था निष्पत्ति जे यागीं । राजस पैं ते ॥ १८८ ॥

विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम् । श्रद्दाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ॥ १३॥

आणि पशुपक्षिविवाहीं । जोशी कामापरौता नाहीं । तैसा तामसा यज्ञा पाहीं । आग्रहोचि मूळ ॥ १८९ ॥
वारया वाट न वाहे । कीं मरण मुहूर्त पाहे । निषिद्धांसीं बिहे । आगी जरी ॥ १९० ॥
तरी तामसाचिया आचारा । विधीचा आथी वोढावारा । म्हणूनि तो धनुर्धरा । उत्सृंखळु ॥ १९१ ॥
नाहीं विधीची तेथ चाड । नये मंत्रादिक तयाकड । अन्नजातां न सुये तोंड । मासिये जेवीं ॥ १९२ ॥
वैराचा बोधु ब्राह्मणा । तेथ कें रिगेल दक्षिणा । अग्नि जाला वाउधाणा । वरपडा जैसा ॥ १९३ ॥
तैसें वायांचि सर्वस्व वेंचे । मुख न देखती श्रद्धेचें । नागविलें निपुत्रिकाचें । जैसें घर ॥ १९४ ॥
ऐसा जो यज्ञाभासु । तया नाम यागु तामसु । आइकें म्हणे निवासु । श्रियेचा तो ॥ १९५ ॥
आता गंगेचें एक पाणी । परी नेलें आनानीं वाहणीं । एक मळीं एक आणी । शुद्धत्व जैसें ॥ १९६ ॥
तैसें तिहीं गुणीं तप । येथ जाहलें आहे त्रिरूप । तें एक केलें दे पाप । उद्धरी एक ॥ १९७ ॥
तरी तेंचि तिहीं भेदीं । कैसेनि पां म्हणौनि सुबुद्धी । जाणों पाहासी तरी आधीं । तपचि जाण ॥ १९८ ॥
येथ तप म्हणजे काई । तें स्वरूप दाऊं पाहीं । मग भेदिलें गुणीं तिहीं । तें पाठीं बोलों ॥ १९९ ॥
तरी तप जें कां सम्यक् । तेंही त्रिविध आइक । शारीर मानसिक । शाब्द गा ॥ २०० ॥
आतां गा तिहीं माझारीं । शारीर तंव अवधारीं ।तरी शंभु कां श्रीहरी । पढियंता होय ॥ २०१ ॥

देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम्  ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥ १४॥

तया प्रिया देवतालया । यात्रादिकें करावया । आठही पाहार जैसें पायां । उळिग घापे ॥ २०२ ॥
देवांगणमिरवणियां । अंगोपचार पुरवणियां ।करावया म्हणियां । शोभती हात ॥ २०३ ॥
लिंग कां प्रतिमा दिठी । देखतखेंवों अंगेष्टी । लोटिजे कां काठी । पडली जैसी ॥ २०४ ॥
आणि विधिविनयादिकीं । गुणीं वडील जे लोकीं । तया ब्राह्मणाची निकी । पाइकी कीजे ॥ २०५ ॥
अथवा प्रवासें कां पीडा । का शिणले जे सांकडां । ते जीव सुरवाडा । आणिजती ॥ २०६ ॥
सकल तीर्थांचिये धुरे । जियें कां मातापितरें । तयां सेवेसी कीर शरीरें । लोण कीजे ॥ २०७ ॥
आणि संसारा{ऐ}सा दारुणु । जो भेटलाचि हरी शीणु । तो ज्ञानदानीं सकरुणु । भजिजे गुरु ॥ २०८ ॥
आणि स्वधर्माचा आगिठां । देह जाड्याचिया किटा । आवृत्तिपुटीं सुभटा । झाडी कीजे ॥ २०९ ॥
वस्तु भूतमात्रीं नमिजे । परोपकारीं भजिजे । स्त्रीविषयीं नियमिजे । नांवें नांवें ॥ २१० ॥
जन्मतेनि प्रसंगे । स्त्रीदेह शिवणें आंगें । तेथूनि जन्म आघवें । सोंवळें कीजे ॥ २११ ॥
भुतमात्राचेनि नांवें । तृणही नासुडावें । किंबहुना सांडावे । छेद भेद ॥ २१२ ॥
ऐसैसी जैं शरीरीं । रहाटीची पडे उजरी । तैं शारीर तप घुमरी । आलें जाण ॥ २१३ ॥
पार्था समस्तही हें करणें । देहाचेनि प्रधानपणें । म्हणौनि ययातें मी म्हणें । शारीर तप ॥ २१४ ॥
एवं शारीर जें तप । तयाचें दाविलें रूप । आतां आइक निष्पाप । वाङ्मय तें ॥ २१५ ॥

अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् । स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥ १५॥

तरी लोहाचें आंग तुक । न तोडितांचि कनक । केलें जैसें देख । परीसें तेणें ॥ २१६ ॥
तैसें न दुखवितां सेजे । जावळिया सुख निपजे । ऐसें साधुत्व कां देखिजे । बोलणां जिये ॥ २१७ ॥
पाणी मुदल झाडा जाये । तृण ते प्रसंगेंचि जियें । तैसें एका बोलिलें होये । सर्वांहि हित ॥ २१८ ॥
जोडे अमृताची सुरसरी । तैं प्राणांतें अमर करी । स्नानें पाप ताप वारी । गोडीही दे ॥ २१९ ॥
तैसा अविवेकुही फिटे । आपुलें अनादित्व भेटे । आइकतां रुचि न विटे । पीयुषीं जैसी ॥ २२० ॥
जरी कोणी करी पुसणें । तरी होआवें ऐसें बोलणें । नातरी अवर्तणें । निगमु का नाम ॥ २२१ ॥
ऋग्वेदादि तिन्ही । प्रतिष्ठीजती वाग्भुवनीं । केली जैसी वदनीं । ब्रह्मशाळा ॥ २२२ ॥
नातरी एकाधें नांव । तेंचि शैव का वैष्णव ।वाचे वसे तें वाग्भव । तप जाणावें ॥ २२३ ॥
आतां तप जें मानसिक । तेंही सांगों आइक । म्हणे लोकनाथनायक । नायकु तो ॥ २२४ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099