७ ऑक्टोबर २०१७ निरुपण
अध्याय ३: कर्मयोग (गीता श्लोक १३ / ज्ञानेश्वरी ओव्या ११९-१३३ )
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः । भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥ १३॥
देखा विहित क्रियाविधि । निर्हेतुका बुद्धि । जो असतिये समृद्धि । विनियोगु करी ॥ ११९ ॥
गुरु गोत्र अग्नि पूजी । अवसरीं भजे द्विजीं । निमित्तादिकीं यजी । पितरोद्देशें ॥ १२० ॥
या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशीं हवन करितां । हुतशेष स्वभावतः । उरे जें जें ॥ १२१ ॥
तें सुखें आपुले घरीं । कुटुंबेंसी भोजन करी । कीं भोग्यचि तें निवारी । कल्मषातें ॥ १२२ ॥
तें यज्ञावशिष्ट भोगी । म्हणौनि सांडिजे तो अघीं । जयापरीं महारोगी । अमृतसिद्धि ॥ १२३ ॥
कीं तत्त्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा । तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ॥ १२४ ॥
म्हणौनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेंचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥ १२५ ॥
हें वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा । ऐसी आद्य हे कथा । श्रीमुरारी सांगे ॥ १२६ ॥
जे देहचि आपणपें मानिती । आणि विषयांतें भोग्य म्हणती । यापरतें न स्मरती । आणिक कांहीं ॥ १२७ ॥
हें यज्ञोपकरण सकळ । नेणतसां ते बरळ । अहंबुद्धि केवळ । भोगूं पाहती ॥ १२८ ॥
इंद्रियरुचीसारिखें । करविती पाक निके । ते पापिये पातकें । सेविती जाण ॥ १२९ ॥
संपत्तिजात आघवें । हें हवनद्रव्य मानावें । मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषीं ॥ १३० ॥
हें सांडोनियां मूर्ख । आपणपेंयालागीं देख । निपजविती पाक । नानाविध ॥ १३१ ॥
जिहीं यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये । तें हें सामान्य अन्न न होये । म्हणौनियां ॥ १३२ ॥
हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण । जें जीवनहेतु कारण । विश्वा यया ॥ १३३ ॥

No comments:
Post a Comment