अध्याय १८ : ओव्या ७४५-७९३

 १०  ऑक्टोबर २०२१ निरुपण 

अध्याय १८ ।  मोक्षसंन्यासयोग: । ( श्लोक  ३४-३७ / ज्ञानेश्वरी ओव्या ७४५-७९३ )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.   

यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन । प्रसण्‌गेन फलाकाण्‌क्षी धृतिः सा पार्थ राजसी ॥ ३४॥

आणि होऊनियां शरीरी । स्वर्गसंसाराच्या दोहीं घरीं । नांदे जो पोटभरी । त्रिवर्गोपायें ॥ ७४५ ॥
तो मनोरथांच्या सागरीं । धर्मार्थकामांच्या तारुवावरी । जेणें धैर्यबळें करी । क्रिया\-वणिज ॥ ७४६ ॥
जें कर्म भांडवला सूये । तयाची चौगुणी येती पाहे । येवढें सायास साहे । जया धृती ॥ ७४७ ॥
ते गा धृती राजस । पार्था येथ परीयेस । आतां आइक तामस । तिसरी जे कां ॥ ७४८ ॥


यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च । न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी ॥ ३५॥

तरी सर्वाधमें गुणें । जयाचें कां रूपा येणें । कोळसा काळेपणें । घडला जैसा ॥ ७४९ ॥
अहो प्राकृत आणि हीनु । तयाही कीं गुणत्वाचा मानु । तरी न म्हणिजे पुण्यजनु । राक्षसु काई ?॥ ७५० ॥
पैं ग्रहांमाजीं इंगळु । तयातें म्हणिजे मंगळु । तैसा तमीं धसाळु । गुणशब्दु हा ॥ ७५१ ॥
जे सर्वदोषांचा वसौटा । तमचि कामऊनि सुभटा । उभारिला आंगवठा । जया नराचा ॥ ७५२ ॥
तो आळसु सूनि असे कांखे । म्हणौनि निद्रे कहीं न मुके । पापें पोषितां दुःखें । न सांडिजे जेवीं ॥ ७५३ ॥
आणि देहधनाचिया आवडी । सदा भय तयातें न सांडी । विसंबूं न सके धोंडीं । काठिण्य जैसें ॥ ७५४ ॥
आणि पदार्थजातीं स्नेहो । बांधे म्हणौनि तो शोकें ठावो । केला न शके पाप जावों । कृतघ्नौनि जैसें ॥ ७५५ ॥
आणि असंतोष जीवेंसीं । धरूनि ठेला अहर्निशीं । म्हणौनि मैत्री तेणेंसीं । विषादें केली ॥ ७५६ ॥
लसणातें न सांडी गंधी । कां अपथ्यशीळातें व्याधी । तैसी केली मरणावधी । विषादें तया ॥ ७५७ ॥
आणि वयसा वित्तकामु । ययांचा वाढवी संभ्रमु । म्हणौनि मदें आश्रमु । तोचि केला ॥ ७५८ ॥
आगीतें न सांडी तापु । सळातें जातीचा सापु । कां जगाचा वैरी वासिपु । अखंडु जैसा ॥ ७५९ ॥
नातरी शरीरातें काळु । न विसंबे कवणे वेळु । तैसा आथी अढळु । तामसीं मदु ॥ ७६० ॥
एवं पांचही हे निद्रादिक । तामसाच्या ठाईं दोख । जिया धृती देख । धरिलें आहाती ॥ ७६१ ॥
तिये गा धृती नांवें । तामसी येथ हें जाणावें । म्हणितलें तेणें देवें । जगाचेनी ॥ ७६२ ॥
एवं त्रिविध जे बुद्धि । कीजे कर्मनिश्चयो आधि । तो धृती या सिद्धि । नेइजो येथ ॥ ७६३ ॥
सूर्यें मार्गु गोचरु होये । आणि तो चालती कीर पाये । परी चालणें तें आहे । धैर्यें जेवीं ॥ ७६४ ॥
तैसी बुद्धि कर्मातें दावी । ते करणसामग्री निफजवी । परी निफजावया होआवी । धीरता जे ॥ ७६५ ॥
ते हे गा तुजप्रती । सांगीतली त्रिविध धृती । यया कर्मत्रया निष्पत्ती । जालिया मग ॥ ७६६ ॥
येथ फळ जें एक निफजे । सुख जयातें म्हणिजे । तेंही त्रिविध जाणिजे । कर्मवशें ॥ ७६७ ॥
तरी फळरूप तें सुख । त्रिगुणीं भेदलें देख । विवंचूं आतां चोख । चोखीं बोलीं ॥ ७६८ ॥
परी चोखी ते कैसी सांगे । पैं घेवों जातां बोलबगें । कानींचियेही लागे । हातींचा मळु ॥ ७६९ ॥
म्हणौनि जयाचेनि अव्हेरें । अवधानही होय बाहिरें । तेणें आइक हो आंतरें । जीवाचेनि जीवें ॥ ७७० ॥
ऐसें म्हणौनि देवो । त्रिविधा सुखाचा प्रस्तावो । मांडला तो निर्वाहो । निरूपित असें ॥ ७७१ ॥


सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ । अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति ॥ ३६॥

म्हणे सुखत्रयसंज्ञा । सांगों म्हणौनि प्रतिज्ञा । बोलिलों तें प्राज्ञा । ऐक आतां ॥ ७७२ ॥
तरी सुख तें गा किरीटी । दाविजेल तुज दिठी । जें आत्मयाचिये भेटी । जीवासि होय ॥ ७७३ ॥
परी मात्रेचेनि मापें । दिव्यौषध जैसें घेपें । कां कथिलाचें कीजे रुपें । रसभावनीं ॥ ७७४ ॥
नाना लवणाचें जळु । होआवया दोनि चार वेळु । देऊनि सांडिजती ढाळु । तोयाचें जेवीं ॥ ७७५ ॥
तेवीं जालेनि सुखलेशें । जीवु भाविलिया अभ्यासें । जीवपणाचें नासे । दुःख जेथें ॥ ७७६ ॥
तें येथ आत्मसुख । जालें असे त्रिगुणात्मक । तेंही सांगों एकैक । रूप आतां ॥ ७७७ ॥


यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम् । तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ॥ ३७॥

आतां चंदनाचें बूड । सर्पी जैसें दुवाड । कां निधानाचें तोंड । विवसिया जेवीं ॥ ७७८ ॥

अगा स्वर्गींचें गोमटें । आडव यागसंकटें । कां बाळपण दासटें । त्रासकाळें ॥ ७७९ ॥

हें असो दीपाचिये सिद्धी । अवघड धू आधीं । नातरी तो औषधीं । जिभेचा ठावो ॥ ७८० ॥
तयापरी पांडवा । जया सुखाचा रिगावा । विषम तेथ मेळावा । यमदमांचा ॥ ७८१ ॥
देत सर्वस्नेहा मिठी । आगीं ऐसें वैराग्य उठी । स्वर्ग संसारा कांटी । काढितचि ॥ ७८२ ॥
विवेकश्रवणें खरपुसें । जेथ व्रताचरणें कर्कशें । करितां जाती भोकसे । बुद्ध्यादिकांचे ॥ ७८३ ॥
सुषुम्नेचेनि तोंडें । गिळिजे प्राणापानाचे लोंढे । बोहणियेसीचि येवढें । भारी जेथ ॥ ७८४ ॥
जें सारसांही विघडतां । होय वोहाहूनि वस्त काढितां । ना भणंगु दवडितां । भाणयावरुनी ॥ ७८५ ॥
पैं मायेपुढौनि बाळक । काळें नेतां एकुलतें एक ।होय कां उदक । तुटतां मीना ॥ ७८६ ॥
तैसें विषयांचें घर । इंद्रियां सांडितां थोर । युगांतु होय तें वीर । विराग साहाती ॥ ७८७ ॥
ऐसा जया सुखाचा आरंभु । दावी काठिण्याचा क्षोभु । मग क्षीराब्धी लाभु । अमृताचा जैसा ॥ ७८८ ॥
पहिलया वैराग्यगरळा । धैर्यशंभु वोडवी गळा । तरी ज्ञानामृतें सोहळा । पाहे जेथें ॥ ७८९ ॥
पैं कोलिताही कोपे ऐसें । द्राक्षांचें हिरवेपण असे । तें परीपाकीं कां जैसें । माधुर्य आते ॥ ७९० ॥
तें वैराग्यादिक तैसें । पिकलिया आत्मप्रकाशें । मग वैराग्येंसींही नाशे । अविद्याजात ॥ ७९१ ॥
तेव्हां सागरीं गंगा जैसी । आत्मीं मीनल्या बुद्धि तैसी । अद्वयानंदाची आपैसी । खाणी उघडे ॥ ७९२ ॥
ऐसें स्वानुभवविश्रामें । वैराग्यमूळ जें परिणमे । तें सात्विक येणें नामें । बोलिजे सुख ॥ ७९३ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099