१८ नोव्हेंबर २०१७ निरुपण
अध्याय ३: कर्मयोग (गीता श्लोक २९-३३ / ज्ञानेश्वरी ओव्या १८४-२०९ )
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । तानकृत्स्नविदो मन्दांकृत्स्नविन्न विचालयेत् ॥ २९॥
एथ कर्मीं तोचि लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे । प्रकृतीचेनि आटोपे । वर्ततु असे ॥ १८४ ॥
इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें । तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥ १८५ ॥

मयि सर्वाणि कर्माणि सन्यस्याध्यात्मचेतसा । निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ ३०॥
तरी उचितें कर्में आघवीं । तुवां आचरोनि मज अर्पावीं ।परी चित्तवृत्ति न्यासावी । आत्मरूपीं ॥ १८६ ॥
आणि हें कर्म मी कर्ता । कां आचरैन या अर्था । ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगों देसीं ॥ १८७ ॥
तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें । मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥ १८८ ॥
आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इयें रथीं । देईं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ॥ १८९ ॥
जगीं कीर्ति रूढवीं । स्वधर्माचा मानु वाढवीं । इया भारापासोनि सोडवीं । मेदिनी हे ॥ १९० ॥
आतां पार्था निःशंकु होईं । या संग्रामा चित्त देईं । एथ हें वांचूनि कांहीं । बोलों नये ॥ १९१ ॥
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः । श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३१॥

हें अनुपरोध मत माझें । जिहीं परमादरें स्वीकारिजे । श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा ॥ १९२ ॥
तेही सकळ कर्मीं वर्ततु । जाण पां कर्मरहितु । म्हणौनि हें निश्चितु । करणीय गा ॥ १९३ ॥
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् । सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥ ३२॥

नातरी प्रकृतिमंतु हौनी । इंद्रियां लळा देउनी । जें हें माझें मत अव्हेरुनी । ओसंडिती ॥ १९४ ॥
जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करूनि देखती । कां हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें ॥ १९५ ॥
ते मोहमदिरा भुलले । विषयविखें घारले । अज्ञानपंकीं बुडाले । निभ्रांत मानीं ॥ १९६ ॥
देखैं शवाच्या हातीं दिधलें । जैसें रत्न कां वायां गेलें । नातरी जात्यंधा पाहलें । प्रमाण नोहे ॥ १९७ ॥
कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा न वचे वायसा । मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ॥ १९८ ॥
तैसे जे पार्था । विमुख या परमार्था । तयांसी संभाषण सर्वथा । करावेना ॥ १९९ ॥
म्हणौनि ते न मानिती । आणि निंदाही करूं लागती । सांगैं पतंगु काय साहती । प्रकाशातें ? ॥ २०० ॥
पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचुक मरण । तेंवीं विषयाचरण । आत्मघाता ॥ २०१ ॥

सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि । प्रकृतिं यान्ति भुउतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३३॥
म्हणौनि इंद्रियें एकें । जाणतेनि पुरुखें । लाळावीं ना कौतुकें । आदिकरुनी ॥ २०२ ॥
हां गा सर्पेसीं खेळों येईल ? । कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धि जाईल ? । सांगैं हाळाहाळ जिरेल । सेविलिया काई ? ॥ २०३ ॥
देखैं खेळतां अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला । तैसा इंद्रियां लळा दिधला । भला नोहे ॥ २०४ ॥
एर्हवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना । कां नाना भोगरचना । मेळवावी ? ॥ २०५ ॥
आपण सायासेंकरुनि बहुतें । सकळहि समृद्धिजातें । उदोअस्तु या देहातें । प्रतिपाळावें कां ? ॥ २०६ ॥
सर्वस्वें शिणोनि एथें । अर्जवावीं संपत्तिजातें । तेणें स्वधर्मु सांडुनि देहातें । पोखावें का{ई ॥ २०७ ॥
मग हे तंव पांचमेळावा । शेखीं अनुसरेल पंचत्वा । ते वेळीं केला कें गिंवसावा । शीणु आपुला ॥ २०८ ॥
म्हणौनि केवळ देहभरण । ते जाणें उघडी नागवण । यालागीं एथ अंतःकरण । देयावेंना ॥ २०९ ॥

No comments:
Post a Comment