२८ जानेवारी २०१८ निरुपण
अध्याय ४ : ज्ञानकर्मसंन्यासयोग (गीता श्लोक १-४ / ज्ञानेश्वरी ओव्या १-४० )
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ चतुर्थोऽध्यायः – अध्याय चवथा ।
। ज्ञाकर्मसंन्यासयोगः ।
आजि श्रवणेंद्रियां पाहलें । जें येणें गीतानिधान देखिलें । आतां स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें ॥ १ ॥
आधींचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी।आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥ २ ॥
जैसा पंचमालापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु । तैसा भला जाहला विनोदु । कथेचा इये ॥ ३ ॥
कैसी आगळिक दैवाची । जे गंगा जोडली अमृताची ।हो कां जपतपें श्रोतयांचीं । फळा आलीं ॥ ४ ॥
आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें ।मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें ॥ ५ ॥
हा अतिसो अतिप्रसंगें । सांडूनि कथाचि ते सांगें । जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते ॥ ६ ॥
ते वेळीं संजयो रायातें म्हणे । अर्जुनु अधिष्ठिला दैवगुणें । जे अतिप्रीति श्रीनारायणें । बोलतु असे ॥ ७ ॥
जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगेचि माते देवकीसी । जें न संगेचि बंधु बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंशीं बोलत ॥ ८ ॥
देवी लक्ष्मीयेवढी जवळिक । परी तेही न देखे या प्रेमाचें सुख । आजि कृष्णस्नेहाचें बिक । यातेंचि आथी ॥ ९ ॥
सनकादिकांचिया आशा । वाढीनल्या होतिया कीर बहुवसा ।परी त्याही येणें मानें यशा । येतीचिना ॥ १० ॥
या जगदीश्वराचें प्रेम । एथ दिसतसें निरुपम ।कैसें पार्थें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें ॥ ११ ॥
हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती ।मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥ १२ ॥
एर्हवीं हा योगियां नाडळे । वेदार्थासी नाकळे ।जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ॥ १३ ॥
तो हा निजस्वरूप । अनादि निष्कंप ।परी कवणें मानें सकृप । जाहला आहे ॥ १४ ॥
हा त्रैलोक्यपटाची घडी । आकारची पैलथडी ।कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥ १५ ॥

श्रीभगवानुवाच ।
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् । विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥ १॥

मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता । कथिला परी ते वार्ता । बहुतां दिवसांची ॥ १६ ॥
मग तेणें विवस्वतें रवी । हे योगस्थिति आघवी । निरूपिली बरवी । मनूप्रती ॥ १७ ॥
मनूनें आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली । ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ॥ १८ ॥

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः । स कालेनेह महता योगो नष्टः परंतप ॥ २॥
मग आणिकही या योगातें । राजर्षि जाहले जाणते । परी तेथोनि आतां सांप्रतें । नेणिजे कोण्ही ॥ १९ ॥
जे प्राणियां कामीं भरु । देहाचिवरी आदरु । म्हणौनि पडिला विसरु । आत्मबोधाचा ॥ २० ॥
अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखची परमावधि । जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ॥ २१ ॥
एरव्हीं तरी खवणेयांच्या गांवीं । पाटाउवें काय करावीं । सांगें जात्यंधा रवी । काय आथी ? ॥ २२ ॥
कां बहिरयांच्या आस्थानीं । कवण गीतातें मानीं । कीं कोल्हेया चांदणीं । आवडी उपजें ? ॥ २३ ॥
पैं चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते । ते काउळे केवीं चंद्रातें । वोळखती ? ॥ २४ ॥
तैसी वैराग्याची शिंव न देखती । जे विवेकाची भाष नेणती ? । ते मूर्ख केंवीं पावती । मज ईश्वरातें ? ॥ २५ ॥
कैसा नेणों मोहो वाढीनला । तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला । म्हणौनि योगु हा लोपला । लोकीं इये ॥ २६ ॥
स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः । भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥ ३॥

तोचि हा आजि आतां । तुजप्रती कुंतीसुता । सांगितला आम्हीं तत्त्वतां । भ्रांति न करीं ॥ २७ ॥
हें जीवींचें निज गुज । परी केवीं राखों तुज । जे पढियेसी तूं मज । म्हणौनियां ॥ २८ ॥
तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा । मैत्रियेचि चित्कळा । धनुर्धरा ॥ २९ ॥
तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों ? । जर्ही संग्रामारूढ आहों । जाहलों आम्ही ॥ ३० ॥
तरी नावेक हें सहावें । गाजाबज्यही न धरावें । परी तुझें अज्ञानत्व हरावें । लागे आधीं ॥ ३१ ॥

अर्जुन उवाच ।
अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः । कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४॥

तंव अर्जुन म्हणे श्रीहरी । माय आपुलेयाचा स्नेहो करी । एथ विस्मयो काय अवधारीं । कृपानिधी ॥ ३२ ॥
तूं संसारश्रांतांची साउली । अनाथ जीवांची माउली । आमुतें कीर प्रसवली । तुझीच कृपा ॥ ३३ ॥
देवा पांगुळ एकादें विजे । तरी जन्मौनि जोजारु साहिजे । हें बोलों काय तुझें । तुजचि पुढां ॥ ३४ ॥
आतां पुसेन जें मी कांहीं । तेथ निकें चित्त देईं । तेवींचि देवें कोपावें ना कांहीं । बोला एका ॥ ३५ ॥
तरी मागील जे वार्ता । तुवां सांगितली होती अनंता । ते नावेक मज चित्ता । मानेचिना ॥ ३६ ॥
जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसें हें वडिलां ठाउवें नाहीं । तरी तुवांचि केवीं पाहीं । उपदेशिला ? ॥ ३७ ॥
तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव श्रीकृष्ण सांपेचा । म्हणौनि गा इये मातुचा । विसंवादु ॥ ३८ ॥
तेवींचि देवा चरित्र तुझें । आपण कांहींचि नेणिजे । हें लटिकें केवीं म्हणिजे । एकिहेळां ? ॥ ३९ ॥
परि हेचि मातु आघवी । मी परियेसें ऐशी सांगावी । जे तुवांचि रवी केवीं । पाही उपदेशु केला ॥ ४० ॥

No comments:
Post a Comment