अध्याय ३ - स्वाध्याय

मी आचरणात आणलेला कर्मयोग
तिसरा अध्याय पूर्ण झाल्यावर  प्रत्येकाने मला कळलेला आणि मी आचरणात आणलेला कर्मयोग यावर बोलायचे असे ठरले आणि सर्वांनी ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग हे नाव सार्थ केले.

मला कळलेला कर्मयोग यावर बोलणे सोपे पण मी आचरणात आणलेला कर्मयोग यावर बोलणे कठीण असे सर्वांनाच वाटले पण तरीही प्रत्येकाने कर्मयोगाची कोणती सूत्री आपण आपली आयुष्यात कधी आणि कशी अमलात आणली ? कधी ती लागू पडली आणि कधी नाही याचे विवरण सर्वांसमोर प्रांजळपणे मांडले.

विवेकदादानी सर्वानांच तिसऱ्या अध्यायाचे सार म्हणजे पंचसूत्री काढून दिली. जीवनात आलेल्या  प्रत्येक प्रसंगाला ह्या पंचसूत्रीच्या आधारे सामोरे जाता येईल.
१. आगते स्वागतो कुर्यात
माझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक प्रसंग मी आनंदाने स्वीकारेन
२. राम कर्ता
प्रत्येक कर्म मी मला काही मिळवायचे आहे म्हणून मी करत नाही तर राम माझ्याकडून हे कर्म करून घेत आहे हा भाव मी सदैव ठेवेन.
३. स्वधर्म
माझी सर्व कर्तव्ये मी चोख पार पाडेन, सर्व मनापासून करेन.
४. राम भोक्ता
कर्मातून मिळणारी सर्व फळे माझा रामच मला देतो आहे त्यामुळे फळे त्यालाच अर्पण
५. प्रसादबुद्धी
प्रत्येक मिळणारे फळ मी आनंदाने प्रसाद म्हणून ग्रहण करेन

प्रत्येकाचे स्वतःचे चिंतन आणि केलेला अभ्यास जाणवत होता.  सर्वांचीच तिसऱ्या अध्यायाची उजळणी झाली. ह्या स्वाध्यायांमुळे  उत्साह वाढलेला आहे आणि सर्वांनाच आता चौथ्या अध्यायाची उत्सुकता लागलेली आहे.

धनश्रीताई कुलकर्णी यांनी सुंदर विवरण केले.
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

अर्चनाताई खानजोडे, तोरो काका, अमित ब्रह्मे  यांनी सुंदर विवरण केले.
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

प्राची ब्रह्मे , वीणा फाटककाकू, कल्पना आठवलेकाकू  यांनी विवरण केले.
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

अनिरुद्धदादा कुलकर्णी, प्रशांतदादा खानजोडे  यांनी शास्त्रोक्त विवरण केले.
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

फिरोदिया काकू आणि मंजीरीताई सबनीस यांनी स्वानुभव सांगितले.
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

तेजस्विनीताई आणि समीरदादा बोरीकर यांनी त्यांचे रोजच्या जीवनातले अनुभव कथन केले.
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

जयश्रीताई कवडे हिने संपूर्ण तिसऱ्या अध्यायाची summary सांगून स्वाध्यायाची सांगता केली.
ऐकण्यासाठी इथे क्लिक करा




No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099