अध्याय ३: ओव्या १३४-१४९

१४ ऑक्टोबर २०१७ निरुपण
अध्याय ३: कर्मयोग  (गीता श्लोक १४-१८ / ज्ञानेश्वरी ओव्या १३४-१४९ )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभवः । यज्ञाद्‍भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ १४॥
कर्म ब्रह्मोद्‍भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं । तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥ १५॥
अन्नास्तव भूतें । प्ररोहो पावती समस्तें । मग पर्जन्यु या अन्नातें । सर्वत्र प्रसवे ॥ १३४ ॥
तया पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञातें प्रगटी कर्म । कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ॥ १३५ ॥
मग वेदांतें परात्पर । प्रसवतसे अक्षर । म्हणौनि हे चराचर । ब्रह्मबद्ध ॥ १३६ ॥
परी कर्माचिये मूर्ति । यज्ञीं अधिवासु श्रुति । ऐकें सुभद्रापति । अखंड गा ॥ १३७ ॥
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः । अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ १६॥
ऐशी हे आदि परंपरा । संक्षेपें तुज धनुर्धरा । सांगितली या अध्वरा । लागूनियां ॥ १३८ ॥
म्हणौनि समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु । नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥ १३९ ॥
तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी । जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥ १४० ॥
तें जन्म कर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ । जैसें कां अभ्रपटल । अकाळींचें ॥ १४१ ॥
कां गळां स्तन अजेचे । तैसें जियालें देखैं तयाचें । जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना ॥ १४२ ॥
म्हणौनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणें न संडावा । सर्वभावें भजावा । हाचि एकु ॥ १४३ ॥
हां गा शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य वोघें आलें । मग उचित कां आपुलें । ओसंडावें ? ॥ १४४ ॥
परिस पां सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥ १४५ ॥
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः । आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥ १७॥
देखैं असतेनि देहधर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में । जो अखंडित रमे । आपणपांचि ॥ १४६ ॥
जे तो आत्मबोधें तोषला । तरी कृतकार्यु देखैं जाहला । म्हणौनि सहजें सांडवला । कर्मसंगु ॥ १४७ ॥
नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ॥ न चास्य सर्वभूतेषु कश्चिदार्थव्यपाश्रयः ॥ १८॥

तृप्ति जालिया जैसीं । साधनें सरती आपैसीं । देखैं आत्मतुष्टीं तैसीं । कर्में नाहीं ॥ १४८ ॥
जंववरी अर्जुना । तो बोधु भेटेना मना । तंवचि यया साधना । भजावें लागे ॥ १४९ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099