१६ जानेवारी २०२२ निरुपण
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा । कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय ॥ ७२॥
तरी सांग पां पांडवा । हा शास्त्रसिद्धांतु आघवा । तुज एकचित्तें फावा । गेला आहे ? ॥ १५४० ॥
आम्हीं जैसें जया रीतीं । उगाणिलें कानांच्या हातीं । येरीं तैसेंचि तुझ्या चित्तीं । पेठें केलें कीं ? ॥ १५४१ ॥
अथवा माझारीं । गेलें सांडीविखुरी । किंवा उपेक्षेवरी । वाळूनि सांडिलें । ॥ १५४२ ॥
जैसें आम्हीं सांगितलें । तैसेंचि हृदयीं फावलें । तरी सांग पां वहिलें । पुसेन तें मी ॥ १५४३ ॥
तरी स्वाज्ञानजनितें । मागिलें मोहें तूतें । भुलविलें तो येथें । असे कीं नाहीं ? ॥ १५४४ ॥
हें बहु पुसों काई । सांगें तूं आपल्या ठायीं । कर्माकर्म कांहीं । देखतासी ? ॥ १५४५ ॥
पार्थु स्वानंदैकरसें । विरेल ऐसा भेददशे । आणिला येणें मिषें । प्रश्नाचेनि ॥ १५४६ ॥
पूर्णब्रह्म जाला पार्थु । तरी पुढील साधावया कार्यार्थु । मर्यादा श्रीकृष्णनाथु । उल्लंघों नेदी ॥ १५४७ ॥
येऱ्हवीं आपुलें करणें । सर्वज्ञ काय तो नेणें ? । परी केलें पुसणें । याचि लागीं ॥ १५४८ ॥
एवं करोनियां प्रश्न । नसतेंचि अर्जुनपण । आणूनियां जालें पूर्णपण । तें बोलवी स्वयें ॥ १५४९ ॥
मग क्षीराब्धीतें सांडितु । गगनीं पुंजु मंडितु । निवडे जैसा न निवडितु । पूर्णचंद्रु ॥ १५५० ॥
तैसा ब्रह्म मी हें विसरे । तेथ जगचि ब्रह्मत्वें भरे । हेंही सांडी तरी विरे । ब्रह्मपणही ॥ १५५१ ॥
ऐसा मोडतु मांडतु ब्रह्में । तो दुःखें देहाचिये सीमे । मी अर्जुन येणें नामें । उभा ठेला ॥ १५५२ ॥
मग कांपतां करतळीं । दडपूनि रोमावळी । पुलिका स्वेदजळीं । जिरऊनियां ॥ १५५३ ॥
प्राणक्षोभें डोलतया । आंगा आंगचि टेंकया । सूनि स्तंभु चाळया । भुलौनियां ॥ १५५४ ॥
नेत्रयुगुळाचेनि वोतें । आनंदामृताचें भरितें । वोसंडत तें मागुतें । काढूनियां ॥ १५५५ ॥
विविधा औत्सुक्यांची दाटी । चीप दाटत होती कंठीं । ते करूनियां पैठी । हृदयामाजीं ॥ १५५६ ॥
वाचेचें वितुळणें । सांवरूनि प्राणें । अक्रमाचें श्वसणें । ठेऊनि ठायीं ॥ १५५७ ॥
अर्जुन उवाच ।
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ ७३॥
मग अर्जुन म्हणे काय देवो । पुसताति आवडे मोहो । तरी तो सकुटुंब गेला जी ठावो । घेऊनि आपला ॥ १५५८ ॥
पासीं येऊनि दिनकरें । डोळ्यातें अंधारें । पुसिजे हें कायि सरे । कोणे गांवीं ? ॥ १५५९ ॥
तैसा तूं श्रीकृष्णराया । आमुचिया डोळयां । गोचर हेंचि कायिसया । न पुरे तंव ॥ १५६० ॥
वरी लोभें मायेपासूनी । तें सांगसी तोंड भरूनी । जें कायिसेनिही करूनी । जाणूं नये ॥ १५६१ ॥
आतां मोह असे कीं नाहीं । हें ऐसें जी पुससी काई । कृतकृत्य जाहलों पाहीं । तुझेपणें ॥ १५६२ ॥
गुंतलों होतों अर्जुनगुणें । तो मुक्त जालों तुझेपणें । आतां पुसणें सांगणें । दोन्ही नाहीं ॥ १५६३ ॥
मी तुझेनि प्रसादें । लाधलेनि आत्मबोधें । मोहाचे तया कांदे । नेदीच उरों ॥ १५६४ ॥
आतां करणें कां न करणें । हें जेणें उठी दुजेपणें । तें तूं वांचूनि नेणें । सर्वत्र गा ॥ १५६५ ॥
ये विषयीं माझ्या ठायीं । संदेहाचे नुरेचि कांहीं । त्रिशुद्धि कर्म जेथ नाहीं । तें मी जालों ॥ १५६६ ॥
तुझेनि मज मी पावोनी । कर्तव्य गेलें निपटूनी । परी आज्ञा तुझी वांचोनि । आन नाहीं प्रभो ॥ १५६७ ॥
कां जें दृश्य दृश्यातें नाशी । जें दुजें द्वैतातें ग्रासी । जें एक परी सर्वदेशीं । वसवी सदा ॥ १५६८ ॥
जयाचेनि संबंधें बंधु फिटे । जयाचिया आशा आस तुटे । जें भेटलया सर्व भेटे । आपणपांचि ॥ १५६९ ॥
तें तूं गुरुलिंग जी माझें । जें येकलेपणींचें विरजें । जयालागीं वोलांडिजे । अद्वैतबोधु ॥ १५७० ॥
आपणचि होऊनि ब्रह्म । सारिजे कृत्याकृत्यांचें काम । मग कीजे का निःसीम । सेवा जयाची ॥ १५७१ ॥
गंगा सिंधू सेवूं गेली । पावतांचि समुद्र जाली । तेवीं भक्तां सेल दिधली । निजपदाची ॥ १५७२ ॥
तो तूं माझा जी निरुपचारु । श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु । मा ब्रह्मतेचा उपकारु । हाचि मानीं ॥ १५७३ ॥
जें मज तुम्हां आड । होतें भेदाचें कवाड । तें फेडोनि केलें गोड । सेवासुख ॥ १५७४ ॥
तरी आतां तुझी आज्ञा । सकळ देवाधिदेवराज्ञा । करीन देईं अनुज्ञा । भलतियेविषयीं ॥ १५७५ ॥
यया अर्जुनाचिया बोला । देवो नाचे सुखें भुलला । म्हणे विश्वफळा जाला । फळ हा मज ॥ १५७६ ॥
उणेनि उमचला सुधाकरु । देखुनी आपला कुमरु । मर्यादा क्षीरसागरु । विसरेचिना ? ॥ १५७७ ॥
ऐसे संवादाचिया बहुलां । लग्न दोघांचियां आंतुला । लागलें देखोनि जाला । निर्भरु संजयो ॥ १५७८ ॥
तेणें म्हणतसे संजयो । बाप कृपानिधी रावो । तो आपुला मनोभावो । अर्जुनेंसी केला ॥ १५७९ ॥
तेणें उचंबळलेपणें । संजय धृतराष्ट्रातें म्हणे । जी कैसे बादरायणें । रक्षिलों दोघे ? ॥ १५८० ॥
आजि तुमतें अवधारा । नाहीं चर्मचक्षूही संसारा । कीं ज्ञानदृष्टिव्यवहारा आणिलेती ॥ १५८१ ॥
आणि रथींचिये राहाटी । घेई जो घोडेयासाठीं । तया आम्हां या गोष्टी । गोचरा होती ॥ १५८२ ॥
वरी जुंझाचें निर्वाण । मांडलें असे दारुण । दोहीं हारीं आपण । हारपिजे जैसें ॥ १५८३ ॥
येवढा जिये सांकडां । कैसा अनुग्रहो पैं गाढा । जे ब्रह्मानंदु उघडा । भोगवीतसे ॥ १५८४ ॥
ऐसें संजय बोलिला । परी न द्रवे येरु उगला । चंद्रकिरणीं शिवतला । पाषाणु जैसा ॥ १५८५ ॥
हे देखोनि तयाची दशा । मग करीचिना सरिसा । परी सुखें जाला पिसा । बोलतसे ॥ १५८६ ॥
भुलविला हर्षवेगें । म्हणौनि धृतराष्ट्रा सांगे । येऱ्हवीं नव्हे तयाजोगें । हें कीर जाणें ॥ १५८७ ॥
सञ्जय उवाच ।
इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः । संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ॥ ७४॥
मग म्हणे पैं कुरुराजा । ऐसा बंधुपुत्र तो तुझा । बोलिला तें अधोक्षजा । गोड जालें ॥ १५८८ ॥
अगा पूर्वापर सागर । ययां नामसीचि सिनार । येर आघवें तें नीर । एक जैसें ॥ १५८९ ॥
तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसें । हें आंगाचिपासीं दिसे । मग संवादीं जी नसे । कांहींचि भेदु ॥ १५९० ॥
पैं दर्पणाहूनि चोखें । दोन्ही होती सन्मुखें । तेथ येरी येर देखे । आपणपें जैसें ॥ १५९१ ॥
तैसा देवेसीं पंडुसुतु । आपणपें देवीं देखतु । पांडवेंसीं देखे अनंतु । आपणपें पार्थीं ॥ १५९२ ॥
देव देवो भक्तालागीं । जिये विवरूनि देखे आंगीं । येरु तियेचेही भागीं । दोन्ही देखे ॥ १५९३ ॥
आणिक कांहींच नाहीं । म्हणौनि करिती काई । दोघे येकपणें पाहीं । नांदताती ॥ १५९४ ॥
आतां भेदु जरी मोडे । तरी प्रश्नोत्तर कां घडे ? । ना भेदुचि तरी जोडे । संवादसुख कां ? ॥ १५९५ ॥
ऐसें बोलतां दुजेपणें । संवादीं द्वैत गिळणें । तें ऐकिलें बोलणें । दोघांचें मियां ॥ १५९६ ॥
उटूनि दोन्ही आरिसे । वोडविलीया सरिसे । कोण कोणा पाहातसे । कल्पावें पां ? ॥ १५९७ ॥
कां दीपासन्मुखु । ठेविलया दीपकु । कोण कोणा अर्थिकु । कोण जाणें ॥ १५९८ ॥
नाना अर्कापुढें अर्कु । उदयलिया आणिकु । कोण म्हणे प्रकाशकु । प्रकाश्य कवण ? ॥ १५९९ ॥
हें निर्धारूं जातां फुडें । निर्धारासि ठक पडे । ते दोघे जाले एवढे । संवादें सरिसे ॥ १६०० ॥
जी मिळतां दोन्ही उदकें । माजी लवण वारूं ठाके । कीं तयासींही निमिखें । तेंचि होय ॥ १६०१ ॥
तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही । संवादले तें मनीं । धरितां मजही वानी । तेंचि होतसे ॥ १६०२ ॥
ऐसें म्हणे ना मोटकें । तंव हिरोनि सात्विकें । आठव नेला नेणों कें । संजयपणाचा ॥ १६०३ ॥
रोमांच जंव फरके । तंव तंव आंग सुरके । स्तंभ स्वेदांतें जिंके । एकला कंपु ॥ १६०४ ॥
अद्वयानंदस्पर्शें । दिठी रसमय जाली असे । ते अश्रु नव्हती जैसें । द्रवत्वचि ॥ १६०५ ॥
नेणों काय न माय पोटीं । नेणों काय गुंफे कंठीं । वागर्था पडत मिठी । उससांचिया ॥ १६०६ ॥
किंबहुना सात्विकां आठां । चाचरु मांडतां उमेठा । संजयो जालासे चोहटां । संवादसुखाचा ॥ १६०७ ॥
तया सुखाची ऐसी जाती । जे आपणचि धरी शांती । मग पुढती देहस्मृती । लाधली तेणें ॥ १६०८ ॥
व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतद्गुह्यमहं परम् । योगं योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयतः स्वयम् ॥ ७५॥
तेव्हां बैसतेनि आनंदें । म्हणे जी जें उपनिषदें । नेणती तें व्यासप्रसादें । ऐकिलें मियां ॥ १६०९ ॥
ऐकतांचि ते गोठी । ब्रह्मत्वाची पडिली मिठी । मीतूंपणेंसीं दृष्टी । विरोनि गेली ॥ १६१० ॥
हे आघवेचि का योग । जया ठाया येती मार्ग । तयाचें वाक्य सवंग । केलें मज व्यासें ॥ १६११ ॥
अहो अर्जुनाचेनि मिषें । आपणपेंचि दुजें ऐसें । नटोनि आपणया उद्देशें । बोलिलें जें देव ॥ १६१२ ॥
तेथ कीं माझें श्रोत्र । पाटाचें जालें जी पात्र । काय वानूं स्वतंत्र । सामर्थ्य श्रीगुरुचें ॥ १६१३ ॥
No comments:
Post a Comment