भक्ती
भक्तीत तुझ्या रमावे
हीच असे प्रार्थना
आळवीता तुला आर्त
यावे सगुण दर्शना
मनी राहो निरंतर
तुझ्या भक्तीचेच सार
सरो विषय-विचार
पडो देहाचा विसर
तुझ्या भक्तीत रंगता
देई ज्ञानाचा प्रकाश
होवो कर्माचाही बोध
आता नको अवकाश
आहे जग हे नाशिवंत
जाणावें काय ते अनंत?
घडो परमतत्वाचे दर्शन
हेच मनी सदा चिंतन
होवो त्रिपुटीचा नाश
त्रिविध तापांचाही क्षय
देसी परब्रह्माचे ज्ञान
निर्गुण निराकाराचा प्रत्यय
अहंकार आणि आसक्ती
अंती गळून पडावी
द्वैताचे अद्वैत व्हावे
मला भेंट माझी घडावी
No comments:
Post a Comment