१६ मे २०२० निरुपण
अध्याय १२ : भक्तीयोगः ( श्लोक १७-१८ /ज्ञानेश्वरी ओव्या १९०-२०६)
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति । शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १७॥
जो आत्मलाभासारिखें । गोमटें कांहींचि न देखे । म्हणौनि भोगविशेखें । हरिखेजेना ॥ १९० ॥
आपणचि विश्व जाहला । तरी भेदभावो सहजचि गेला । म्हणौनि द्वेषु ठेला । जया पुरुषा ॥ १९१ ॥
पैं आपुलें जें साचें । तें कल्पांतींहीं न वचे । हें जाणोनि गताचें । न शोची जो ॥ १९२ ॥
आणि जयापरौतें कांहीं नाहीं । तें आपणपेंचि आपुल्या ठायीं । जाहला यालागीं जो कांहीं । आकांक्षी ना ॥ १९३ ॥
वोखटें कां गोमटें । हें काहींचि तया नुमटे । रात्रिदिवस न घटे । सूर्यासि जेवीं ॥ १९४ ॥
ऐसा बोधुचि केवळु । जो होवोनि असे निखळु । त्याहीवरी भजनशीळु । माझ्या ठायीं ॥ १९५ ॥
तरी तया ऐसें दुसरें । आम्हां पढियंतें सोयरें । नाहीं गा साचोकारें । तुझी आण ॥ १९६ ॥

समः शत्रौ च मित्रे च तथामानापमानयोः । शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १८॥
पार्था जयाचिया ठायीं । वैषम्याची वार्ता नाहीं । रिपुमित्रां दोहीं । सरिसा पाडु ॥ १९७ ॥
कां घरींचियां उजियेडु करावा । पारखियां आंधारु पाडावा । हें नेणेचि गा पांडवा । दीपु जैसा ॥ १९८ ॥
जो खांडावया घावो घाली । कां लावणी जयानें केली । दोघां एकचि साउली । वृक्षु दे जैसा ॥ १९९ ॥
नातरी इक्षुदंडु । पाळितया गोडु । गाळितया कडु । नोहेंचि जेवीं ॥ २०० ॥
अरिमित्रीं तैसा । अर्जुना जया भावो ऐसा । मानापमानीं सरिसा । होतु जाये ॥ २०१ ॥
तिहीं ऋतूं समान । जैसें कां गगन ।तैसा एकचि मान । शीतोष्णीं जया ॥ २०२ ॥
दक्षिण उत्तर मारुता । मेरु जैसा पंडुसुता । तैसा सुखदुःखप्राप्तां । मध्यस्थु जो ॥ २०३ ॥
माधुर्यें चंद्रिका । सरिसी राया रंका । तैसा जो सकळिकां । भूतां समु ॥ २०४ ॥
आघवियां जगा एक । सेव्य जैसें उदक । तैसें जयातें तिन्ही लोक । आकांक्षिती ॥ २०५ ॥
जो सबाह्यसंग । सांडोनिया लाग । एकाकीं असे आंग । आंगीं सूनी ॥ २०६ ॥

No comments:
Post a Comment