अध्याय १७ : ओव्या ३८०-४३३

१८  जुलै  २०२१ निरुपण 

अध्याय १७ ।  श्रद्धात्रयविभागयोगः । ( श्लोक २६-२८  / ज्ञानेश्वरी ओव्या ३८०-४३३ )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.   

सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते । प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ॥ २६॥

तरी सच्छब्दें येणें । आटूनि असताचें नाणें । दाविजे अव्यंगवाणें । सत्तेचें रूप ॥ ३८० ॥
जें सत् तेंचि काळें देशें । होऊं नेणेचि अनारिसे । आपणपां आपण असे । अखंडित ॥ ३८१ ॥
हें दिसतें जेतुलें आहे । तें असतपणें जें नोहे । देखतां रूपीं सोये । लाभे जयाची ॥ ३८२ ॥
तेणेंसीं प्रशस्त तें कर्म । जें जालें सर्वात्मक ब्रह्म । देखिजे करूनि सम । ऐक्यबोधें ॥ ३८३ ॥
तरी ओंकार तत्कारें । जें कर्म दाविलें ब्रह्माकारें । तें गिळूनि होईजे एकसरें । सन्मात्रचि ॥ ३८४ ॥
ऐसा हा अंतरंगु । सच्छब्दाचा विनियोगु । जाणा म्हणे श्रीरंगु । मी ना म्हणें हो ॥ ३८५ ॥
ना मीचि जरी हो म्हणें । तरी श्रीरंगीं दुजें हेंचि उणें । म्हणौनि हें बोलणें । देवाचेंचि ॥ ३८६ ॥
आतां आणिकीही परी । सच्छब्दु हा अवधारीं । सात्त्विक कर्मा करी । उपकारु जो ॥ ३८७ ॥
तरी सत्कर्में चांगें । चालिलीं अधिकारबगें । परी एकाधें कां आंगें । हिणावती जैं ॥ ३८८ ॥
तैं उणें एकें अवयवें । शरीर ठाके आघवें । कां अंगहीन भांडावें । रथाची गती ॥ ३८९ ॥
तैसें एकेंचि गुणेंवीण । सतचि परी असतपण । कर्म धरी गा जाण । जिये वेळे ॥ ३९० ॥
तेव्हां ओंकार तत्कारीं । सावायिला हा चांगी परी । सच्छब्दु कर्मा करी । जीर्णोद्धारु ॥ ३९१ ॥
तें असतपण फेडी । आणी सद्‍भावाचिये रूढी । निजसत्त्वाचिये प्रौढी । सच्छब्दु हा ॥ ३९२ ॥
दिव्यौषध जैसें रोगिया । कां सावावो ये भंगलिया । सच्छब्दु कर्मा व्यंगलिया । तैसा जाण ॥ ३९३ ॥
अथवा कांहीं प्रमादें । कर्म आपुलिये मर्यादे । चुकोनि पडे निषिद्धे । वाटे हन ॥ ३९४ ॥
चालतयाही मार्गु सांडे । पारखियाचि अखरें पडे । राहाटीमाजीं न घडे । काइ काइ ? ॥ ३९५ ॥
म्हणौनि तैसी कर्मा । राभस्यें सांडे सीमा । असाधुत्वाचिया दुर्नामा । येवों पाहे जें ॥ ३९६ ॥
तेथ गा हा सच्छब्दु । येरां दोहींपरीस प्रबुद्धु ।प्रयोजिला करी साधु । कर्मातें यया ॥ ३९७ ॥
लोहा परीसाची घृष्टी । वोहळा गंगेची भेटी । कां मृता जैसी वृष्टी । पीयूषाची ॥ ३९८ ॥
पैं असाधुकर्मा तैसा । सच्छब्दुप्रयोगु वीरेशा । हें असो गौरवुचि ऐसा । नामाचा यया ॥ ३९९ ॥
घेऊनि येथिंचें वर्म । जैं विचारिसी हें नाम । तैं केवळ हेंचि ब्रह्म । जाणसी तूं ॥ ४०० ॥
पाहें पां ॐतत्सत् ऐसें । हें बोलणें तेथ नेतसे । जेथूनि कां हें प्रकाशे । दृश्यजात ॥ ४०१ ॥
तें तंव निर्विशिष्ट । परब्रह्म चोखट । तयाचें हें आंतुवट । व्यंजक नाम ॥ ४०२ ॥
परी आश्रयो आकाशा । आकाशचि का जैसा । या नामानामी आश्रयो तैसा । अभेदु असे ॥ ४०३ ॥
उदयिला आकाशीं । रवीचि रवीतें प्रकाशी । हे नामव्यक्ती तैसी । ब्रह्मचि करी ॥ ४०४ ॥
म्हणौनि त्र्यक्षर हें नाम । नव्हे जाण केवळ ब्रह्म । ययालागीं कर्म । जें जें कीजे ॥ ४०५ ॥

यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते । कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ॥ २७॥

तें याग अथवा दानें । तपादिकेंही गहनें । तियें निफजतु कां न्यूनें । होऊनि ठातु ॥ ४०६ ॥
परी परीसाचा वरकली । नाहीं चोखाकिडाची बोली । तैसी ब्रह्मीं अर्पितां केलीं । ब्रह्मचि होती ॥ ४०७ ॥
उणिया पुरियाची परी । नुरेचि तेथ अवधारीं । निवडूं न येती सागरीं । जैसिया नदी ॥ ४०८ ॥
एवं पार्था तुजप्रती । ब्रह्मनामाची हे शक्ती । सांगितली उपपत्ती । डोळसा गा ॥ ४०९ ॥
आणि येकेकाही अक्षरा । वेगळवेगळा वीरा । विनियोगु नागरा । बोलिलों रीती ॥ ४१० ॥
एवं ऐसें सुमहिम । म्हणौनि हें ब्रह्मनाम । आतां जाणितलें कीं सुवर्म । राया तुवां ? ॥ ४११ ॥
तरी येथूनि याचि श्रद्धा । उपलविली हो सर्वदा । जयाचें जालें बंधा । उरों नेदी ॥ ४१२ ॥
जिये कर्मीं हा प्रयोगु । अनुष्ठिजे सद्विनियोगु । तेथ अनुष्ठिला सांगु । वेदुचि तो ॥ ४१३ ॥

अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् । असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥ २८॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे 

श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥

ना सांडूनि हे सोये । मोडूनि श्रद्धेची बाहे । दुराग्रहाची त्राये । वाढऊनियां ॥ ४१४ ॥
मग अश्वमेध कोडी कीजे । रत्‍नें भरोनि पृथ्वी दीजे । एकांगुष्ठींही तपिजे । तपसाहस्रीं ॥ ४१५ ॥
जळाशयाचेनि नांवें । समुद्रही कीजती नवे । परी किंबहुना आघवें । वृथाचि तें ॥ ४१६ ॥
खडकावरी वर्षले । जैसें भस्मीं हवन केलें । कां खेंव दिधलें । साउलिये ॥ ४१७ ॥
नातरी जैसें चडकणा । गगना हाणितलें अर्जुना । तैसा समारंभु सुना । गेलाचि तो ॥ ४१८ ॥
घाणां गाळिले गुंडे । तेथ तेल ना पेंडी जोडे । तैसें दरिद्र तेवढें । ठेलेंचि आंगीं ॥ ४१९ ॥
गांठीं बांधली खापरी । येथ अथवा पैलतीरीं । न सरोनि जैसी मारी । उपवासीं गा ॥ ४२० ॥
तैसें कर्मजातें तेणें । नाहीं ऐहिकीचें भोगणें । तेथ परत्र तें कवणें । अपेक्षावें ॥ ४२१ ॥
म्हणौनि ब्रह्मनामश्रद्धा । सांडूनि कीजे जो धांदा । हें असो सिणु नुसधा । दृष्टादृष्टीं तो ॥ ४२२ ॥
ऐसें कलुषकरिकेसरी । त्रितापतिमिरतमारी । श्रीवर वीर नरहरी । बोलिलें तेणें ॥ ४२३ ॥
तेथ निजानंदा बहुवसा-/। माजीं अर्जुन तो सहसा । हरपला चंद्रु जैसा । चांदिणेनि ॥ ४२४ ॥
अहो संग्रामु हा वाणिया । मापें नाराचांचिया आणिया । सूनि माप घे मवणिया । जीवितेंसी ॥ ४२५ ॥
ऐसिया समयीं कर्कशें । भोगीजत स्वानंदराज्य कैसें । आजि भाग्योदयो हा नसे । आनी ठाईं ॥ ४२६ ॥
संजयो म्हणे कौरवराया । गुणा रिझों ये रिपूचिया । आणि गुरुही हा आमुचिया । सुखाचा येथ ॥ ४२७ ॥
हा न पुसता हे गोठी । तरी देवो कां सोडिते गांठी । तरी कैसेंनि आम्हां भेटी । परमार्थेंसीं ॥ ४२८ ॥
होतों अज्ञानाच्या आंधारां । वोसंतीत जन्मवाहरा । तों आत्मप्रकाशमंदिरा-/। आंतु आणिलें ॥ ४२९ ॥
एवढा आम्हां तुम्हां थोरु । केला येणें उपकारु । म्हणौनि हा व्याससहोदरु । गुरुत्वें होय ॥ ४३० ॥
तेवींचि संजयो म्हणे चित्तीं । हा अतिशयो या नृपती । खुपेल म्हणौनि किती । बोलत असों ॥ ४३१ ॥
ऐसी हे बोली सांडिली । मग येरीचि गोठी आदरिली । जे पार्थें कां पुसिली । श्रीकृष्णातें ॥ ४३२ ॥
याचें जैसें कां करणें । तैसें मीही करीन बोलणें । ऐकिजो ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा ॥ ४३३ ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां सप्तदशोऽध्यायः ॥

Categories

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099