१६ मे २०२१ निरुपण
अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधम् च संश्रिताः । मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥ १८॥
मग पुढां भेरी निशाण । लाउनी ते दीक्षितपण । जगीं फोकारिती आण । वावो वावो ॥ ३८९ ॥
तेव्हां महत्त्वें तेणें अधमा । गर्वा चढे महिमा । जैसे लेवे दिधले तमा । काजळाचे ॥ ३९० ॥
तैसें मौढ्य घणावे । औद्धत्य उंचावे । अहंकारु दुणावे । अविवेकुही ॥ ३९१ ॥
मग दुजयाची भाष । नुरवावया निःशेष । बळीयेपणा अधिक । होय बळ ॥ ३९२ ॥
ऐसा अहंकार बळा । जालिया एकवळा । दर्पसागरु मर्यादवेळा । सांडूनि उते ॥ ३९३ ॥
मग वोसंडिलेनि दर्पें । कामाही पित्त कुरुपे । तया धगीं सैंघ पळिपे । क्रोधाग्नि तो ॥ ३९४ ॥
तेथ उन्हाळा आगी खरमरा । तेलातुपाचिया कोठारा । लागला आणि वारा । सुटला जैसा ॥ ३९५ ॥
तैसा अहंकारु बळा आला । दर्पु कामक्रोधीं गूढला । या दोहींचा मेळु जाला । जयांच्या ठायीं ॥ ३९६ ॥
ते आपुलिया सवेशा । मग कोणी कोणी हिंसा । या प्राणियांते वीरेशा । न साधती गा ? ॥ ३९७ ॥
पहिलें तंव धनुर्धरा । आपुलिया मांसरुधिरा । वेंचु करिती अभिचारा- । लागोनियां ॥ ३९८ ॥
तेथ जाळिती जियें देहें । यामाजीं जो मी आहें । तया आत्मया मज घाये । वाजती ते ॥ ३९९ ॥
आणि अभिचारकीं तिहीं । उपद्रविजे जेतुलें कांहीं । तेथ चैतन्य मी पाहीं । सीणु पावे ॥ ४०० ॥
आणि अभिचारावेगळें । विपायें जे अवगळें । तया टाकिती इटाळें । पैशून्याचीं ॥ ४०१ ॥
सती आणि सत्पुरुख । दानशीळ याज्ञिक । तपस्वी अलौकिक । संन्यासी जे ॥ ४०२ ॥
कां भक्त हन महात्मे । इयें माझीं निजाचीं धामें । निर्वाळलीं होमधर्में । श्रौतादिकीं ॥ ४०३ ॥
तयां द्वेषाचेनि काळकूटें । बासटोनि तिखटें । कुबोलांचीं सदटें । सूति कांडें ॥ ४०४ ॥
तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् । क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु ॥ १९॥
ऐसे आघवाचि परी । प्रवर्तले माझ्या वैरी । तयां पापियां जें मी करीं । तें आइक पां ॥ ४०५ ॥
तरी मनुष्यदेहाचा तागा । घेऊनि रुसती जे जगा । ते पदवी हिरोनि पैं गा । ऐसे ठेवीं ॥ ४०६ ॥
जे क्लेशगांवींचा उकरडा । भवपुरींचा पानवडा । ते तमोयोनि तयां मूढां । वृत्तीचि दें ॥ ४०७ ॥
मग आहाराचेनि नांवें । तृणही जेथ नुगवे । ते व्याघ्र वृश्चिक आडवे । तैसिये करीं ॥ ४०८ ॥
तेथ क्षुधादुःखें बहुतें । तोडूनि खाती आपणयातें । मरमरों मागुतें । होतचि असती ॥ ४०९ ॥
कां आपुला गरळजाळीं । जळिती आंगाची पेंदळी । ते सर्पचि करीं बिळीं । निरुंधला ॥ ४१० ॥
परी घेतला श्वासु घापे । येतुलेनही मापें । विसांवा तयां नाटोपे । दुर्जनांसी ॥ ४११ ॥
ऐसेनि कल्पांचिया कोडी । गणितांही संख्या थोडी । तेतुला वेळु न काढी । क्लेशौनि तयां ॥ ४१२ ॥
तरी तयांसी जेथ जाणें । तेथिंचें हें पहिलें पेणें । तें पावोनि येरें दारुणें । न होती दुःखें ॥ ४१३ ॥
आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि । मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम् ॥ २०॥
हा ठायवरी । संपत्ति ते आसुरी । अधोगती अवधारीं । जोडिली तिहीं ॥ ४१४ ॥
पाठीं व्याघ्रादि तामसा । योनी तो अळुमाळु ऐसा । देहाधाराचा उसासा । आथी जोही ॥ ४१५ ॥
तोही मी वोल्हावा हिरें । मग तमचि होती एकसरें । जेथे गेलें आंधारें । काळवंडैजे ॥ ४१६ ॥
जयांची पापा चिळसी । नरक घेती विवसी । शीण जाय मूर्च्छी । सिणें जेणें ॥ ४१७ ॥
मळु जेणें मैळे । तापु जेणें पोळे । जयाचेनि नांवें सळे । महाभय ॥ ४१८ ॥
पापा जयाचा कंटाळा । उपजे अमंगळ अमंगळा । विटाळुही विटाळा । बिहे जया ॥ ४१९ ॥
ऐसें विश्वाचेया वोखटेया । अधम जे धनंजया । तें ते होती भोगूनियां । तामसा योनी ॥ ४२० ॥
अहा सांगतां वाचा रडे । आठवितां मन खिरडे । कटारे मूर्खीं केवढे । जोडिले निरय ॥ ४२१ ॥
कायिसया ते आसुर । संपत्ति पोषिती वाउर । जिया दिधलें घोर । पतन ऐसें ॥ ४२२ ॥
म्हणौनि तुवां धनुर्धरा । नोहावें गा तिया मोहरा । जेउता वासु आसुरा । संपत्तिवंता ॥ ४२३ ॥
आणि दंभादि दोष साही । हे संपूर्ण जयांच्या ठायीं । ते त्यजावे हें काई । म्हणों कीर ? ॥ ४२४ ॥
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत् त्रयं त्यजेत् ॥ २१॥
परी काम क्रोध लोभ । या तिहींचेंही थोंब । थांवे तेथें अशुभ । पिकलें जाण ॥ ४२५ ॥
सर्व दुःखां आपुलिया । दर्शना धनंजया । पाढाऊ हे भलतया । दिधलें आहाती ॥ ४२६ ॥
कां पापियां नरकभोगीं । सुवावयालागीं जगीं । पातकांची दाटुगी । सभाचि हे ॥ ४२७ ॥
ते रौरव गा तंवचिवरी । आइकिजती पटांतरीं । जंव हे तिन्ही अंतरीं । उठती ना ॥ ४२८ ॥
अपाय तिहीं आसलग । यातना इहीं सवंग । हाणी हाणी नोहे हे तिघ । हेचि हाणी ॥ ४२९ ॥
काय बहु बोलों सुभटा । सांगितलिया निकृष्टा । नरकाचा दारवंटा । त्रिशंकु हा ॥ ४३० ॥
या कामक्रोधलोभां- । माजीं जीवें जो होय उभा । तो निरयपुरीची सभा । सन्मानु पावे ॥ ४३१ ॥
म्हणौनि पुढत पुढतीं किरीटी । हे कामादि दोष त्रिपुटी । त्यजावींचि गा वोखटी । आघवा विषयीं ॥ ४३२ ॥
No comments:
Post a Comment