१ ऑगस्ट २०२१ निरुपण
अध्याय १८ : । मोक्षसंन्यासयोग: । ( ज्ञानेश्वरी ओव्या ८७-१६५ )
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
अर्जुन उवाच ।
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् । त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ॥ १॥हां जी संन्यासु आणि त्यागु । इयां दोहीं एक अर्थीं लागु । जैसा सांघातु आणि संघु । संघातेंचि बोलिजे ॥ ८७ ॥
तैसेंचि त्यागें आणि संन्यासें । त्यागुचि बोलिजतु असे । आमचेनि तंव मानसें । जाणिजे हेंचि ॥ ८८ ॥
ना कांहीं आथी अर्थभेदु । तो देवो करोतु विशदु । तेथ म्हणती श्रीमुकुंदु । भिन्नचि पैं ॥ ८९ ॥
तरी अर्जुना तुझ्या मनीं । त्याग संन्यास दोनी । एकार्थ गमलें हें मानीं । मीही साच ॥ ९० ॥
इहीं दोहीं कीर शब्दीं । त्यागुचि बोलिजे त्रिशुद्धी । परी कारण एथ भेदीं । येतुलेंचि ॥ ९१ ॥
जें निपटूनि कर्म सांडिजे । तें सांडणें संन्यासु म्हणिजे । आणि फलमात्र का त्यजिजे । तो त्यागु गा ॥ ९२ ॥
तरी कोणा कर्माचें फळ । सांडिजे कोण कर्म केवळ । हेंही सांगों विवळ । चित्त दे पां ॥ ९३ ॥
तरी आपैसीं दांगें डोंगर । झाडें डाळती अपार । तैसें लांबे राजागर । नुठिती ते ॥ ९४ ॥
न पेरितां सैंघ तृणें । उठती तैसें साळीचें होणें । नाहीं गा राबाउणें । जियापरी ॥ ९५ ॥
कां अंग जाहलें सहजें । परी लेणें उद्यमें कीजे । नदी आपैसी आपादिजे । विहिरी जेवीं ॥ ९६ ॥
तैसें नित्य नैमित्तिक । कर्म होय स्वाभाविक । परी न कामितां कामिक । न निफजे जें ॥ ९७ ॥
श्रीभगवानुवाच ।
काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः । सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥ २॥
कां कामनेचेनि दळवाडें । जें उभारावया घडे । अश्वमेधादिक फुडे । याग जेथ ॥ ९८ ॥
वापी कूप आराम । अग्रहारें हन महाग्राम । आणीकही नाना संभ्रम । व्रतांचे ते ॥ ९९ ॥
ऐसें इष्टापूर्त सकळ । जया कामना एक मूळ । जें केलें भोगवी फळ । बांधोनियां ॥ १०० ॥
देहाचिया गांवा अलिया । जन्ममृत्यूचिया सोहळिया । ना म्हणों नये धनंजया । जियापरी ॥ १०१ ॥
का ललाटींचें लिहिलें । न मोडे गा कांहीं केलें । काळेगोरेपण धुतलें । फिटों नेणे ॥ १०२ ॥
केलें काम्य कर्म तैसें । फळ भोगावया धरणें बैसे । न फेडितां ऋण जैसें । वोसंडीना ॥ १०३ ॥
कां कामनाही न करितां । अवसांत घडे पंडुसुता । तरी वायकांडें न झुंजतां । लागे जैसें ॥ १०४ ॥
गूळ नेणतां तोंडीं । घातला देचि गोडी । आगी मानूनि राखोंडी । चेपिला पोळी ॥ १०५ ॥
काम्यकर्मी हें एक । सामर्थ्य आथी स्वाभाविक । म्हणौनि नको कौतुक । मुमुक्षु एथ ॥ १०६ ॥
किंबहुना पार्था ऐसें । जें काम्य कर्म गा असे । तें त्यजिजे विष जैसें । वोकूनियां ॥ १०७ ॥
मग तया त्यागातें जगीं । संन्यासु ऐसया भंगीं । बोलिजे अंतरंगीं । सर्वद्रष्टा ॥ १०८ ॥
हें काम्य कर्म सांडणें । तें कामनेतेंचि उपडणें । द्रव्यत्यागें दवडणें । भय जैसें ॥ १०९ ॥
आणि सोमसूर्यग्रहणें । येऊनि करविती पार्वणें । का मातापितरमरणें । अंकित जे दिवस ॥ ११० ॥
अथवा अतिथी हन पावे । हें ऐसैसें पडे जैं करावें । तैं तें कर्म जाणावें । नौमित्तिक गा ॥ १११ ॥
वार्षिया क्षोमे गगन । वसंतें दुणावे वन । देहा श्रृंगारी यौवन\- । दशा जैसी ॥ ११२ ॥
का सोमकांतु सोमें पघळें । सूर्यें फांकती कमळें । एथ असे तेंचि पाल्हाळे । आन नये ॥ ११३ ॥
तैसें नित्य जें का कर्म । तेंचि निमित्ताचे लाहे नियम । एथ उंचावे तेणें नाम । नैमित्तिक होय ॥ ११४ ॥
आणि सायंप्रातर्मध्यान्हीं । जें कां करणीय प्रतिदिनीं । परी दृष्टि जैसी लोचनीं । अधिक नोहे ॥ ११५ ॥
कां नापादितां गती । चरणीं जैसी आथी । नातरी ते दीप्ती । दीपबिंबीं ॥ ११६ ॥
वासु नेदितां जैसे । चंदनीं सौरभ्य असे । अधिकाराचे तैसें । रूपचि जें ॥ ११७ ॥
नित्य कर्म ऐसें जनीं । पार्था बोलिजे तें मानीं । एवं नित्य नैमित्तिक दोन्हीं । दाविलीं तुज ॥ ११८ ॥
हेंचि नित्य नैमित्तिक । अनुष्ठेय आवश्यक । म्हणौनि म्हणोंं पाहती एक । वांझ ययातें ॥ ११९ ॥
परी भोजनीं जैसें होये । तृप्ति लाहे भूक जाये । तैसे नित्यनैमित्तिकीं आहे । सर्वांगीं फळ ॥ १२० ॥
कीड आगिठां पडे । तरी मळु तुटे वानी चढे । यया कर्मा तया सांगडें । फळ जाणावें ॥ १२१ ॥
जे प्रत्यवाय तंव गळे । स्वाधिकार बहुवें उजळे । तेथ हातोफळिया मिळे । सद्गतीसी ॥ १२२ ॥
येवढेवरी ढिसाळ । नित्यनैमित्तिकीं आहे फळ । परी तें त्यजिजे मूळ । नक्षत्रीं जैसें ॥ १२३ ॥
लता पिके आघवी । तंव च्यूत बांधे पालवीं । मग हात न लावित माधवीं । सोडूनि घाली ॥ १२४ ॥
तैसी नोलांडितां कर्मरेखा । चित्त दीजे नित्यनैमित्तिका । पाठीं फळा कीजे अशेखा । वांताचे वानी ॥ १२५ ॥
यया कर्म फळत्यागातें । त्यागु म्हणती पैं जाणते । एवं त्याग संन्यास तूतें । परीसविले ॥ १२६ ॥
हा संन्यासु जैं संभवे । तैं काम्य बाधूं न पावे । निषिद्ध तंव स्वभावें । निषेधें गेलें ॥ १२७ ॥
आणि नित्यादिक जें असे । तें येणें फलत्यागें नसे । शिर लोटलिया जैसें । येर आंग ॥ १२८ ॥
मग सस्य फळपाकांत । तैसें निमालिया कर्मजात । आत्मज्ञान गिंवसीत । अपैसें ये ॥ १२९ ॥
ऐसिया निगुती दोनी । त्याग संन्यास अनुष्ठानीं । पडले गा आत्मज्ञानीं । बांधती पाटु ॥ १३० ॥
नातरी हे निगुती चुके । मग त्यागु कीजे हाततुकें । तैं कांहीं न त्यजे अधिकें । गोंवींचि पडे ॥ १३१ ॥
जें औषध व्याधी अनोळख । तें घेतलिया परतें विख । कां अन्न न मानितां भूक । मारी ना काय ? ॥ १३२ ॥
म्हणौनि त्याज्य जें नोहे । तेथ त्यागातें न सुवावें । त्याज्यालागीं नोहावें । लोभापर ॥ १३३ ॥
चुकलिया त्यागाचें वेझें । केला सर्वत्यागुही होय वोझें । न देखती सर्वत्र दुजें । वीतराग ते ॥ १३४ ॥
त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः । यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ॥ ३॥
एकां फळाभिलाष न ठके । ते कर्मांते म्हणती बंधकें । जैसें आपण नग्न भांडकें । जगातें म्हणे ॥ १३५ ॥
कां जिव्हालंपट रोगिया । अन्नें दूषी धनंजया । आंगा न रुसे कोढिया । मासियां कोपे ॥ १३६ ॥
तैसे फळकाम दुर्बळ । म्हणती कर्मचि किडाळ । मग निर्णयो देती केवळ । त्यजावें ऐसा ॥ १३७ ॥
एक म्हणती यागादिक । करावेंचि आवश्यक । जे यावांचूनि शोधक । आन नसे ॥ १३८ ॥
मनशुद्धीच्या मार्गीं । जैं विजयी व्हावें वेगीं । तैं कर्म सबळालागीं । आळसु न कीजे ॥ १३९ ॥
भांगार आथी शोधावें । तरी आगी जेवी नुबगावें । कां दर्पणालागीं सांचावें । अधिक रज ॥ १४० ॥
नाना वस्त्रें चोख होआवीं । ऐसें आथी जरी जीवीं ।तरी संवदणी न मनावी । मलिन जैसी ॥ १४१ ॥
तैसीं कर्में क्लेशकारें । म्हणौनि न न्यावीं अव्हेरें । कां अन्नलाभें अरुवारें । रांधितिये उणें ॥ १४२ ॥
इहीं इहीं गा शब्दीं । एक कर्मीं बांधिती बुद्धी । ऐसा त्यागु विसंवादीं । पडोनि ठेला ॥ १४३ ॥
तरी विसंवादु तो फिटे । त्यागाचा निश्चयो भेटे । तैसें बोलों गोमटें । अवधान देईं ॥ १४४ ॥
निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम । त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः ॥ ४॥
तरी त्यागु एथें पांडवा । त्रिविधु पैं जाणावा ।तया त्रिविधाही बरवा । विभाग करूं ॥ १४५ ॥
त्यागाचे तीन्ही प्रकार । कीजती जरी गोचर । तरी तूं इत्यर्थाचें सार । इतुलें जाण ॥ १४६ ॥
मज सर्वज्ञाचिये बुद्धी । जें अलोट माने त्रिशुद्धी । निश्चयतत्व तें आधीं । अवधारीं पां ॥ १४७ ॥
तरी आपुलिये सोडवणें । जो मुमुक्षु जागों म्हणे । तया सर्वस्वें करणें । हेंचि एक ॥ १४८ ॥
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् । यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ॥ ५॥
जियें यज्ञदानतपादिकें । इयें कर्में आवश्यकें । तियें न सांडावीं पांथिकें । पाउलें जैसीं ॥ १४९ ॥
हारपलें न देखिजे । तंव तयाचा मागु न सांडिजे । कां तृप्त न होतां न लोटिजे । भाणें जेवीं ॥ १५० ॥
नाव थडी न पवतां । न खांडिजे केळी न फळतां । कां ठेविलें न दिसतां । दीपु जैसा ॥ १५१ ॥
तैसी आत्मज्ञानविखीं । जंव निश्चिती नाहीं निकी । तंव नोहावें यागादिकीं । उदासीन ॥ १५२ ॥
तरी स्वाधिकारानुरुपें । तियें यज्ञदानें तपें । अनुष्ठावींचि साक्षेपें । अधिकेंवर ॥ १५३ ॥
जें चालणें वेगावत जाये । तो वेगु बैसावयाचि होये । तैसा कर्मातिशयो आहे । नैष्कर्म्यालागीं ॥ १५४ ॥
अधिकें जंव जंव औषधी । सेवनेची मांडी बांधी । तंव तंव मुकिजे व्याधी । तयाचिये ॥ १५५ ॥
तैसीं कर्में हातोपातीं । जैं कीजती यथानिगुती । तैं रजतमें झडती । झाडा देऊनी ॥ १५६ ॥
कां पाठोवाटीं पुटें । भांगारा खारु देणें घटे । तैं कीड झडकरी तुटे । निर्व्याजु होय ॥ १५७ ॥
तैसें निष्ठा केलें कर्म । तें झाडी करूनि रजतम । सत्वशुद्धीचें धाम । डोळां दावी ॥ १५८ ॥
म्हणौनियां धनंजया । सत्वशुद्धी गिंवसितया । तीर्थांचिया सावाया । आलीं कर्में ॥ १५९ ॥
तीर्थें बाह्यमळु क्षाळे । कर्में अभ्यंतर उजळे । एवं तीर्थें जाण निर्मळें । सत्कर्मे.चि ॥ १६० ॥
तृषार्ता मरुदेशीं । झळे अमृतें वोळलीं जैसींं । कीं अंधालागीं डोळ्यांसी । सूर्यु आला ॥ १६१ ॥
बुडतया नदीच धाविन्नली । पडतया पृथ्वीच कळवळिली । निमतया मृत्यूनें दिधली । आयुष्यवृद्धी ॥ १६२ ॥
तैसें कर्में कर्मबद्धता । मुमुक्षु सोडविले पंडुसुता । जैसा रसरीति मरतां । राखिला विषें ॥ १६३ ॥
तैसीं एके हातवटिया । कर्में कीजती धनंजया । बंधकेंचि सोडवावया । मुख्यें होती ॥ १६४ ॥
आतां तेचि हातवटी । तुज सांगों गोमटी । जया कर्मातें किरीटी । कर्मचि रुसे ॥ १६५ ॥
No comments:
Post a Comment