१९ मे २०१९ निरुपण
अध्याय ९ : राजविद्याराजगुह्ययोगः (गीता श्लोक २०-२२ / ज्ञानेश्वरी ओव्या ३०७-३४३)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते । ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥ २०॥
देख पां गा किरीटी । आश्रमधर्माचिया राहाटी । विधिमार्गां कसवटी । जे आपणचि होती ॥ ३०७ ॥
यजन करितां कौतुकें । तिहीं वेदांचा माथा तुके । क्रिया फळेंसि उभी ठाके । पुढां जयां ॥ ३०८ ॥
ऐसे दीक्षित जे सोमप । जे आपणचि यज्ञाचें स्वरूप । तींहीं तया पुण्याचेनि नांवें पाप । जोडिलें देखें ॥ ३०९ ॥
श्रुतित्रयांतें जाणोनी । शतवरी यज्ञ करुनी । यजिलिया मातें चुकोनी । स्वर्गा वरिती ॥ ३१० ॥
जैसें कल्पतरूतळवटीं । बैसोनि झोळिये देतसे गांठी । मग निदैव निघे किरीटी । दैन्यचि करूं ॥ ३११ ॥
तैसे शतक्रतु यजिलें मातें । कीं ईप्सिताति स्वर्गसुखातें । आतां पुण्य कीं हें निरुतें । पाप नोहे ? ॥ ३१२ ॥
म्हणौनि मजवीण पाविजे स्वर्गु । तो अज्ञानाचा पुण्यमार्गु । ज्ञानिये तयातें उपसर्गु । हानि म्हणती ॥ ३१३ ॥
एर्हवीं तरी नरकींचें दुःख । पावोनि स्वर्गा नाम कीं सुख । वांचूनि नित्यानंद गा निर्दोख । तें स्वरूप माझें ॥ ३१४ ॥
मज येतां पैं सुभटा । या द्विविधा गा आव्हांटा । स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया ॥ ३१५ ॥
स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे । पापात्मकें पापें नरका जाइजे । मग मातें जेणें पाविजे । तें शुद्ध पुण्य ॥ ३१६ ॥
आणि मजचिमाजीं असतां । जेणें मी दुर्हावें पंडुसुता । तें पुण्य ऐसें म्हणतां । जीभ न तुटे काई ? ॥ ३१७ ॥
परि हें असो आतां प्रस्तुत । ऐकें यापरि ते दीक्षित । यजूनि मातें याचित । स्वर्गभोगु ॥ ३१८ ॥
मग मी न पविजे ऐसें । जें पापरूप पुण्य असे । तेणें लाधलेनि सौरसें । स्वर्गा येती ॥ ३१९ ॥
जेथ अमरत्व हें सिंहासन । ऐरावतासारिखें वाहन । राजधानीभुवन । अमरावती ॥ ३२० ॥
जेथ महासिद्धींचीं भांडारें । अमृताचीं कोठारें । जिये गांवीं खिल्लारें । कामधेनूंचीं ॥ ३२१ ॥
जेथ वोळगे देव पाइका । सैंघ चिंतामणीचिया भूमिका । विनोदवनवाटिका । सुरतरूंचिया ॥ ३२२ ॥
गंधर्व गात गाणीं । जेथ रंभे ऐसिया नाचणी । उर्वसी मुख्य विलासिनी । अंतौरिया ॥ ३२३ ॥
मदन वोळगे शेजारें । जेथ चंद्र शिंपे सांबरें । पवना ऐसे म्हणियारे । धांवणें जेथ ॥ ३२४ ॥
पैं बृहस्पती मुख्य आपण । ऐसे स्वस्तीश्रियेचे ब्राह्मण । ताटियेचे सुरगण । बहुवस जेथें ॥ ३२५ ॥
लोकपाळ रांगेचे । राउत जिये पदवीचे । उच्चैःश्रवा खांचे । खोळणिये ॥ ३२६ ॥
हे असो बहु ऐसे । भोग इंद्रसुखासरिसे । ते भोगिजती जंव असे । पुण्यलेशु ॥ ३२७ ॥

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति । एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥ २१॥
मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे । आणि येऊं लागती माघारे । मृत्युलोका ॥ ३२८ ॥
जैसा वेश्याभोगी कवडा वेंचे । मग दारही चेपूं नये तियेचें । तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें । काय सांगों ? ॥ ३२९ ॥
एवं थितिया मातें चुकले । जींहीं पुण्यें स्वर्ग कामिलें । तयां अमरपण तें वावों जालें । अंतीं मृत्युलोकु ॥ ३३० ॥
मातेचिया उदरकुहरीं । पचूनि विष्ठीच्या दाथरीं । उकडूनि नवमासवरी । जन्मजन्मोनि मरती ॥ ३३१ ॥
अगा स्वप्नीं निधान फावे । परि चेइलिया हारपे आघवें । तैसें स्वर्गसुख जाणावें । वेदज्ञाचें ॥ ३३२ ॥
अर्जुना वेदविद जर्ही जाहला । तरी मातें नेणता वायां गेला । कणु सांडूनि उपणिला । कोंडा जैसा ॥ ३३३ ॥
म्हणौनि मज एकेंविण । हे त्रयीधर्म अकारण । आतां मातें जाणोनि कांहीं नेण । तूं सुखिया होसी ॥ ३३४ ॥

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ २२॥
पैं सर्वभावेसीं उखितें । जे वोपिलें मज चित्तें । जैसा गर्भगोळु उद्यमातें । कोणाही नेणें ॥ ३३५ ॥
तैसा मीवांचूनि कांहीं । आणीक गोमटेंचि नाहीं । मजचि नाम पाहीं । जिणेंया ठेविलें ॥ ३३६ ॥
ऐसे अनन्यगतिकें चित्तें । चिंतितसांतें मातें । जे उपासिति तयांतें । मीचि सेवीं ॥ ३३७ ॥
ते एकवटूनि जिये क्षणीं । अनुसरले गा माझिये वाहणीं । तेव्हांचि तयांची चिंतवणी । मजचि पडली ॥ ३३८ ॥
मग तींहीं जें जें करावें । तें मजचि पडिलें आघवें । जैसी अजातपक्षाचेनि जीवें । पक्षिणी जिये ॥ ३३९ ॥
आपुली तहान भूक नेणें । तान्हया निकें तें माउलीसीचि करणें ।तैसें अनुसरले जे मज प्राणें । तयांचें सर्व मी करीं ॥ ३४० ॥
तया माझिया सायुज्याची चाड । तरि तेंचि पुरवीं कोड । कां सेवा म्हणती तरी आड । प्रेम सूयें ॥ ३४१ ॥
ऐसा मनीं जो जो धरिती भावो । तो तो पुढां पुढां लागे तयां देवों । आणि दिधलियाचा निर्वाहो । तोही मीचि करीं ॥ ३४२ ॥
हा योगक्षेमु आघवा । तयांचा मजचि पडिला पांडवा । जयांचिया सर्वभावा । आश्रयो मी ॥ ३४३ ॥

No comments:
Post a Comment