८ डिसेंबर २०१९ निरुपण : गीताजयंती
अध्याय ११ : विश्वरूपदर्शनयोगः (गीता श्लोक २८-३३ / ज्ञानेश्वरी ओव्या ४२३-४७१)
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
यथा नदीनाम् बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति । तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥ २८॥
जैसे महानदीचे वोघ । वहिले ठाकिती समुद्राचें आंग । तैसें आघवाचिकडूनि जग । प्रवेशत मुखीं ॥ ४२३ ॥
आयुष्यपंथें प्राणिगणी । करोनि अहोरात्रांची मोवणी । वेगें वक्त्रामिळणीं । साधिजत आहाती ॥ ४२४ ॥

यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः । तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥ २९॥
जळतया गिरीच्या गवखा- । माजीं घापती पतंगाचिया झाका । तैसे समग्र लोक देखा । इये वदनीं पडती ॥ ४२५ ॥
परि जेतुलें येथ प्रवेशलें । तें तातलिया लोहें पाणीचि पां गिळिलें । वहवटींहि पुसिलें । नामरूप तयांचें ॥ ४२६ ॥

लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वद्भिः । तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥ ३०॥
आणि येतुलाही आरोगण । करितां भुके नाहीं उणेपण । कैसें दीपन असाधारण । उदयलें यया ॥ ४२७ ॥
जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । का भणगा दुकाळु पाहला । तैसा जिभांचा लळलळाटु देखिला । आवाळुवें चाटितां ॥ ४२८ ॥
तैसें आहाराचे नांवें कांहीं । तोंडापासूनि उरलेंचि नाहीं । कैसी समसमीत नवाई । भुकेलेपणाची ॥ ४२९ ॥
काय सागराचा घोंटु भरावा ? । कीं पर्वताचा घांसु करावा ? ।ब्रह्मकटाहो घालावा । आघवाचि दाढे ॥ ४३० ॥
दिशा सगळियाचि गिळाविया । चांदिणिया चाटूनि घ्याविया । ऐसें वर्तत आहे साविया । लोलुप्य बा तुझें ॥ ४३१ ॥
जैसा भोगीं कामु वाढे । कां इंधनें आगीसि हाकाक चढे । तैसी खातखातांचि तोंडें । खाखांतें ठेलीं ॥ ४३२ ॥
कैसें एकचि केवढें पसरलें । त्रिभुवन जिव्हाग्रीं आहे टेकलें । जैसें कां कवीठ घातलें । वडवानळीं ॥ ४३३ ॥
ऐसीं अपार वदनें । आतां येतुलीं कैंचीं त्रिभुवनें । कां आहारु न मिळतां येणें मानें । वाढविलीं सैंघ ॥ ४३४ ॥
अगा हा लोकु बापुडा । जाहला वदनज्वाळां वरपडा । जैसी वणवेयाचिया वेढां । सांपडती मृगें ॥ ४३५ ॥
आतां तैसें यां विश्वा जाहालें । देव नव्हे हें कर्म आलें । कां जग चळचळां पांगिलें । काळजाळें ॥ ४३६ ॥
आतां इये अंगप्रभेचिये वागुरे । कोणीकडूनि निगिजैल चराचरें । हीं वक्त्रें नोहेती जोहारें । वोडवलीं जगा ॥ ४३७ ॥
आगी आपुलेनि दाहकपणें । कैसेनि पोळिजे तें नेणे । परी जया लागे तया प्राणें । सुटिकाची नाहीं ॥ ४३८ ॥
नातरी माझेनि तिखटपणें । कैसें निवटे हें शस्त्र कायि जाणें । कां आपुलियां मारा नेणें । विष जैसें ॥ ४३९ ॥
तैसी तुज कांहीं । आपुलिया उग्रपणाची सेचि नाहीं । परी ऐलीकडिले मुखीं खाई । हो सरली जगाची ॥ ४४० ॥
अगा आत्मा तूं एकु । सकळ विश्वव्यापकु । तरी कां आम्हां अंतकु । तैसा वोडवलासी ? ॥ ४४१ ॥
तरी मियां सांडिली जीवित्वाची चाड । आणि तुवांही न धरावी भीड । मनीं आहे तें उघड । बोल पां सुखें ॥ ४४२ ॥
किती वाढविसी या उग्ररूपा । आंगींचें भगवंतपण आठवीं बापा । नाहीं तरी कृपा । मजपुरती पाही ॥ ४४३ ॥

आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद । विज्ञातुमिच्छामिभवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥ ३१॥
तरी एक वेळ वेदवेद्या । जी त्रिभुवनैक आद्या । विनवणी विश्ववंद्या । आइकें माझी ॥ ४४४ ॥
ऐसें बोलोनि वीरें । चरण नमस्कारिलें शिरें । मग म्हणें तरी सर्वेश्वरें । अवधारिजो ॥ ४४५ ॥
मियां होआवया समाधान । जी पुसिलें विश्वरूपध्यान । आणि एकेंचि काळें त्रिभुवन । गिळितुचि उठिलासी ॥ ४४६ ॥
तरी तूं कोण कां येतुलीं । इयें भ्यासुरें मुखें कां मेळविलीं । आघवियाचि करीं परिजिलीं । शस्त्रें कांह्या ॥ ४४७ ॥
जी जंव तंव रागीटपणें । वाढोनि गगना आणितोसि उणें । कां डोळे करूनि भिंगुळवाणे । भेडसावीत आहासी ॥ ४४८ ॥
एथ कृतांतेंसि देवा । कासया किजतसे हेवा । हा आपुला तुवां सांगावा । अभिप्राय मज ॥ ४४९ ॥
या बोला म्हणे अनंतु । मी कोण हें आहासी पुसतु । आणि कायिसयालागीं असे वाढतु । उग्रतेसी ॥ ४५० ॥

श्रीभगवानुवाच ।
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः । ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ ३२॥

तरी मी काळु गा हें फुडें । लोक संहारावयालागीं वाढें । सैंघ पसरिलीं आहातीं तोंडें । आतां ग्रासीन हें आघवें ॥ ४५१ ॥
एथ अर्जुन म्हणे कटकटा । उबगिलों मागिल्या संकटा । म्हणौनि आळविला तंव वोखटा । उवाइला हा ॥ ४५२ ॥
तेवींचि कठिण बोलें आसतुटी । अर्जुन होईल हिंपुटी । म्हणौनि सवेंचि म्हणे किरीटी । परि आन एक असे ॥ ४५३ ॥
तरी आतांचिये संहारवाहरे । तुम्हीं पांडव असा बाहिरे । तेथ जातजातां धनुर्धरें । सांवरिले प्राण ॥ ४५४ ॥
होता मरणमहामारीं गेला । तो मागुता सावधु जाहला ।मग लागला बोला । चित्त देऊं ॥ ४५५ ॥
ऐसें म्हणिजत आहे देवें । अर्जुना तुम्ही माझें हें जाणावें । येर जाण मी आघवें । सरलों ग्रासूं ॥ ४५६ ॥
वज्रानळीं प्रचंडीं । जैसी घापे लोणियाची उंडी । तैसें जग हें माझिया तोंडीं । तुवां देखिलें जें ॥ ४५७ ॥
तरी तयामाझारीं कांहीं । भरंवसेनि उणें नाहीं । इये वायांचि सैन्यें पाहीं । बरवतें आहाती ॥ ४५८ ॥
ऐसा चतुरंगाचिया संपदा । करित महाकाळेंसीं स्पर्धा । वांटिवेचिया मदा । वघळले जे ॥ ४५९ ॥
हे जे मिळोनियां मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनि बळें । यमावरी गजदळें । वाखाणिजताती ॥ ४६० ॥
म्हणती सृष्टीवरी सृष्टी करूं । आण वाहूनि मृत्यूतें मारूं । आणि जगाचा भरूं । घोंटु यया ॥ ४६१ ॥
पृथ्वी सगळीचि गिळूं । आकाश वरिच्यावरी जाळूं । कां बाणवरी खिळूं । वारयातें ॥ ४६२ ॥
बोल हतियेराहूनि तिखट । दिसती अग्निपरिस दासट । मारकपणें काळकूट । महुर म्हणत ॥ ४६३ ॥
तरी हे गंधर्वनगरींचे उमाळे । जाण पोकळीचे पेंडवळें । अगा चित्रीव फळें । वीर हे देखें ॥ ४६४ ॥
हां गा मृगजळाचा पूर आला । दळ नव्हे कापडाचा साप केला । इया शृंगारूनियां खाला । मांडिलिया पैं ॥ ४६५ ॥

तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुंक्ष्व राज्यं समृद्धम् । मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ ३३॥
येर चेष्टवितें जें बळ । तें मागांचि मियां ग्रासिलें सकळ । आतां कोल्हारिचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती ॥ ४६६ ॥
हालविती दोरी तुटली । तरी तियें खांबावरील बाहुलीं । भलतेणें लोटिलीं । उलथोनि पडती ॥ ४६७ ॥
तैसा सैन्याचा यया बगा । मोडतां वेळू न लगेल पैं गा । म्हणौनि उठीं उठीं वेगां । शाहाणा होईं ॥ ४६८ ॥
तुवां गोग्रहणाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरें । मग विराटाचेनि महाभेडें उत्तरें । आसडूनि नागाविलें ॥ ४६९ ॥
आतां हें त्याहूनि निपटारें जहालें । निवटीं आयितें रण पडिलें । घेईं यश रिपु जिंतिले । एकलेनि अर्जुनें ॥ ४७० ॥
आणि कोरडें यशचि नोहे । समग्र राज्यही आलें आहे । तूं निमित्तमात्रचि होयें । सव्यसाची ॥ ४७१ ॥

No comments:
Post a Comment