अध्याय २ - स्वाध्याय

मला कळलेला सांख्ययोग

दुसरा अध्याय पूर्ण झाल्यावर समीर आणि तेजस्विनी बोरीकर यांच्या कल्पनेप्रमाणे प्रत्येकाने दुसऱ्या अध्यायावर बोलायचे असे ठरले आणि सर्वांनी ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग हे नाव सार्थ केले.

"मला कळलेला/ भावलेला  सांख्ययोग " ह्यावर प्रत्येकांनी आपली मते मांडली. पहिल्या भागात जयश्रीताई आणि प्रशांतदादा तर दुसऱ्या भागात प्राचीताई, धनश्रीताई, अर्चनाताई आणि फिरोदिया काकू ह्यांनी सुंदर विवरण केले. तिसऱ्या भागात फाटककाकू, तेजस्विनीताई, अमितदादा आणि समीरदादा ह्यांनी त्यांना कळलेला दुसरा अध्याय सांगितला.  चौथ्या भागात तोरोकाका, कुलकर्णी काका, आठवले काकू आणि मंजिरी सबनीस यांनी विवरण केले. प्रत्येकाचे स्वतःचे चिंतन आणि केलेला अभ्यास जाणवत होता.  सर्वांचीच दुसऱ्या अध्यायाची उजळणी झाली. ह्या स्वाध्यायांमुळे  उत्साह वाढलेला आहे आणि सर्वांनाच तिसऱ्या अध्यायाची उत्सुकता लागलेली आहे.

तिसरा अध्याय आम्ही सर्वजण माऊलींना अपेक्षित असल्याप्रमाणे " अवधारिजो जी " ( कानात प्राण आणून) असा ऐकणार हे नक्की.

२० ऑगस्ट रोजी जयश्रीताई कवडे आणि प्रशांतदादा खानजोडे यांनी विवरण केले.
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

२६ ऑगस्ट रोजी प्राचीताई ब्रह्मे यांनी विवरण केले.
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

२६ ऑगस्ट रोजी धनश्रीताई कुलकर्णी , अर्चनाताई  खानजोडे  आणि फिरोदिया काकू यांनी विवरण केले.
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

२ सप्टेबर रोजी वीणा पाठककाकू, तेजस्विनीताई बोरीकर आणि अमितदादा ब्रह्मे  यांनी विवरण केले.
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा


२ सप्टेबर रोजी समीरदादा बोरीकर  यांनी विवरण केले. खूप सुंदर प्रेझेन्टेशन सादर केले.
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा

संपूर्ण  दुसऱ्या अध्यायाचे समीरने केलेले ग्राफिक प्रेझेन्टेशन इथे देत आहोत.
पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
कर्म चक्र
विषय चक्र

९ सप्टेबर रोजी  तोरोकाका, कुलकर्णीकाका, कल्पना आठवलेकाकू आणि मंजिरी सबनीस यांनी विवरण करून स्वाध्यायांची  सांगता केली.
ऐकण्यासाठी  इथे क्लिक करा


No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099