अध्याय १२ : ओव्या १४३-१६४

३ मे  २०२० निरुपण 
अध्याय १२ : भक्तीयोगः ( श्लोक १२-१४ /ज्ञानेश्वरी ओव्या  १४१-१६४)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ञानाद् ध्यानं विशिष्यते । ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिनिरन्तरम् ॥ १२॥

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१ ॥
मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२ ॥
ऐसिया या वाटा । इहींचि पेणा सुभटा । शांतीचा माजिवटा । ठाकिला जेणें ॥ १४३ ॥

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च । निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १३॥
जो सर्व भूतांच्या ठायीं । द्वेषांतें नेणेंचि कहीं । आपपरु नाहीं । चैतन्या जैसा ॥ १४४ ॥
उत्तमातें धरिजे । अधमातें अव्हेरिजे । हें काहींचि नेणिजे । वसुधा जेवीं ॥ १४५ ॥
कां रायाचें देह चाळूं । रंकातें परौतें गाळूं । हें न म्ह्णेचि कृपाळू । प्राणु पैं गा ॥ १४६ ॥
गाईची तृषा हरूं । कां व्याघ्रा विष होऊनि मारूं । ऐसें नेणेंचि गा करूं । तोय जैसें ॥ १४७ ॥
तैसी आघवियांचि भूतमात्रीं । एकपणें जया मैत्री । कृपेशीं धात्री । आपणचि जो ॥ १४८ ॥
आणि मी हे भाष नेणें । माझें काहींचि न म्हणे । सुख दुःख जाणणें । नाहीं जया ॥ १४९ ॥
तेवींचि क्षमेलागीं । पृथ्वीसि पवाडु आंगीं । संतोषा उत्संगीं । दिधलें घर ॥ १५० ॥
सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः । मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १४॥
वार्षियेवीण सागरू । जैसा जळें नित्य निर्भरु । तैसा निरुपचारु । संतोषी जो ॥ १५१ ॥
वाहूनि आपुली आण । धरी जो अंतःकरण । निश्चया साचपण । जयाचेनि ॥ १५२ ॥
जीवु परमात्मा दोन्ही । बैसऊनि ऐक्यासनीं । जयाचिया हृदयभुवनीं । विराजती ॥ १५३ ॥
ऐसा योगसमृद्धि । होऊनि जो निरवधि । अर्पी मनोबुद्धी । माझ्या ठायीं ॥ १५४ ॥
आंतु बाहेरि योगु । निर्वाळलेयाहि चांगु । तरी माझा अनुरागु । सप्रेम जया ॥ १५५ ॥
अर्जुना गा तो भक्तु । तोचि योगी तोचि मुक्तु । तो वल्लभा मी कांतु । ऐसा पढिये ॥ १५६ ॥
हें ना तो आवडे । मज जीवाचेनि पाडें । हेंही एथ थोकडें । रूप करणें ॥ १५७ ॥
तरी पढियंतयाची काहाणी । हे भुलीची भारणी । इयें तंव न बोलणीं । परी बोलवी श्रद्धा ॥ १५८ ॥
म्हणौनि गा आम्हां । वेगां आली उपमा । एर्‍हवीं काय प्रेमा । अनुवादु असे ? ॥ १५९ ॥
आतां असो हें किरीटी । पैं प्रियाचिया गोष्टी । दुणा थांव उठी । आवडी गा ॥ १६० ॥
तयाही वरी विपायें । प्रेमळु संवादिया होये । तिये गोडीसी आहे । कांटाळें मग ? ॥ १६१ ॥
म्हणौनि गा पंडुसुता । तूंचि प्रियु आणि तूंचि श्रोता । वरी प्रियाची वार्ता । प्रसंगें आली ॥ १६२ ॥
तरी आतां बोलों । भलें या सुखा मीनलों । ऐसें म्हणतखेंवीं डोलों । लागला देवो ॥ १६३ ॥
मग म्हणे जाण । तया भक्तांचे लक्षण । जया मी अंतःकरण । बैसों घालीं ॥ १६४ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099