२६ जुलै २०२० निरुपण
अध्याय १३ : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक ८ / ज्ञानेश्वरी ओव्या५१२-५२४)
जयाची आज्ञा आपण । शिरीं वाहे अंतःकरण । मनुष्याकारें जाण । ज्ञानचि तो ॥ ५१२ ॥
इंद्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च । जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥ ८॥
आणि विषयांविखीं । वैराग्याची निकी । पुरवणी मानसीं कीं । जिती आथी ॥ ५१३ ॥
वमिलेया अन्ना । लाळ न घोंटी जेवीं रसना । कांआंग न सूये आलिंगना । प्रेताचिया ॥ ५१४ ॥
विष खाणें नागवे । जळत घरीं न रिगवे । व्याघ्रविवरां न वचवे । वस्ती जेवीं ॥ ५१५ ॥
धडाडीत लोहरसीं । उडी न घालवे जैसी । न करवे उशी । अजगराची ॥ ५१६ ॥
अर्जुना तेणें पाडें । जयासी विषयवार्ता नावडे । नेदी इंद्रियांचेनि तोंडें । कांहींच जावों ॥ ५१७ ॥
जयाचे मनीं आलस्य । देही अतिकार्श्य । शमदमीं सौरस्य । जयासि गा ॥ ५१८ ॥
तपोव्रतांचा मेळावा । जयाच्या ठायीं पांडवा । युगांत जया गांवा- । आंतु येतां ॥ ५१९ ॥
बहु योगाभ्यासीं हांव । विजनाकडे धांव । न साहे जो नांव । संघाताचें ॥ ५२० ॥
नाराचांचीं आंथुरणें । पूयपंकीं लोळणें । तैसें लेखी भोगणें । ऐहिकींचें ॥ ५२१ ॥
आणि स्वर्गातें मानसें । ऐकोनि मानी ऐसें । कुहिलें पिशित जैसें । श्वानाचें कां ॥ ५२२ ॥
तें हें विषयवैराग्य । जें आत्मलाभाचें सभाग्य । येणें ब्रह्मानंदा योग्य । जीव होती ॥ ५२३ ॥

No comments:
Post a Comment