अध्याय १७ : ओव्या ३२८- ३७९

११  जुलै  २०२१ निरुपण 

अध्याय १७ ।  श्रद्धात्रयविभागयोगः । ( श्लोक २३-२५  / ज्ञानेश्वरी ओव्या ३२८- ३७९ )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.  

ॐतत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः । ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥ २३॥

तरी अनादि परब्रह्म । जें जगदादि विश्रामधाम । तयाचें एक नाम । त्रिधा पैं असे ॥ ३२८ ॥
तें कीर अनाम अजाती । परी अविद्यावर्गाचिये राती । माजी वोळखावया श्रुती । खूण केली ॥ ३२९ ॥
उपजलिया बाळकासी । नांव नाहीं तयापासीं । ठेविलेनि नांवेंसी । ओ देत उठी ॥ ३३० ॥
कष्टले संसारशीणें । जे देवों येती गार्‍हाणें । तयां ओ दे नांवें जेणें । तो संकेतु हा ॥ ३३१ ॥
ब्रह्माचा अबोला फिटावा । अद्वैततत्त्वें तो भेटावा । ऐसा मंत्रु देखिला कणवा । वेदें बापें ॥ ३३२ ॥
मग दाविलेनि जेणें एकें । ब्रह्म आळविलें कवतिकें । मागां असत ठाके । पुढां उभें ॥ ३३३ ॥
परी निगमाचळशिखरीं । उपनिषदार्थनगरीं । आहाति जे ब्रह्माच्या येकाहारीं । तयांसीच कळे ॥ ३३४ ॥
हेंही असो प्रजापती । शक्ति जे सृष्टि करिती । ते जया एका आवृत्ती । नामाचिये ॥ ३३५ ॥
पैं सृष्टीचिया उपक्रमा-/ पूर्वीं गा वीरोत्तमा । वेडा ऐसा ब्रह्मा । एकला होता ॥ ३३६ ॥
मज ईश्वरातें नोळखे । ना सृष्टिही करूं न शके । तो थोरु केला एकें । नामें जेणें ॥ ३३७ ॥
जयाचा अर्थु जीवीं ध्यातां । जें वर्णत्रयचि जपतां । विश्वसृजनयोग्यता । आली तया ॥ ३३८ ॥
तेधवां रचिलें ब्रह्मजन । तयां वेद दिधलें शासन । यज्ञा ऐसें वर्तन । जीविकें केलें ॥ ३३९ ॥
पाठीं नेणों किती येर । स्रजिले लोक अपार । जाले ब्रह्मदत्त अग्रहार । तिन्हीं भुवनें ॥ ३४० ॥
ऐसें नाममंत्रें जेणें । धातया अढंच करणें । तयाचें स्वरूप आइक म्हणे । श्रीकांतु तो ॥ ३४१ ॥
तरी सर्व मंत्रांचा राजा । तो प्रणवो आदिवर्णु बुझा । आणि तत्कारु जो दुजा । तिजा सत्कारु ॥ ३४२ ॥
एवं ॐतत्सदाकारु । ब्रह्मनाम हें त्रिप्रकारु । हें फूल तुरंबी सुंदरु । उपनिषदाचें ॥ ३४३ ॥
येणेंसीं गा होऊनि एक । जैं कर्म चाले सात्त्विक । तैं कैवल्यातें पाइक । घरींचें करी ॥ ३४४ ॥
परी कापुराचें थळींव । आणून देईल दैव । लेवों जाणणेंचि आडव । तेथ असे बापा ॥ ३४५ ॥
तैसें आदरिजेल सत्कर्म । उच्चरिजेल ब्रह्मनाम । परी नेणिजेल जरी वर्म । विनियोगाचें ॥ ३४६ ॥
तरी महंताचिया कोडी । घरा आलियाही वोढी । मानूं नेणतां परवडी । मुद्दल तुटे ॥ ३४७ ॥
कां ल्यावया चोखट । टीक भांगार एकवट । घालूनि बांधिली मोट । गळा जेवीं ॥ ३४८ ॥
तैसें तोंडीं ब्रह्मनाम । हातीं तें सात्त्विक कर्म । विनियोगेंवीण काम । विफळ होय ॥ ३४९ ॥
अगा अन्न आणि भूक । पासीं असे परी देख ।जेऊं नेणतां बालक । लंघनचि कीं ॥ ३५० ॥
का स्नेहसूत्र वैश्वानरा । जालियाही संसारा । हातवटी नेणतां वीरा । प्रकाशु नोहे ॥ ३५१ ॥
तैसे वेळे कृत्य पावे । तेथिंचा मंत्रुही आठवे । परी व्यर्थ तें आघवें । विनियोगेंवीण ॥ ३५२ ॥
म्हणौनि वर्णत्रयात्मक । जे हें परब्रह्मनाम एक । विनियोगु तूं आइक । आतां याचा ॥ ३५३ ॥

तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः । प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ॥ २४॥

तरी या नामींचीं अक्षरें तिन्हीं । कर्मा आदिमध्यनिदानीं । प्रयोजावीं पैं स्थानीं । इहीं तिन्हीं ॥ ३५४ ॥
हेंचि एकी हातवटी । घेउनि हन किरीटी । आले ब्रह्मविद भेटी । ब्रह्माचिये ॥ ३५५ ॥
ब्रह्मेंसीं होआवया एकी । ते न वंचती यज्ञादिकीं । जे चावळलें वोळखीं । शास्त्रांचिया ॥ ३५६ ॥
तो आदि तंव ओंकारु । ध्यानें करिती गोचरु । पाठीं आणिती उच्चारु । वाचेही तो ॥ ३५७ ॥
तेणें ध्यानें प्रकटें । प्रणवोच्चारें स्पष्टें । लागती मग वाटे । क्रियांचिये ॥ ३५८ ॥
आंधारीं अभंगु दिवा । आडवीं समर्थु बोळावा । तैसा प्रणवो जाणावा । कर्मारंभीं ॥ ३५९ ॥
उचितदेवोद्देशे । द्रव्यें धर्म्यें आणि बहुवसें । द्विजद्वारां हन हुताशें । यजिती पैं ते ॥ ३६० ॥
आहवनीयादि वन्ही । निक्षेपरूपीं हवनीं । यजिती पैं विधानीं । फुडे हौनी ॥ ३६१ ॥
किंबहुना नाना याग । निष्पत्तीचे घेउनि अंग । करिती नावडतेया त्याग । उपाधीचा ॥ ३६२ ॥
कां न्यायें जोडला पवित्रीं । भूम्यादिकीं स्वतंत्रीं । देशकाळशुद्ध पात्रीं । देती दानें ॥ ३६३ ॥
अथवा एकांतरां कृच्छ्रीं । चांद्रायणें मासोपवासीं । शोषोनि गा धातुराशी । करिती तपें ॥ ३६४ ॥
एवं यज्ञदानतपें । जियें गाजती बंधरूपें । तिहींच होय सोपें । मोक्षाचें तयां ॥ ३६५ ॥
स्थळीं नावा जिया दाटिजे । जळीं तियांचि जेवीं तरीजे । तेवीं बंधकीं कर्मीं सुटिजे । नामें येणें ॥ ३६६ ॥
परी हें असो ऐसिया । या यज्ञदानादि क्रिया । ओंकारें सावायिलिया । प्रवर्तती ॥ ३६७ ॥
तिया मोटकिया जेथ फळीं । रिगों पाहाती निहाळीं । प्रयोजिती तिये काळीं । तच्छब्दु तो ॥ ३६८ ॥

तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपः क्रियाः । दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः ॥ २५॥

जें सर्वांही जगापरौतें । जें एक सर्वही देखतें । तें तच्छब्दें बोलिजे तें । पैल वस्तु ॥ ३६९ ॥
तें सर्वादिकत्वें चित्तीं । तद्रूप ध्यावूनियां सुमती । उच्चारेंही व्यक्ती । आणिती पुढती ॥ ३७० ॥
म्हणती तद्रूपा ब्रह्मा तया । फळेंसीं क्रिया इयां । तेंचि होतु आम्हां भोगावया । कांहींचि नुरो ॥ ३७१ ॥
ऐसेनि तदात्मकें ब्रह्में । तेथ उगाणूनि कर्में । आंग झाडिती न ममें । येणें बोलें ॥ ३७२ ॥
आतां ओंकारें आदरिलें । तत्कारें समर्पिलें । इया रिती जया आलें । ब्रह्मत्व कर्मा ॥ ३७३ ॥
तें कर्म कीर ब्रह्माकारें । जालें तेणेंही न सरे । जे करी तेणेंसी दुसरें । आहे म्हणौनि ॥ ३७४ ॥
मीठ आंगें जळीं विरे । परी क्षारता वेगळी उरे । तैसें कर्म ब्रह्माकारें । गमे तें द्वैत ॥ ३७५ ॥
आणि दुजे जंव जंव घडे । तंव तंव संसारभय जोडे । हें देवो आपुलेनि तोंडें । बोलती वेद ॥ ३७६ ॥
म्हणौनि परत्वें ब्रह्म असे । तें आत्मत्वें परीयवसे । सच्छब्द या रिणादोषें । ठेविला देवें ॥ ३७७ ॥
तरी ओंकार तत्कारीं । कर्म केलें जें ब्रह्मशरीरीं । जें प्रशस्तादि बोलवरी । वाखाणिलें ॥ ३७८ ॥
प्रशस्तकर्मीं तिये । सच्छब्दा विनियोगु आहे । तोचि आइका होये । तैसा सांगों ॥ ३७९ ॥


No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099