अध्याय ८ : ओव्या १५६-१७८

३ मार्च  २०१९ निरुपण 
अध्याय ८ : अक्षरब्रह्मयोगः (गीता श्लोक १७-२० / ज्ञानेश्वरी ओव्या  १५६-१७८)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


सहस्त्रयुगपर्यन्तमहर्यद्‍ब्रह्मणो विदुः । रात्रि युगसहस्त्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥ १७॥
जैं चौकडिया सहस्र जाये । तैं ठाये ठावो विळुचि होये । आणि तैसेचि सहस्रवरिये पाहे । रात्री जेथ ॥ १५६ ॥
येवढें अहोरात्र जेथिंचें । तेणें न लोटती जे भाग्याचे । देखती ते स्वर्गींचे । चिरंजीव ॥ १५७ ॥
येरां सुरगणांची नवाई । विशेष सांगावी येथ काई । मुद्दल इंद्राचीचि दशा पाहीं । जे दिहाचे चौदा ॥ १५८ ॥
परि ब्रह्मयाचियाहि आठां पाहारांतें । आपुलिया डोळां देखते । जे आहाति गा तयांतें । अहोरात्रविद म्हणिपे ॥ १५९ ॥
अव्यक्ताद्‍व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे । रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ॥ १८॥
भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते । रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥ १९॥
तये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केहीं न समाये । ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ॥ १६० ॥
पुढती दिहाची चौपाहारी फिटे । आणि हा आकारसमुद्र आटे । पाठीं तैसाचि मग पाहांटे । भरों लागे ॥ १६१ ॥
शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं । मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ॥ १६२ ॥
तैशी ब्रह्मदिनाचिये आदी । हे भूतसृष्टीची मांदी । मिळे जंव सहस्रावधी । निमित्त पुरे ॥ १६३ ॥
पाठीं रात्रींचा अवसरु होये । आणि विश्व अव्यक्तीं लया जाये । तोही युगसहस्र मोटका पाहे । आणि तैसेंचि रचे ॥ १६४ ॥
हें सांगावया काय उपपत्ती । जे जगाचा प्रळयो आणि संभूती । इये ब्रह्मभुवनींचिया होती । अहोरात्रामाजीं ॥ १६५ ॥
कैसें थोरिवेचें मान पाहें पां । जो सृष्टीबीजाचा साटोपा । परि पुनरावृत्तीचिया मापा । शीग जाहाला ॥ १६६ ॥
एर्‍हवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा । तिये गांवींचा गा पसारा । तो हा दिनोदयीं एकसरां । मांडतु असे ॥ १६७ ॥
पाठीं रात्रींचा समो पावे । आणि अपैसाचि सांठवे । म्हणिये जेथिंचें तेथ स्वभावें । साम्यासी ये ॥ १६८ ॥
जैसें वृक्षपण बीजासि आलें । कीं मेघ हें गगन जाहालें । तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ॥ १६९ ॥

परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः । यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥ २०॥

तेथ समविषम न दिसे कांहीं । म्हणौनि भूतें हे भाष नाहीं । जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय ॥ १७० ॥
तेविं आकारलोपासरिसें । जगाचें जगपण भ्रंशे । परि जेथें जाहालें तें जैसें । तैसेंचि असे ॥ १७१ ॥
तैं तया नांव सहज अव्यक्त । आणि आकारावेळीं तेंचि व्यक्त । हें एकास्तव एक सूचित । एर्‍हवीं दोनी नाहीं ॥ १७२ ॥
जैसें आटलिया रूपें । आटलेपण ते खोटी म्हणिपे । पुढती तो घनाकारु हारपे । जे वेळीं अलंकार होती ॥ १७३ ॥
हीं दोहीं जैशीं होणीं । एकीं साक्षिभूत सुवर्णीं । तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी । वस्तूच्या ठायीं ॥ १७४ ॥
तें तरी व्यक्त ना अव्यक्त । नित्य ना नाशवंत । या दोहीं भावाअतीत । अनादिसिद्ध ॥ १७५ ॥
जें हें विश्वचि होऊनि असे । परि विश्वपण नासिलेनि न नासे । अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ॥ १७६ ॥
पाहें पां तरंग तरी होत जात । परि तेथ उदक तें अखंड असत । तेवीं भूताभावीं न नाशत । अविनाश जें ॥ १७७ ॥
नातरी आटतिये अळंकारीं । नाटतें कनक असे जयापरी । तेवीं मरतिये जीवाकारीं । अमर जें आहे ॥ १७८ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099