अध्याय १३ : ओव्या १०३०- १०५०

 २७  सप्टेंबर २०२० निरुपण 

अध्याय १३  : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक २3-२५ /  ज्ञानेश्वरी ओव्या  १०३०- १०५० )


य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह । सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ॥ २३॥


जो निखळपणें येणें । पुरुषा यया जाणे । आणि गुणांचें करणें । प्रकृतीचें तें ॥ १०३० ॥
हें रूप हे छाया । पैल जळ हे माया । ऐसा निवाडु धनंजया । जेवीं कीजे ॥ १०३१ ॥
तेणें पाडें अर्जुना । प्रकृतिपुरुषविवंचना । जयाचिया मना । गोचर जाहली ॥ १०३२ ॥
तो शरीराचेनि मेळें । करूं कां कर्में सकळें । परी आकाश धुई न मैळे । तैसा असे ॥ १०३३ ॥
आथिलेनि देहें । जो न घेपे देहमोहें । देह गेलिया नोहे । पुनरपि तो ॥ १०३४ ॥
ऐसा तया एकु । प्रकृतिपुरुषविवेकु । उपकारु अलौकिकु । करी पैं गा ॥ १०३५ ॥
परी हाचि अंतरीं । विवेक भानूचिया परी । उदैजे तें अवधारीं । उपाय बहुत ॥ १०३६ ॥


ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना । अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ॥ २४॥


कोणी एकु सुभटा । विचाराचा आगिटां । आत्मानात्मकिटा । पुटें देउनी ॥ १०३७ ॥
छत्तीसही वानी भेद । तोडोनियां निर्विवाद । निवडिती शुद्ध । आपणपें ॥ १०३८ ॥
तया आपणपयाच्या पोटीं । आत्मध्यानाचिया दिठी । देखती गा किरीटी । आपणपेंचि ॥ १०३९ ॥
आणिक पैं दैवबगें । चित्त देती सांख्ययोगें । एक ते अंगलगें । कर्माचेनी ॥ १०४० ॥


अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वाऽन्येभ्य उपासते । तेऽपि चातितरंत्येव मृत्युं श्रुतिपरायणः ॥ २५॥


येणें येणें प्रकारें । निस्तरती साचोकारें । हें भवा भेउरें । आघवेंचि ॥ १०४१ ॥
परी ते करिती ऐसें । अभिमानु दवडूनि देशें । एकाचिया विश्वासें । टेंकती बोला ॥ १०४२ ॥
जे हिताहित देखती । हानि कणवा घेपती । पुसोनि शिणु हरिती । देती सुख ॥ १०४३ ॥
तयांचेनि मुखें जें निघे । तेतुलें आदरें चांगें । ऐकोनियां आंगें । मनें होती ॥ १०४४ ॥
तया ऐकणेयाचि नांवें । ठेविती गा आघवें । तया अक्षरांसीं जीवें । लोण करिती ॥ १०४५ ॥
तेही अंतीं कपिध्वजा । इया मरणार्णवसमाजा- । पासूनि निघती वोजा । गोमटिया ॥ १०४६ ॥
ऐसेसे हे उपाये । बहुवस एथें पाहें । जाणावया होये । एकी वस्तु ॥ १०४७ ॥
आतां पुरे हे बहुत । पैं सर्वार्थाचें मथित । सिद्धांतनवनीत । देऊं तुज ॥ १०४८ ॥
येतुलेनि पंडुसुता । अनुभव लाहाणा आयिता । येर तंव तुज होतां । सायास नाहीं ॥ १०४९ ॥
म्हणौनि ते बुद्धि रचूं । मतवाद हे खांचूं । सोलीव निर्वचूं । फलितार्थुची ॥ १०५० ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099