अध्याय १८ : ओव्या ३५४-४६०

२२ ऑगस्ट २०२१ निरुपण 

अध्याय १८ ।  मोक्षसंन्यासयोग: । ( श्लोक १५-१७ / ज्ञानेश्वरी ओव्या  ३५४-४६० )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.   

शरीरवाण्‌मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः । न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः ॥ १५॥


तरी अवसांत आली माधवी । ते हेतु होय नवपल्लवीं । पल्लव पुष्पपुंज दावी । पुष्प फळातें ॥ ३५४ ॥
कां वार्षिये आणिजे मेघु । मेघें वृष्टिप्रसंगु । वृष्टीस्तव भोगु । सस्यसुखाचा ॥ ३५५ ॥
नातरी प्राची अरुणातें विये । अरुणें सूर्योदयो होये । सूर्यें सगळा पाहे । दिवो जैसा ॥ ३५६ ॥
तैसें मन हेतु पांडवा । होय कर्मसंकल्पभावा । तो संकल्पु लावी दिवा । वाचेचा गा ॥ ३५७ ॥
मग वाचेचा तो दिवटा । दावी कृत्यजातांचिया वाटा । तेव्हां कर्ता रिगे कामठां । कर्तृत्वाच्या ॥ ३५८ ॥
तेथ शरीरादिक दळवाडें । शरीरादिकां हेतुचि घडे । लोहकाम लोखंडें । निर्वाळिजे जैसें ॥ ३५९ ॥
कां तांथुवाचा ताणा । तांथु घालितां वैरणा । तो तंतुचि विचक्षणा । होय पटु ॥ ३६० ॥
तैसें मनवाचादेहाचें । कर्म मनादि हेतुचि रचे । रत्नीं घडे रत्नाचें । दळवाडें जेवीं ॥ ३६१ ॥
एथ शरीरादिकें कारणें । तेंचि हेतु केवीं हें कोणें । अपेक्षिजे तरी तेणें । अवधारिजो ॥ ३६२ ॥
आइका सूर्याचिया प्रकाशा । हेतु कारण सूर्युचि जैसा । कां ऊंसाचें कांडें ऊंसा । वाढी हेतु ॥ ३६३ ॥
नाना वाग्देवता वानावी । तैं वाचाचि लागे कामवावी । कां वेदां वेदेंचि बोलावी । प्रतिष्ठा जेवीं ॥ ३६४ ॥
तैसें कर्मा शरीरादिकें । कारण हें कीर ठाउकें । परी हेंचि हेतु न चुके । हेंही एथ ॥ ३६५ ॥
आणि देहादिकीं कारणीं । देहादि हेतु मिळणीं । होय जया उभारणी । कर्मजातां ॥ ३६६ ॥
तें शास्त्रार्थेंं मानिलेया । मार्गा अनुसरे धनंजया । तरी न्याय तो न्याया । हेतु होय ॥ ३६७ ॥
जैसा पर्जन्योदकाचा लोटु । विपायें धरी साळीचा पाटु । तो जिरे परी अचाटु । उपयोगु आथी ॥ ३६८ ॥
कां रोषें निघालें अवचटें । पडिलें द्वारकेचिया वाटे । तें शिणे परी सुनाटें । न वचिती पदें ॥ ३६९ ॥
तैसें हेतुकारण मेळें । उठी कर्म जें आंधळें । तें शास्त्राचें लाहे डोळे । तैं न्याय म्हणिपे ॥ ३७० ॥
ना दूध वाढिता ठावो पावे । तंव उतोनि जाय स्वभावें । तोही वेंचु परी नव्हे । वेंचिलें तें ॥ ३७१ ॥
तैसें शास्त्रसाह्येंवीण । केलें नोहे जरी अकारण । तरी लागो कां नागवण । दानलेखीं ॥ ३७२ ॥
अगा बावन्ना वर्णांपरता । कोण मंत्रु आहे पंडुसुता । कां बावन्नही नुच्चारितां । जीवु आथी ? ॥ ३७३ ॥
परी मंत्राची कडसणी । जंव नेणिजे कोदंडपाणी । तंव उच्चारफळ वाणी । न पवे जेवीं ॥ ३७४ ॥
तेवीं कारणहेतुयोगें । जें बिसाट कर्म निगे । तें शास्त्राचिये न लगे । कांसे जंव ॥ ३७५ ॥
कर्म होतचि असे तेव्हांही । परी तें होणें नव्हे पाहीं । तो अन्यायो गा अन्यायीं । हेतु होय ॥ ३७६ ॥


तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः । पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः ॥ १६॥


एवं पंचकारणा कर्मा । पांचही हेतु हे सुमहिमा । आतां एथें पाहें पां आत्मा । सांपडला असे ? ॥ ३७७ ॥
भानु न होनि रूपें जैसीं । चक्षुरूपातें प्रकाशी । आत्मा न होनि कर्में तैसीं । प्रकटित असे गा ॥ ३७८ ॥
पैं प्रतिबिंब आरिसा । दोन्ही न होनि वीरेशा । दोहींतें प्रकाशी जैसा । न्याहाळिता तो ॥ ३७९ ॥
कां अहोरात्र सविता । न होनि करी पंडुसुता । तैसा आत्मा कर्मकर्ता । न होनि दावी ॥ ३८० ॥
परी देहाहंमान भुली । जयाची बुद्धि देहींचि आतली । तया आत्मविषयीं जाली । मध्यरात्री गा ॥ ३८१ ॥
जेणें चैतन्या ईश्वरा ब्रह्मा । देहचि केलें परमसीमा । तया आत्मा कर्ता हे प्रमा । अलोट उपजे ॥ ३८२ ॥
आत्माचि कर्मकर्ता । हाही निश्चयो नाहीं तत्वतां । देहोचि मी कर्मकर्ता । मानितो साचे ॥ ३८३ ॥
जे आत्मा मी कर्मातीतु । सर्वकर्मसाक्षिभूतु । हे आपुली कहीं मातु । नायकेचि कानीं ॥ ३८४ ॥
म्हणौनि उमपा आत्मयातें । देहचिवरी मविजे एथें । विचित्र काई रात्रि दिवसातें । डुडुळ न करी ? ॥ ३८५ ॥
पैं जेणें आकाशींचा कहीं । सत्य सूर्यु देखिला नाहीं । तो थिल्लरींचें बिंब काई । मानू न लाहे ? ॥ ३८६ ॥
थिल्लराचेनि जालेपणें । सूर्यासि आणी होणें । त्याच्या नाशीं नाशणें । कंपें कंपू ॥ ३८७ ॥
आणि निद्रिस्ता चेवो नये । तंव स्वप्न साच हों लाहे । रज्जु नेणतां सापा बिहे । विस्मो कवण ? ॥ ३८८ ॥
जंव कवळ आथि डोळां । तंव चंद्रु देखावा कींं पिंवळा । काय मृगींहीं मृगजळा । भाळावें नाहीं ? ॥ ३८९ ॥
तैसा शास्त्रगुरूचेनि नांवे । जो वाराही टेंकों नेदी सिवें । केवळ मौढ्याचेनिचि जीवें । जियाला जो ॥ ३९० ॥
तेणें देहात्मदृष्टीमुळें । आत्मया घापे देहाचें जाळें । जैसा अभ्राचा वेगु कोल्हें । चंद्रीं मानीं ॥ ३९१ ॥
मग तया मानणयासाठीं । देहबंदीशाळे किरीटी । कर्माच्या वज्रगांठी । कळासे तो ॥ ३९२ ॥
पाहे पां बद्ध भावना दृढा । नळियेवरी तो बापुडा । काय मोकळेयाही पायाचा चवडा । न ठकेचि पुंसा । ॥ ३९३ ॥
म्हणौनि निर्मळा आत्मस्वरूपीं । तो प्रकृतीचें केलें आरोपी । तो कल्पकोडीच्या मापीं । मवीचि कर्में ॥ ३९४ ॥
आता कर्मामाजीं असे । परी तयातें कर्म न स्पर्शे । वडवानळातें जैसें । समुद्रोदक ॥ ३९५ ॥
तैसेंनि वेगळेपणें । जयाचें कर्मीं असणें । तो कीर वोळखावा कवणें । तरी सांगो ॥ ३९६ ॥
जे मुक्तातें निर्धारितां । लाभे आपलीच मुक्तता । जैसी दीपें दिसें पाहतां । आपली वस्तु ॥ ३९७ ॥
नातरी दर्पणु जंव उटिजे । तंव आपणपयां आपण भेटिजे । कां तोय पावतां तोय होईजे । लवणें जेंवीं ॥ ३९८ ॥
हें असो परतोनि मागुतें । प्रतिबिंब पाहे बिंबातें । तंव पाहणें जाउनी आयितें । बिंबचि होय ॥ ३९९ ॥
तैसें हारपलें आपणपें पावे । तैं संतांतें पाहतां गिंवसावें । म्हणौनि वानावे ऐकावे । तेचि सदा ॥ ४०० ॥
परी कर्मीं असोनि कर्में । जो नावरे समेंविषमें । चर्मचक्षूंचेनि चामें । दृष्टि जैसी ॥ ४०१ ॥
तैसा सोडवला जो आहे । तयाचें रूप आतां पाहें । उपपत्तीची बाहे । उभऊनि सांगों ॥ ४०२ ॥


यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते । हत्वाऽपि स इमा.ण्ल्लोकान्न हन्ति न निबध्यते ॥ १७॥


तरी अविद्येचिया निदा । विश्वस्वप्नाचा हा धांदा । भोगीत होता प्रबुद्धा । अनादि जो ॥ ४०३ ॥
तो महावाक्याचेनि नांवें । गुरुकृपेचेनि थांवें । माथां हातु ठेविला नव्हे । थापटिला जैसा ॥ ४०४ ॥
तैसा विश्वस्वप्नेंसीं माया । नीद सांडूनि धनंजया । सहसा चेइला अद्वया\- । नंदपणें जो ॥ ४०५ ॥
तेव्हां मृगजळाचे पूर । दिसते एक निरंतर । हारपती कां चंद्रकर । फांकतां जैसे ॥ ४०६ ॥
कां बाळत्व निघोनि जाय । तैं बागुला नाहीं त्राय । पैं जळालिया इंधन न होय । इंधन जेवीं ॥ ४०७ ॥
नाना चेवो आलिया पाठीं । तैं स्वप्न न दिसे दिठी । तैसी अहं ममता किरीटी । नुरेचि तया ॥ ४०८ ॥
मग सूर्यु आंधारालागीं । रिघो कां भलते सुरंगीं । परी तो तयाच्या भागीं । नाहींचि जैसा ॥ ४०९ ॥
तैसा आत्मत्वें वेष्टिला होये । तो जया जया दृश्यातें पाहें । तें दृष्य द्रष्टेपणेंसीं होत जाये । तयाचेंचि रूप ॥ ४१० ॥
जैसा वन्हि जया लागे । तें वन्हिचि जालिया आंगें । दाह्यदाहकविभागें । सांडिजे तें ॥ ४११ ॥
तैसा कर्माकारा दुजेया । तो कर्तेपणाचा आत्मया । आळु आला तो गेलिया । कांहीं बाहीं जें उरे ॥ ४१२ ॥
तिये आत्मस्थितीचा जो रावो । मग तो देहीं इये जाणेल ठावो ? । काय प्रलयांबूचा उन्नाहो । वोघु मानी ? ॥ ४१३ ॥
तैसी ते पूर्ण अहंता । काई देहपणें पंडुसुता । आवरे काई सविता । बिंबें धरिला ? ॥ ४१४ ॥
पैं मथूनि लोणी घेपे । तें मागुती ताकीं घापे । तरी तें अलिप्तपणें सिंपे । तेणेंसी काई ? ॥ ४१५ ॥
नाना काष्ठौनि वीरेशा । वेगळा केलिया हुताशा । राहे काष्ठाचिया मांदुसा । कोंडलेपणें ? ॥ ४१६ ॥
कां रात्रीचिया उदराआंतु । निघाला जो हा भास्वतु । तो रात्री ऐसी मातु । ऐके कायी ? ॥ ४१७ ॥
तैसें वेद्य वेदकपणेंसी । पडिलें कां जयाचे ग्रासीं । तया देह मी ऐसी । अहंता कैंची ? ॥ ४१८ ॥
आणि आकाशें जेथें जेथुनी । जाइजे तेथ असे भरोनी । म्हणौनि ठेलें कोंदोनी । आपेंआप ॥ ४१९ ॥
तैसें जें तेणें करावें । तो तेंचि आहे स्वभावें । मा कोणें कर्मीं वेष्टावें । कर्तेपणें ? ॥ ४२० ॥
नुरेचि गगनावीण ठावो । नोहेचि समुद्रा प्रवाहो । नुठीचि ध्रुवा जावों । तैसें जाहालें ॥ ४२१ ॥
ऐसेनि अहंकृतिभावो । जयाचा बोधीं जाहला वावो । तऱ्ही देहा जंव निर्वाहो । तंव आथी कर्में ॥ ४२२ ॥
वारा जरी वाजोनि वोसरे । तरी तो डोल रुखीं उरे ।  कां सेंदें द्रुति राहे कापुरें । वेंचलेनी ॥ ४२३ ॥
कां सरलेया गीताचा समारंभु । न वचे राहवलेपणाचा क्षोभु । भूमी लोळोनि गेलिया अंबु । वोल थारे ॥ ४२४ ॥
अगा मावळलेनि अर्कें । संध्येचिये भूमिके । ज्योतिदीप्ति कौतुकें । दिसे जैसी ॥ ४२५ ॥
पैं लक्ष भेदिलियाहीवरी । बाण धांवेचि तंववरी । जंव भरली आथी उरी । बळाची ते ॥ ४२६ ॥
नाना चक्रीं भांडें जालें । तें कुलालें परतें नेलें । परी भ्रमेंचि तें मागिले । भोवंडिलेपणें ॥ ४२७ ॥
तैसा देहाभिमानु गेलिया । देह जेणें स्वभावें धनंजया । जालें तें अपैसया । चेष्टवीच तें ॥ ४२८ ॥
संकल्पेंवीण स्वप्न । न लावितां दांगीचें बन । न रचितां गंधर्वभुवन । उठी जैसें ॥ ४२९ ॥
आत्मयाचेनि उद्यमेंवीण । तैसें देहादिपंचकारण । होय आपणयां आपण । क्रियाजात ॥ ४३० ॥
पैं प्राचीनसंस्कारवशें । पांचही कारणें सहेतुकें । कामवीजती गा अनेकें । कर्माकारें ॥ ४३१ ॥
तया कर्मामाजीं मग । संहरो आघवें जग । अथवा नवें चांग । अनुकरो ॥ ४३२ ॥
परी कुमुद कैसेनि सुके । कैसें तें कमळ फांके । हीं दोन्ही रवी न देखे । जयापरी ॥ ४३३ ॥
कां वीजु वर्षोनि आभाळ । ठिकरिया आतो भूतळ । अथवा करूं शाड्वळ । प्रसन्नावृष्टी ॥ ४३४ ॥
तरी तया दोहींतें जैसें । नेणिजेचि कां आकाशें । तैसा देहींच जो असे । विदेहदृष्टी ॥ ४३५ ॥
तो देहादिकीं चेष्टीं । घडतां मोडतां हे सृष्टी । न देखे स्वप्न दृष्टी । चेइला जैसा ॥ ४३६ ॥
येऱ्हवीं चामाचे डोळेवरी । जे देखती देहचिवरी । ते कीर तो व्यापारी । ऐसेंचि मानिती ॥ ४३७ ॥
कां तृणाचा बाहुला । जो आगरामेरें ठेविला । तो साचचि राखता कोल्हा । मानिजे ना ? ॥ ४३८ ॥
पिसेंं नेसलें कां नागवें । हें लोकीं येऊनि जाणावें । ठाणोरियांचें मवावें । आणिकीं घाय ॥ ४३९ ॥
कां महासतीचे भोग । देखे कीर सकळ जग । परी ते आगी ना आंग । ना लोकु देखे ॥ ४४० ॥
तैसा स्वस्वरूपें उठिला । जो दृश्येंसी द्रष्टा आटला । तो नेणें काय राहटला । इंद्रियग्रामु ॥ ४४१ ॥
अगा थोरीं कल्लोळीं कल्लोळ साने । लोपतां तिरींचेनि जनें । एकीं एक गिळिलें हें मनें । मानिजे जऱ्ही ॥ ४४२ ॥
तऱ्ही उदकाप्रति पाहीं । कोण ग्रसितसे काई । तैसें पूर्णा दुजें नाहीं । जें तो मारी ॥ ४४३ ॥
सुवर्णाचिया चंडिका । सुवर्णशूळेंचि देखा । सुवर्णाचिया महिखा । नाशु केला ॥ ४४४ ॥
तो देवलवसिया कडा । व्यवहारु गमला फुडा । वांचूनि शूळ महिष चामुंडा । सुवर्णचि तें ॥ ४४५ ॥
पैं चित्रींचें जळ हुतांशु । तो दृष्टीचाचि आभासु । पटीं आगी वोलांशु । दोन्ही नाहीं ॥ ४४६ ॥
मुक्ताचें देह तैसें । हालत संस्कारवशें । तें देखोनि लोक पिसे । कर्ता म्हणती ॥ ४४७ ॥
आणि तयां करणेया आंतु । घडो तिहीं लोकां घातु । परी तेणें केला हे मातु । बोलों नये ॥ ४४८ ॥
अगा अंधारुचि देखावा तेजें । मग तो फेडी हें बोलिजे । तैसें ज्ञानिया नाहीं दुजें । जें तो मारी । ॥ ४४९ ॥
म्हणौनि तयाचि बुद्धी । नेणे पापपुण्याची गंधी । गंगा मीनलिया नदी । विटाळु जैसा ॥ ४५० ॥
आगीसी आगी झगटलिया । काय पोळे धनंजया । कीं शस्त्र रुपे आपणया । आपणचि ॥ ४५१ ॥
तैसें आपणपयापरतें । जो नेणें क्रियाजातातें । तेथ काय लिंपवी बुद्धीतें । तयाचिये ॥ ४५२ ॥
म्हणौनि कार्य कर्ता क्रिया । हें स्वरूपचि जाहलें जया । नाहीं शरीरादिकीं तया । कर्मी बंधु ॥ ४५३ ॥
जे कर्ता जीव विंदाणीं । काढूनि पांचही खाणी । घडित आहे करणीं । आउतीं दाहें ॥ ४५४ ॥
तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधूनि आवो । उभविता न लवी खेंवो । कर्मभुवनें ॥ ४५५ ॥
या थोराडा कीर कामा । विरजा नोहे आत्मा । परी म्हणसी हन उपक्रमा । हातु लावी ॥ ४५६ ॥
तो साक्षी चिद्रूपु । कर्मप्रवृत्तीचा संकल्पु । उठी तो कां निरोपु । आपणचि दे ? ॥ ४५७ ॥
तरी कर्मप्रवृत्तीहीलागीं । तया आयासु नाहीं आंगीं । जे प्रवृत्तीचेही उळिगीं । लोकुचि आथी ॥ ४५८ ॥
म्हणौनि आत्मयाचें केवळ । जो रूपचि जाहला निखिळ । तया नाहीं बंदिशाळ । कर्माचि हे ॥ ४५९ ॥
परी अज्ञानाच्या पटीं । अन्यथा ज्ञानाचें चित्र उठी । तेथ चितारणी हे त्रिपुटी । प्रसिद्ध जे कां ॥ ४६० ॥


No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099