३ फेब्रुवारी २०१९ निरुपण
अध्याय ८ : अक्षरब्रह्मयोगः (गीता श्लोक १-३ / ज्ञानेश्वरी ओव्या १-२०)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
अथ अष्टमोऽध्यायः – अध्याय आठवा
अर्जुन उवाच ।
किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥ १ ॥
मग अर्जुनें म्हणितलें । हां हो जी अवधारिलें । जें म्यां पुसिलें । तें निरूपिजो ॥ १ ॥
सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म ।अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ॥ २ ॥
अधिभूत तें कैसें । एथ अधिदैव तें कवण असे ।हें उघड मी परियेसें । ऐसें बोला ॥ ३ ॥
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन । प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥ २॥

देवा अधियज्ञ तो काई । कवण पां इये देहीं । हें अनुमानासि कांहीं । दिठी न भरे ॥ ४ ॥
आणि नियता अंतःकरणीं । तूं जाणिजसी देहप्रयाणीं । तें कैसेनि हे शारङ्गपाणी । परिसवा मातें ॥ ५ ॥
देखा धवळारीं चिंतामणीचा । जरी पहुडला होय दैवाचा । तरी वोसणतांही बोलु तयाचा । सोपु न वचे ॥ ६ ॥
तैसें अर्जुनाचिया बोलासवें । आलें तेंचि म्हणितलें देवें । तें परियेसें गा बरवें । जे पुसिलें तुवां ॥ ७ ॥
किरीटी कामधेनूचा पाडा । वरी कल्पतरूचा आहे मांदोडा । म्हणौनि मनोरथसिद्धीचिया चाडा । तो नवल नोहे ॥ ८ ॥
श्रीकृष्ण कोपोनि ज्यासी मारी । तो पावे परब्रह्मसाक्षात्कारीं । मा कृपेनें उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ॥ ९ ॥
जैं कृष्णचि होइजे आपण । तैं कृष्ण होय आपुलें अंतःकरण । मग संकल्पाचें आंगण । वोळगती सिद्धी ॥ १० ॥
परि ऐसें जें प्रेम । तें अर्जुनींचि आथि निस्सीम । म्हणौनि तयाचें काम । सदां सफळ ॥ ११ ॥
या कारणें श्रीअनंतें । तें मनोगत तयाचें पुसतें । होईल जाणोनि आइतें । वोगरूनि ठेविलें ॥ १२ ॥
जें अपत्य थानीहूनि निगे । तयाची भूक ते मायेसीचि लागे । एर्हवीं तें शब्दें काय सांगें । मग स्तन्य दे येरी ? ॥ १३ ॥
म्हणौनि कृपाळुवा गुरूचिया ठायीं । हें नवल नोहे कांहीं । परि तें असो आइका काई । जें देव बोलते जाहले ॥ १४ ॥

श्रीभगवानुवाच ।
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते । भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः ॥ ३॥

मग म्हणितलें सर्वेश्वरें । जें आकारीं इयें खोंकरें । कोंदलें असत न खिरे । कवणे काळीं ॥ १५ ॥
एर्हवीं सपूरपण तयाचें पहावें । तरी शून्यचि नव्हे स्वभावें । वरी गगनाचेनि पालवें । गाळूनि घेतलें ॥ १६ ॥
जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे । हालवलेंहि न गळे । तें परब्रह्म ॥ १७ ॥
आणि आकाराचेनि जालेपणें । जन्मधर्मातें नेणें । आकारलोपीं निमणें । नाहीं कहीं ॥ १८ ॥
ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती । तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ॥ १९ ॥
मग गगनीं जेविं निर्मळें । नेणों कैचीं एके वेळे । उठती घनपटळें । नानावर्णें ॥ २० ॥

No comments:
Post a Comment