१० ऑक्टोबर २०२० निरुपण
अध्याय १३ : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक २९-३४ / ज्ञानेश्वरी ओव्या १०८० - ११७० )
प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः । यः पश्यति तथाऽऽत्मानंअकर्तारं स पश्यति ॥ २९॥
आणि मनोबुद्धिप्रमुखें । कर्मेंद्रियें अशेखें । करी प्रकृतीचि हें देखे । साच जो गा ॥ १०८० ॥
घरींचीं राहटती घरीं । घर कांहीं न करी । अभ्र धांवे अंबरीं । अंबर तें उगें ॥ १०८१ ॥
तैसी प्रकृति आत्मप्रभा । खेळे गुणीं विविधारंभा । येथ आत्मा तो वोथंबा । नेणे कोण ॥ १०८२ ॥
ऐसेनि येणें निवाडें । जयाच्या जीवीं उजिवडें । अकर्तयातें फुडें । देखिलें तेणें ॥ १०८३ ॥
यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति । तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ॥ ३०॥
एऱ्हवीं तैंचि अर्जुना । होईजे ब्रह्मसंपन्ना । जैं या भूताकृती भिन्ना । दिसती एकी ॥ १०८४ ॥
लहरी जैसिया जळीं । परमाणुकणिका स्थळीं । रश्मीकरमंडळीं । सूर्याच्या जेवीं ? ॥ १०८५ ॥
नातरी देहीं अवेव । मनीं आघवेचि भाव । विस्फुलिंग सावेव । वन्हीं एकीं ॥ १०८६ ॥
तैसे भूताकार एकाचे । हें दिठी रिगे जैं साचें । तैंचि ब्रह्मसंपत्तीचें । तारूं लागे ॥ १०८७ ॥
मग जया तयाकडे । ब्रह्मेचि दिठी उघडे । किंबहुना जोडे । अपार सुख ॥ १०८८ ॥
येतुलेनि तुज पार्था । प्रकृतिपुरुषव्यवस्था । ठायें ठावो प्रतीतिपथा- । माजीं जाहली ? ॥ १०८९ ॥
अमृत जैसें ये चुळा । कां निधान देखिजे डोळां । तेतुला जिव्हाळा । मानावा हा ॥ १०९० ॥
जी जाहलिये प्रतीती । घर बांधणें जें चित्तीं । तें आतां ना सुभद्रापती । इयावरी ॥ १०९१ ॥
तरी एक दोन्ही ते बोल । बोलिजती सखोल । देईं मनातें वोल । मग ते घेईं ॥ १०९२ ॥
ऐसें देवें म्हणितलें । मग बोलों आदरिलें । तेथें अवधानाचेचि केलें । सर्वांग येरें ॥ १०९३ ॥
अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः । शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥ ३१॥
तरी परमात्मा म्हणिपे । तो ऐसा जाण स्वरूपें । जळीं जळें न लिंपे । सूर्यु जैसा ॥ १०९४ ॥
कां जे जळा आदीं पाठीं । तो असतुचि असे किरीटी । माजीं बिंबे तें दृष्टी । आणिकांचिये ॥ १०९५ ॥
तैसा आत्मा देहीं । आथि म्हणिपे हें कांहीं । साचें तरी नाहीं । तो जेथिंचा तेथें ॥ १०९६ ॥
आरिसां मुख जैसें । बिंबलिया नाम असे । देहीं वसणें तैसें । आत्मतत्त्वा ॥ १०९७ ॥
तया देहा म्हणती भेटी । हे सपायी निर्जीव गोठी । वारिया वाळुवे गांठी । केंही आहे ? ॥ १०९८ ॥
आगी आणि कापुसा । दोरा सुवावा कैसा । केउता सांदा आकाशा । पाषाणेंसी ? ॥ १०९९ ॥
एक निघे पूर्वेकडे । एक तें पश्चिमेकडे । तिये भेटीचेनि पाडें । संबंधु हा ॥ ११०० ॥
उजियेडा आणि अंधारेया । जो पाडु मृता उभेयां । तोचि गा आत्मया । देहा जाण ॥ ११०१ ॥
रात्री आणि दिवसा । कनका आणि कापुसा । अपाडु कां जैसा । तैसाचि यासी ॥ ११०२ ॥
देह तंव पांचांचें जालें । हें कर्माचें गुणीं गुंथले । भंवतसे चाकीं सूदलें । जन्ममृत्यूच्या ॥ ११०३ ॥
हें काळानळाच्या तोंडीं । घातली लोणियाची उंडी । माशी पांखु पाखडी । तंव हें सरे ॥ ११०४ ॥
हें विपायें आगींत पडे । तरी भस्म होऊनि उडे । जाहलें श्वाना वरपडें । तरी ते विष्ठा ॥ ११०५ ॥
या चुके दोहीं काजा । तरी होय कृमींचा पुंजा । हा परिणामु कपिध्वजा । कश्मलु गा ॥ ११०६ ॥
या देहाची हे दशा । आणि आत्मा तो एथ ऐसा । पैं नित्य सिद्ध आपैसा । अनादिपणें ॥ ११०७ ॥
सकळु ना निष्कळु । अक्रियु ना क्रियाशीळु । कृश ना स्थुळु । निर्गुणपणें ॥ ११०८ ॥
आभासु ना निराभासु । प्रकाशु ना अप्रकाशु । अल्प ना बहुवसु । अरूपपणें ॥ ११०९ ॥
रिता ना भरितु । रहितु ना सहितु । मूर्तु ना अमूर्तु । शून्यपणें ॥ १११० ॥
आनंदु ना निरानंदु । एक ना विविधु । मुक्त ना बद्धु । आत्मपणें ॥ ११११ ॥
येतुला ना तेतुला । आइता ना रचिला । बोलता ना उगला । अलक्शपणें ॥ १११२ ॥
सृष्टीच्या होणा न रचे । सर्वसंहारें न वेंचे । आथी नाथी या दोहींचें । पंचत्व तो ॥ १११३ ॥
मवे ना चर्चे । वाढे ना खांचे । विटे ना वेंचे । अव्ययपणें ॥ १११४ ॥
एवं रूप पैं आत्मा । देहीं जें म्हणती प्रियोत्तमा । तें मठाकारें व्योमा । नाम जैसें ॥ १११५ ॥
तैसें तयाचिये अनुस्यूती । होती जाती देहाकृती । तो घे ना सांडी सुमती । जैसा तैसा ॥ १११६ ॥
अहोरात्रें जैशी । येती जाती आकाशीं । आत्मसत्तें तैसीं । देहें जाण ॥ १११७ ॥
म्हणौनि इयें शरीरीं । कांहीं करवीं ना करी । आयताही व्यापारीं । सज्ज न होय ॥ १११८ ॥
यालागीं स्वरूपें । उणा पुरा न घेपे । हें असो तो न लिंपे । देहीं देहा ॥ १११९ ॥
यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते । सर्वत्रावस्थितो देहे तथाऽऽत्मा नोपलिप्यते ॥ ३२॥
अगा आकाश कें नाहीं ? । हें न रिघेचि कवणे ठायीं ? । परी कायिसेनि कहीं । गादिजेना ॥ ११२० ॥
तैसा सर्वत्र सर्व देहीं । आत्मा असतुचि असे पाहीं । संगदोषें एकेंही । लिप्त नोहे ॥ ११२१ ॥
पुढतपुढती एथें । हेंचि लक्षण निरुतें । जे जाणावें क्षेत्रज्ञातें । क्षेत्रविहीना ॥ ११२२ ॥
संसर्गें चेष्टिजे लोहें । परी लोह भ्रामकु नोहे । क्षेत्रक्षेत्रज्ञां आहे । तेतुला पाडु ॥ ११२३ ॥
दीपकाची अर्ची । राहाटी वाहे घरींची । परी वेगळीक कोडीची । दीपा आणि घरा ॥ ११२४ ॥
पैं काष्ठाच्या पोटीं । वन्हि असे किरीटी । परी काष्ठ नोहे या दृष्टी । पाहिजे हा ॥ ११२५ ॥
अपाडु नभा आभाळा । रवि आणि मृगजळा । तैसाचि हाही डोळां । देखसी जरी ॥ ११२६ ॥
यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः । क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत ॥ ३३॥
हें आघवेंचि असो एकु । गगनौनि जैसा अर्कु । प्रगटवी लोकु । नांवें नांवें ॥ ११२७ ॥
एथ क्षेत्रज्ञु तो ऐसा । प्रकाशकु क्षेत्राभासा । यावरुतें हें न पुसा । शंका नेघा ॥ ११२८ ॥
क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा । भूतप्रकृतिमोक्षं च विदुर्यान्ति ते परम् ॥ ३४॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगोनाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥
शब्दतत्त्वसारज्ञा । पैं देखणें तेचि प्रज्ञा । जे क्षेत्रा क्षेत्रज्ञा । अपाडु देखे ॥ ११२९ ॥
इया दोहींचें अंतर । देखावया चतुर । ज्ञानियांचे द्वार । आराधिती ॥ ११३० ॥
याचिलागीं सुमती । जोडिती शांतिसंपत्ती । शास्त्रांचीं दुभतीं । पोसिती घरीं ॥ ११३१ ॥
योगाचिया आकाशा । वळघिजे येवढाचि धिंवसा । याचियाचि आशा । पुरुषासि गा ॥ ११३२ ॥
शरीरादि समस्त । मानिताति तृणवत । जीवें संतांचे होत । वाहणधरु ॥ ११३३ ॥
ऐसैसियापरी । ज्ञानाचिया भरोवरी । करूनियां अंतरीं । निरुतें होती ॥ ११३४ ॥
मग क्षेत्रक्षेत्रज्ञांचें । जें अंतर देखती साचें । ज्ञानें उन्मेख तयांचें । वोवाळूं आम्ही ॥ ११३५ ॥
आणि महाभूतादिकीं । प्रभेदलीं अनेकीं । पसरलीसे लटिकी । प्रकृति जे हे ॥ ११३६ ॥
जे शुकनळिकान्यायें । न लगती लागली आहे । हें जैसें तैसें होये । ठाउवें जयां ॥ ११३७ ॥
जैसी माळा ते माळा । ऐसीचि देखिजे डोळां । सर्पबुद्धि टवाळा । उखी हौनी ॥ ११३८ ॥
कां शुक्ति ते शुक्ती । हे साच होय प्रतीती । रुपेयाची भ्रांती । जाऊनियां ॥ ११३९ ॥
तैसी वेगळी वेगळेपणें । प्रकृति जे अंतःकरणें । देखती ते मी म्हणें । ब्रह्म होती ॥ ११४० ॥
जें आकाशाहूनि वाड । जें अव्यक्ताची पैल कड । जें भेटलिया अपाडा पाड । पडों नेदी ॥ ११४१ ॥
आकारु जेथ सरे । जीवत्व जेथ विरे । द्वैत जेथ नुरे । अद्वय जें ॥ ११४२ ॥
तें परम तत्त्व पार्था । होती ते सर्वथा । जे आत्मानात्मव्यवस्था- । राजहंसु ॥ ११४३ ॥
ऐसा हा जी आघवा । श्रीकृष्णें तया पांडवा । उगाणा दिधला जीवा । जीवाचिया ॥ ११४४ ॥
येर कलशींचें येरीं । रिचविजे जयापरी । आपणपें तया श्रीहरी । दिधलें तैसें ॥ ११४५ ॥
आणि कोणा देता कोण । तो नर तैसा नारायण । वरी अर्जुनातें श्रीकृष्ण । हा मी म्हणे ॥ ११४६ ॥
परी असो तें नाथिलें । न पुसतां कां मी बोलें । किंबहुना दिधलें । सर्वस्व देवें ॥ ११४७ ॥
कीं तो पार्थु जी मनीं । अझुनी तृप्ती न मनी । अधिकाधिक उतान्ही । वाढवीतु असे ॥ ११४८ ॥
स्नेहाचिया भरोवरी । आंबुथिला दीपु घे थोरी । चाड अर्जुना अंतरीं । परिसतां तैसी ॥ ११४९ ॥
तेथ सुगरिणी आणि उदारे । रसज्ञ आणि जेवणारे । मिळती मग अवतरे । हातु जैसा ॥ ११५० ॥
तैसें जी होतसे देवा । तया अवधानाचिया लवलवा । पाहतां व्याख्यान चढलें थांवा । चौगुणें वरी ॥ ११५१ ॥
सुवायें मेघु सांवरे । जैसा चंद्रें सिंधु भरे । तैसा मातुला रसु आदरें । श्रोतयांचेनि ॥ ११५२ ॥
आतां आनंदमय आघवें । विश्व कीजेल देवें । तें रायें परिसावें । संजयो म्हणे ॥ ११५३ ॥
एवं जे महाभारतीं । श्रीव्यासें आप्रांतमती । भीष्मपर्वसंगतीं । म्हणितली कथा ॥ ११५४ ॥
तो कृष्णार्जुनसंवादु । नागरीं बोलीं विशदु । सांगोनि दाऊं प्रबंधु । वोवियेचा ॥ ११५५ ॥
नुसधीचि शांतिकथा । आणिजेल कीर वाक्पथा । जे शृंगाराच्या माथां । पाय ठेवी ॥ ११५६ ॥
दाऊं वेल्हाळे देशी नवी । जे साहित्यातें वोजावी । अमृतातें चुकी ठेवी । गोडिसेंपणें ॥ ११५७ ॥
बोल वोल्हावतेनि गुणें । चंद्रासि घे उमाणे । रसरंगीं भुलवणें । नादु लोपी ॥ ११५८ ॥
खेचरांचियाही मना । आणीन सात्त्विकाचा पान्हा । श्रवणासवें सुमना । समाधि जोडे ॥ ११५९ ॥
तैसा वाग्विलास विस्तारू । गीतार्थेंसी विश्व भरूं । आनंदाचें आवारूं । मांडूं जगा ॥ ११६० ॥
फिटो विवेकाची वाणी । हो कानामनाची जिणी । देखो आवडे तो खाणी । ब्रह्मविद्येची ॥ ११६१ ॥
दिसो परतत्त्व डोळां । पाहो सुखाचा सोहळा । रिघो महाबोध सुकाळा- । माजीं विश्व ॥ ११६२ ॥
हें निफजेल आतां आघवें । ऐसें बोलिजेल बरवें । जें अधिष्ठिला असें परमदेवें । श्रीनिवृत्तीं मी ॥ ११६३ ॥
म्हणौनि अक्षरीं सुभेदीं । उपमा श्लोक कोंदाकोंदी । झाडा देईन प्रतिपदीं । ग्रंथार्थासी ॥ ११६४ ॥
हा ठावोवरी मातें । पुरतया सारस्वतें । केलें असे श्रीमंतें । श्रीगुरुरायें ॥ ११६५ ॥
तेणें जी कृपासावायें । मी बोलें तेतुलें सामाये । आणि तुमचिये सभे लाहें । गीता म्हणों ॥ ११६६ ॥
वरी तुम्हा संतांचे पाये । आजि मी लाधलों आहें । म्हणौनि जी नोहे । अटकु काहीं ॥ ११६७ ॥
प्रभु काश्मिरीं मुकें । नुपजे हें काय कौतुकें । नाहीं उणीं सामुद्रिकें । लक्ष्मीयेसी ॥ ११६८ ॥
तैसी तुम्हां संतांपासीं । अज्ञानाची गोठी कायसी । यालागीं नवरसीं । वरुषेन मी ॥ ११६९ ॥
किंबहुना आतां देवा । अवसरु मज देयावा । ज्ञानदेव म्हणे बरवा । सांगेन ग्रंथु ॥ ११७० ॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां त्रयोदशोऽध्यायः ॥
No comments:
Post a Comment