१४ फेब्रुवारी २०२१ निरुपण
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः । प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥ १४॥
म्हणौनि प्राणिजातांच्या घटीं । करूनि कंदावरी आगिठी । दीप्ति जठरींही किरीटी । मीचि जालों ॥ ४०७ ॥
प्राणापानाच्या जोडभातीं । फुंकफुंकोनियां अहोराती ।आटीतसें नेणों किती । उदरामाजीं ॥ ४०८ ॥
शुष्कें अथवा स्निग्धें । सुपक्वें कां विदग्धें । परी मीचि गा चतुर्विधें । अन्नें पचीं ॥ ४०९ ॥
एवं मीचि आघवें जन । जना निरवितें मीचि जीवन ।जीवनीं मुख्य साधन । वन्हिही मीचि ॥ ४१० ॥
आतां ऐसियाहीवरी काई । सांगों व्याप्तीची नवाई । येथ दुजें नाहींचि घेईं । सर्वत्र मी गा ॥ ४११ ॥
तरी कैसेनि पां वेखें । सदा सुखियें एकें । एकें तियें बहुदुःखें । क्रांत भूतें ॥ ४१२ ॥
जैसी सगळिये पाटणीं । एकेंचि दीपें दिवेलावणी । जालिया कां न देखणी । उरलीं एकें ॥ ४१३ ॥
ऐसी हन उखिविखी । करित आहासि मानसीं कीं । तरी परिस तेही निकी । शंका फेडुं ॥ ४१४ ॥
पैं आघवा मीचि असें । येथ नाहीं कीर अनारिसें । परी प्राणियांचिया उल्लासें । बुद्धि ऐसा ॥ ४१५ ॥
जैसें एकचि आकाशध्वनी । वाद्यविशेषीं आनानीं । वाजावें पडे भिन्नीं । नादांतरीं ॥ ४१६ ॥
कां लोकचेष्टीं वेगळालां । जो हा एकचि भानु उदैला । तो आनानी परी गेला । उपयोगासी ॥ ४१७ ॥
नाना बीजधर्मानुरूप । झाडीं उपजविलें आप । तैसें परिणमलें स्वरूप । माझें जीवां ॥ ४१८ ॥
अगा नेणा आणि चतुरा । पुढां निळयांचा दुसरा । नेणा सर्पत्वें जाला येरा । सुखालागीं ॥ ४१९ ॥
हें असो स्वातीचें उदक । शुक्तीं मोतीं व्याळीं विख । तैसा सज्ञानांसी मी सुख । दुःख तों अज्ञानांसी ॥ ४२० ॥
No comments:
Post a Comment