१४ एप्रिल २०१९ निरुपण
अध्याय ९ : राजविद्याराजगुह्ययोगः (गीता श्लोक २-४ / ज्ञानेश्वरी ओव्या ४७-७०)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
श्रीभगवानुवाच ।
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १॥

नातरि अर्जुना हें बीज । पुढती सांगिजेल तुज । जें हें अंतःकरणींचें गुज । जिवाचिये ॥ ३४ ॥
येणें मानें जीवाचें हिये फोडावें । मग गुज कां पां मज सांगावें ? । ऐसें कांहीं स्वभावें । कल्पिशी जरी ॥ ३५ ॥
तरी परियेसी गा प्राज्ञा । तूं आस्थेचीच संज्ञा । बोलिलिये गोष्टीची अवज्ञा । नेणसी करूं ॥ ३६ ॥
म्हणौनि गूढपण आपुलें मोडो । वरि न बोलणेंही बोलावें घडो । परि आमुचिये जीवींचें पडो । तुझ्या जीवीं ॥ ३७ ॥
अगा थानीं कीर दूध गूढ । परि थानासीचि नव्हे कीं गोड । म्हणौनि सरो कां सेवितयाची चाड । जरी अनन्यु मिळे ॥ ३८ ॥
मुडांहूनि बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमीं पेरिलें । तरि तें सांडीविखुरीं गेलें । म्हणों ये कायी ? ॥ ३९ ॥
यालागीं सुमनु आणि शुद्धमती । जो अनिंदकु अनन्यगती । पैं गा गौप्यही परी तयाप्रती । चावळिजे सुखें ॥ ४० ॥
तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं । तूं वांचून आणिक नाहीं । म्हणौनि गुज तरी तुझ्या ठायीं । लपऊं नये ॥ ४१ ॥
आतां किती नावानावा गुज । म्हणतां कानडें वाटेल तुज । तरी ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसी ॥ ४२ ॥
परि तेंचि ऐसेनि निवाडें । जैसें भेसळलें खरें कुडें । मग काढिजे फाडोवाडें । पारखूनियां ॥ ४३ ॥
कां चांचूचेनि सांडसें । खांडिजे पय पाणी राजहंसें । तुज ज्ञान विज्ञान तैसें । वांटूनि देऊं ॥ ४४ ॥
मग वारयाचिया धारसा । पडिन्नला कोंडा कां नुरेचि जैसा । आणि कणांचा आपैसा । राशिवा जोडे ॥ ४५ ॥
तैसें जें जाणितलेयासाठीं । संसार संसाराचिये गांठीं । लाऊनि बैसवी पाटीं । मोक्षश्रियेच्या ॥ ४६ ॥

राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् । प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥ २॥
जे जाणणेया आघवेयांच्या गांवीं । गुरुत्वाची आचार्य पदवी । जें सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रां रावो ॥ ४७ ॥
आणि धर्माचें निजधाम । तेवींची उत्तमाचें उत्तम । पैं जया येतां नाहीं काम । जन्मांतराचें ॥ ४८ ॥
मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे । प्रत्यक्ष फावों लागे तैसें । आपैसयाचि ॥ ४९ ॥
तेवींचि गा सुखाच्या पाउटीं । चढतां येइजे जयाच्या भेटी । मग भेटल्या कीर मिठी । भोगणेंयाही पडे ॥ ५० ॥
परि भोगाचिये एलीकडिलिये मेरे । चित्त उभें ठेलें सुखा भरे । ऐसें सुलभ आणि सोपारें । वरि परब्रह्म ॥ ५१ ॥
पैं गा आणिकही एक याचें । जें हातां आलिया तरी न वचे । आणि अनुभवितां कांही न वेचे । वरि विटेहि ना ॥ ५२ ॥
येथ जरी तूं तर्किका । ऐसी हन घेसी शंका । ना येवढी वस्तु हे लोकां । उरली केविं पां ? ॥ ५३ ॥
जे एकोत्तरेयाचिया वाढी । जळतिये आगीं घालिती उडी । ते अनायासें स्वगोडी । सांडिती केवीं ? ॥ ५४ ॥
तरी पवित्र आणि रम्य । तेवींचि सुखोपाय गम्य । आणि स्वसुख परम धर्म्य । वरि आपणपां जोडे ॥ ५५ ॥
ऐसा अवघाचि हा सुरवाडु आहे । तरी जना हातीं केविं उरों लाहे । हा शंकेचा ठावो कीर होये । परि न धरावी तुवां ॥ ५६ ॥

अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परंतप । अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ ३॥
पाहे पां दूध पवित्र आणि गोड । पासी त्वचेचिया पदराआड । परि तें अव्हेरूनि गोचिड । अशुद्ध काय न सेविती ? ॥ ५७ ॥
कां कमलकंदा आणि दर्दुरीं । नांदणूक एकेचि घरीं । परि परागु सेविजे भ्रमरीं । येरां चिखलुचि उरे ॥ ५८ ॥
नातरी निदैवाच्या परिवरीं । लोह्या रुतलिया आहाति सहस्रवरी । परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ॥ ५९ ॥
तैसा हृदयामध्यें मी रामु । असतां सर्वसुखाचा आरामु । कीं भ्रांतासी कामु । विषयावरी ॥ ६० ॥
बहु मृगजळ देखोनि डोळां । थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा । तोडिला परिसु बांधिला गळां । शुक्तिकालाभें ॥ ६१ ॥
तैसी अहंममतेचिये लवडसवडी । मातें न पवतीचि बापुडीं । म्हणौनि जन्ममरणाची दुथडीं । डहुळितें ठेलीं ॥ ६२ ॥
एर्हवीं मी तरी कैसा । मुखाप्रति भानु कां जैसा । कहीं दिसे न दिसे ऐसा । वाणीचा नोहे ॥ ६३ ॥

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ॥ ४॥
माझेया विस्तारलेपणा नांवें । हें जगचि नोहे आघवें ? । जैसें दूध मुरालें स्वभावें । तरि तेंचि दहीं ॥ ६४ ॥
कां बीजचि जाहलें तरु । अथवा भांगारचि अळंकारु । तैसा मज एकाचा विस्तारु । तें हें जग ॥ ६५ ॥
हें अव्यक्तपणें थिजलें । तेंचि मग विश्वाकारें वोथिजलें । तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारलें । त्रैलोक्य जाणें ॥ ६६ ॥
महदादि देहांतें । इयें अशेषेंही भूतें । परी माझ्या ठायीं बिंबतें । जैसें जळीं फेण ॥ ६७ ॥
परि तया फेणांआंतु पाहतां । जेवीं जळ न दिसे पंडुसुता । नातरी स्वप्नींची अनेकता । चेइलिया नोहिजे ॥ ६८ ॥
तैसीं भूतें इयें माझ्या ठायीं । बिंबती तयांमाजीं मी नाहीं । इया उपपत्ती तुज पाहीं । सांगितलिया मागां ॥ ६९ ॥
म्हणौनि बोलिलिया बोलाचा अतिसो । न कीजे यालागीं हें असो । परी मज आंत पैसो । दिठी तुझी ॥ ७० ॥

No comments:
Post a Comment