१२ जुलै २०२० निरुपण
अध्याय १३ : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक ७ / ज्ञानेश्वरी ओव्या २१८-३६९ )
तरी अहिंसा बहुतीं परीं । बोलिली असे अवधारीं । आपुलालिया मतांतरीं । निरूपिली ॥ २१८ ॥
परी ते ऐसी देखा । जैशा खांडूनियां शाखा । मग तयाचिया बुडुखा । कूंप कीजे ॥ २१९ ॥
कां बाहु तोडोनि पचविजे । मग भूकेची पीडा राखिजे । नाना देऊळ मोडोनि कीजे । पौळी देवा ॥ २२० ॥
तैसी हिंसाचि करूनि अहिंसा । निफजविजे हा ऐसा । पैं पूर्वमीमांसा । निर्णो केला ॥ २२१ ॥
जे अवृष्टीचेनि उपद्रवें । गादलें विश्व आघवें । म्हणौनि पर्जन्येष्टी करावे । नाना याग ॥ २२२ ॥
तंव तिये इष्टीचिया बुडीं । पशुहिंसा रोकडी । मग अहिंसेची थडी । कैंची दिसे ? ॥ २२३ ॥
पेरिजे नुसधी हिंसा । तेथ उगवैल काय अहिंसा ? । परी नवल बापा धिंवसा । या याज्ञिकांचा ॥ २२४ ॥
आणि आयुर्वेदु आघवा । तो याच मोहोरा पांडवा । जे जीवाकारणें करावा । जीवघातु ॥ २२५ ॥
नाना रोगें आहाळलीं । लोळतीं भूतें देखिलीं । ते हिंसा निवारावया केली । चिकित्सा कां ॥ २२६ ॥
तंव ते चिकित्से पहिलें । एकाचे कंद खणविले । एका उपडविलें । समूळीं सपत्रीं ॥ २२७ ॥
एकें आड मोडविली । अजंगमाची खाल काढविली । एकें गर्भिणी उकडविली । पुटामाजीं ॥ २२८ ॥
अजातशत्रु तरुवरां । सर्वांगीं देवविल्या शिरा । ऐसे जीव घेऊनि धनुर्धरा । कोरडे केले ॥ २२९ ॥
आणि जंगमाही हात । लाऊनि काढिलें पित्त । मग राखिले शिणत । आणिक जीव ॥ २३० ॥
अहो वसतीं धवळारें । मोडूनि केलीं देव्हारें । नागवूनि वेव्हारें । गवांदी घातली ॥ २३१ ॥
मस्तक पांघुरविलें । तंव तळवटीं उघडें पडलें । घर मोडोनि केले । मांडव पुढें ॥ २३२ ॥
नाना पांघुरणें । जाळूनि जैसें तापणें । जालें आंगधुणें । कुंजराचें ॥ २३३ ॥
नातरी बैल विकूनि गोठा । पुंसा लावोनि बांधिजे गांठा । इया करणी कीं चेष्टा ? । काइ हसों ॥ २३४ ॥
एकीं धर्माचिया वाहणी । गाळूं आदरिलें पाणी । तंव गाळितया आहाळणीं । जीव मेले ॥ २३५॥
एक न पचवितीचि कण । इये हिंसेचे भेण । तेथ कदर्थले प्राण । तेचि हिंसा ॥ २३६ ॥
एवं हिंसाचि अहिंसा । कर्मकांडीं हा ऐसा । सिद्धांतु सुमनसा । वोळखें तूं ॥ २३७ ॥
पहिलें अहिंसेचें नांव । आम्हीं केलें जंव । तंव स्फूर्ति बांधली हांव । इये मती ॥ २३८ ॥
तरि कैसेनि इयेतें गाळावें । म्हणौनि पडिलें बोलावें । तेवींचि तुवांही जाणावें । ऐसा भावो ॥ २३९ ॥
बहुतकरूनि किरीटी । हाचि विषो इये गोठी । एऱ्हवी कां आडवाटीं । धाविजैल गा ? ॥ २४० ॥
आणि स्वमताचिया निर्धारा- । लागोनियां धनुर्धरा । प्राप्तां मतांतरां । निर्वेचु कीजे ॥ २४१ ॥
ऐसी हे अवधारीं । निरूपिती परी । आतां ययावरी । मुख्य जें गा ॥ २४२ ॥
तें स्वमत बोलिजैल । अहिंसे रूप किजैल । जेणें उठलिया आंतुल । ज्ञान दिसे ॥ २४३ ॥
परिइ तें अधिष्ठिलेनि आंगें । जाणिजे आचरतेनि बगें । जैसी कसवटी सांगे । वानियातें ॥ २४४ ॥
तैसें ज्ञानामनाचिये भेटी । सरिसेंचि अहिंसेचें बिंब उठी । तेंचि ऐसें किरीटी । परिस आतां ॥ २४४ ॥
तरी तरंगु नोलांडितु । लहरी पायें न फोडितु । सांचलु न मोडितु । पाणियाचा ॥ २४६ ॥
वेगें आणि लेसा । दिठी घालूनि आंविसा । जळीं बकु जैसा । पाउल सुये ॥ २४७ ॥
कां कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार । कुचुंबैल केसर । इया शंका ॥ २४८ ॥
तैसे परमाणु पां गुंतले । जाणूनि जीव सानुले । कारुण्यामाजीं पाउलें । लपवूनि चाले ॥ २४९ ॥
ते वाट कृपेची करितु । ते दिशाचि स्नेह भरितु । जीवातळीं आंथरितु । आपुला जीवु ॥ २५० ॥
ऐसिया जतना । चालणें जया अर्जुना । हें अनिर्वाच्य परिमाणा । पुरिजेना ॥ २५१ ॥
पैं मोहाचेनि सांगडें । लासी पिलीं धरी तोंडें । तेथ दांतांचे आगरडे । लागती जैसे ॥ २५२ ॥
कां स्नेहाळु माये । तान्हयाची वास पाहे । तिये दिठी आहे । हळुवार जें ॥ २५३ ॥
नाना कमळदळें । डोलविजती ढाळें । तो जेणें पाडें बुबुळें । वारा घेपे ॥ २५४ ॥
तैसेनि मार्दवें पाय । भूमीवरी न्यसीतु जाय । लागती तेथ होय । जीवां सुख ॥ २५५ ॥
ऐसिया लघिमा चालतां । कृमि कीटक पंडुसुता । देखे तरी माघौता । हळूचि निघे ॥ २५६ ॥
म्हणे पावो धडफडील । तरी स्वामीची निद्रा मोडैल । रचलेपणा पडैल । झोती हन ॥ २५७ ॥
इया काकुळती । वाहणी घे माघौती । कोणेही व्यक्ती । न वचे वरी ॥ २५८ ॥
जीवाचेनि नांवें । तृणातेंही नोलांडवे । मग न लेखितां जावें । हे कें गोठी ?॥ २५९ ॥
मुंगिये मेरु नोलांडवे । मशका सिंधु न तरवे । तैसा भेटलियां न करवे । अतिक्रमु ॥ २६० ॥
ऐसी जयाची चाली । कृपाफळी फळा आली । देखसी जियाली । दया वाचे ॥ २६१ ॥
स्वयें श्वसणेंचि सुकुमार । मुख मोहाचें माहेर । माधुर्या जाहले अंकुर । दशन तैसे ॥ २६२ ॥
पुढां स्नेह पाझरे । माघां चालती अक्षरें । शब्द पाठीं अवतरे । कृपा आधीं ॥ २६३ ॥
तंव बोलणेंचि नाहीं । बोलों म्हणे जरी कांहीं । तरी बोल कोणाही । खुपेल कां ॥ २६४ ॥
बोलतां अधिकुही निघे । तरी कोण्हाही वर्मीं न लगे । आणि कोण्हासि न रिघे । शंका मनीं ॥ २६५ ॥
मांडिली गोठी हन मोडैल । वासिपैल कोणी उडैल । आइकोनिचि वोवांडिल । कोण्ही जरी ॥ २६६ ॥
तरी दुवाळी कोणा नोहावी । भुंवई कवणाची नुचलावी । ऐसा भावो जीवीं । म्हणौनि उगा ॥ २६७ ॥
मग प्रार्थिला विपायें । जरी लोभें बोलों जाये । तरी परिसतया होये । मायबापु ॥ २६८ ॥
कां नादब्रह्मचि मुसे आलें । कीं गंगापय असललें । पतिव्रते आलें । वार्धक्य जैसे ॥ २६९ ॥
तैसें साच आणि मवाळ । मितले आणि रसाळ । शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ॥ २७० ॥
विरोधुवादुबळु । प्राणितापढाळु । उपहासु छळु । वर्मस्पर्शु ॥ २७१ ॥
आटु वेगु विंदाणु । आशा शंका प्रतारणु । हे संन्यासिले अवगुणु । जया वाचा ॥ २७२ ॥
आणि तयाचि परी किरीटी । थाउ जयाचिये दिठी । सांडिलिया भ्रुकुटी । मोकळिया ॥ २७३ ॥
कां जे भूतीं वस्तु आहे । तियें रुपों शके विपायें । म्हणौनि वासु न पाहे । बहुतकरूनी ॥ २७४ ॥
ऐसाही कोणे एके वेळे । भीतरले कृपेचेनि बळें । उघडोनियां डोळे । दृष्टी घाली ॥ २७५ ॥
तरी चंद्रबिंबौनि धारा । निघतां नव्हती गोचरा । परि एकसरें चकोरां । निघती दोंदें ॥ २७६ ॥
तैसें प्राणियांसि होये । जरी तो कहींवासु पाहे । तया अवलोकनाची सोये । कूर्मींही नेणे ॥ २७७ ॥
किंबहुना ऐसी । दिठी जयाची भूतांसी । करही देखसी । तैसेचि ते ॥ २७८ ॥
तरी होऊनियां कृतार्थ । राहिले सिद्धांचे मनोरथ । तैसे जयाचे हात । निर्व्यापार ॥ २७९ ॥
अक्षमें आणि संन्यासिलें । कीं निरिंधन आणि विझालें । मुकेनि घेतलें । मौन जैसें ॥ २८० ॥
तयापरी कांहीं । जयां करां करणें नाहीं । जे अकर्तयाच्या ठायीं । बैसों येती ॥ २८१ ॥
आसुडैल वारा । नख लागेल अंबरा । इया बुद्धी करां । चळों नेदी ॥ २८२ ॥
तेथ आंगावरिलीं उडवावीं । कां डोळां रिगतें झाडावीं । पशुपक्ष्यां दावावीं । त्रासमुद्रा ॥ २८३ ॥
इया केउतिया गोठी । नावडे दंडु काठी । मग शस्त्राचें किरीटी । बोलणें कें ? ॥ २८४ ॥
लीलाकमळें खेळणें । कांपुष्पमाळा झेलणें । न करी म्हणे गोफणें । ऐसें होईल ॥ २८५ ॥
हालवतील रोमावळी । यालागीं आंग न कुरवाळी । नखांची गुंडाळी । बोटांवरी ॥ २८६ ॥
तंव करणेयाचाचि अभावो । परी ऐसाही पडे प्रस्तावो । तरी हातां हाचि सरावो । जे जोडिजती ॥ २८७ ॥
कां नाभिकारा उचलिजे । हातु पडिलियां देइजे । नातरी आर्तातें स्पर्शिजे । अळुमाळु ॥ २८८ ॥
हेंही उपरोधें करणें । तरी आर्तभय हरणें । नेणती चंद्रकिरणें । जिव्हाळा तो ॥ २८९ ॥
पावोनि तो स्पर्शु । मलयानिळु खरपुसु । तेणें मानें पशु । कुरवाळणें ॥ २९० ॥
जे सदा रिते मोकळे । जैशी चंदनांगें निसळें । न फळतांही निर्फळें । होतीचिना ॥ २९१ ॥
आतां असो हें वाग्जाळ । जाणें तें करतळ । सज्जनांचे शीळ । स्वभाव जैसे ॥ २९२ ॥
आतां मन तयाचें । सांगों म्हणों जरी साचें । तरी सांगितले कोणाचे । विलास हे ? ॥ २९३ ॥
काइ शाखा नव्हे तरु ? । जळेंवीण असे सागरु ? । तेज आणि तेजाकारु । आन काई ? ॥ २९४ ॥
अवयव आणि शरीर । हे वेगळाले कीर ? । कीं रसु आणि नीर । सिनानीं आथी ? ॥ २९५ ॥
म्हणौनि हे जे सर्व । सांगितले बाह्य भाव । ते मनचि गा सावयव । ऐसें जाणें ॥ २९६ ॥
जें बीज भुईं खोंविलें । तेंचि वरी रुख जाहलें । तैसें इंद्रियाद्वारीं फांकलें । अंतरचि कीं ॥ २९७ ॥
पैं मानसींचि जरी । अहिंसेची अवसरी । तरी कैंची बाहेरी । वोसंडेल ? ॥ २९८ ॥
आवडे ते वृत्ती किरीटी । आधीं मनौनीचि उठी । मग ते वाचे दिठी । करांसि ये ॥ २९९ ॥
वांचूनि मनींचि नाहीं । तें वाचेसि उमटेल काई ? । बींवीण भुईं । अंकुर असे ? ॥ ३०० ॥
म्हणौनि मनपण जैं मोडे । तैं इंद्रिय आधींचि उबडें । सूत्रधारेंवीण साइखडें । वावो जैसें ॥ ३०१ ॥
उगमींचि वाळूनि जाये । तें वोघीं कैचें वाहे । जीवु गेलिया आहे । चेष्टा देहीं ? ॥ ३०२ ॥
तैसें मन हें पांडवा । मूळ या इंद्रियभावा । हेंचि राहटे आघवां । द्वारीं इहीं ॥ ३०३ ॥
परी जिये वेळीं जैसें । जें होऊनि आंतु असे । बाहेरी ये तैसें । व्यापाररूपें ॥ ३०४ ॥
यालागी साचोकारें । मनीं अहिंसा थांवे थोरें । पिकली द्रुती आदरें । बोभात निघे ॥ ३०५ ॥
म्हणौनि इंद्रियें तेचि संपदा । वेचितां हीं उदावादा । अहिंसेचा धंदा । करितें आहाती ॥ ३०६ ॥
समुद्रीं दाटे भरितें । तैं समुद्रचि भरी तरियांते । तैसें स्वसंपत्ती चित्तें । इंद्रियां केलें ॥ ३०७ ॥
हें बहु असो पंडितु । धरुनि बाळकाचा हातु । वोळी लिही व्यक्तु । आपणचि ॥ ३०८ ॥
तैसें दयाळुत्व आपुलें । मनें हातापायां आणिलें । मग तेथ उपजविलें । अहिंसेतें ॥ ३०९ ॥
याकारणें किरीटी । इंद्रियांचिया गोठी । मनाचिये राहाटी । रूप केलें ॥ ३१० ॥
ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु दंडाचा । जाहला ठायीं जयाचा । देखशील ॥ ३११ ॥
तो जाण वेल्हाळ । ज्ञानाचें वेळाउळ । हें असो निखळ । ज्ञानचि तो ॥ ३१२ ॥
जे अहिंसा कानें ऐकिजे । ग्रंथाधारें निरूपिजे । ते पाहावी हें उपजे । तैं तोचि पाहावा ॥ ३१३ ॥
ऐसें म्हणितलें देवें । तें बोलें एकें सांगावें । परी फांकला हें उपसाहावें । तुम्हीं मज ॥ ३१४ ॥
म्हणाल हिरवें चारीं गुरूं । विसरे मागील मोहर धरूं । वारेलगें पांखिरूं । गगनीं भरे ॥ ३१५ ॥
तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती । फावलिया रसवृत्तीं । वाहविला मती । आकळेना ॥ ३१६ ॥
तरि तैसें नोहे अवधारा । कारण असें विस्तारा । एऱ्हवीं पद तरी अक्षरां । तिहींचेंचि ॥ ३१७ ॥
अहिंसा म्हणतां थोडी । परिइ ते तैंचि होय उघडी । जैं लोटिजती कोडी । मतांचिया ॥ ३१८ ॥
एऱ्हवीं प्राप्तें मतांतरें । थातंबूनि आंगभरें । बोलिजैल ते न सरे । तुम्हांपाशीं ॥ ३१९ ॥
रत्नपारखियांच्या गांवीं । जाईल गंडकी तरी सोडावी । काश्मीरीं न करावी । मिडगण जेवीं ॥ ३२० ॥
काइसा वासु कापुरा । मंद जेथ अवधारा । पिठाचा विकरा । तिये सातें ? ॥ ३२१ ॥
म्हणौनि इये सभे । बोलकेपणाचेनि क्षोभें । लाग सरुउं न लभे । बोला प्रभु ॥ ३२२ ॥
सामान्या आणि विशेषा । सकळै कीजेल देखा । तरी कानाचेया मुखा- । कडे न्याल ना तुम्ही ॥ ३२३ ॥
शंकेचेनि गदळें । जैं शुद्ध प्रमेय मैळे । तैं मागुतिया पाउलीं पळे । अवधान येतें ॥ ३२४ ॥
कां करूनि बाबुळियेची बुंथी । जळें जियें ठाती । तयांची वास पाहाती । हंसु काई ? ॥ ३२५ ॥
कां अभ्रापैलीकडे । जैं येत चांदिणें कोडें । तैं चकोरें चांचुवडें । उचलितीना ॥ ३२६ ॥
तैसें तुम्ही वास न पाहाल । ग्रंथु नेघा वरी कोपाल । जरी निर्विवाद नव्हैल । निरूपण ॥ ३२७ ॥
न बुझावितां मतें । न फिटे आक्षेपाचें लागतें । तें व्याख्यान जी तुमतें । जोडूनि नेदी ॥ ३२८ ॥
आणि माझें तंव आघवें । ग्रथन येणेचि भावें । जे तुम्हीं संतीं होआवें । सन्मुख सदां ॥ ३२९ ॥
एऱ्हवीं तरी साचोकारें । तुम्ही गीतार्थाचे सोइरे । जाणोनि गीता एकसरें । धरिली मियां ॥ ३३० ॥
जें आपुलें सर्वस्व द्याल । मग इयेतें सोडवूनि न्याल । म्हणौनि ग्रंथु नव्हे वोल । साचचि हे ॥ ३३१ ॥
कां सर्स्वाचा लोभु धरा । वोलीचा अव्हेरु करा । तरी गीते मज अवधारा । एकचि गती ॥ ३३२ ॥
किंबहुना मज । तुमचिया कृपा काज । तियेलागीं व्याज । ग्रंथाचें केलें ॥ ३३३ ॥
तरिइ तुम्हां रसिकांजोगें । व्याख्यान शोधावें लागे । म्हणौनि जी मतांगें । बोलों गेलों ॥ ३३४ ॥
तंव कथेसि पसरु जाहला । श्लोकार्थु दूरी गेला । कीजो क्षमा यया बोला । अपत्या मज ॥ ३३५ ॥
आणि घांसाआंतिल हरळु । फेडितां लागे वेळु । ते दूषण नव्हें खडळु । सांडावा कीं ॥ ३३६ ॥
कां संवचोरा चुकवितां । दिवस लागलिया माता । कोपावें कीं जीविता । जिताणें कीजे ? ॥ ३३७ ॥
परी यावरील हें नव्हे । तुम्हीं उपसाहिलें तेंचि बरवें । आतां अवधारिजो देवें । बोलिलें ऐसें ॥ ३३८ ॥
म्हणे उन्मेखसुलोचना । सावध होईं अर्जुना । करूं तुज ज्ञाना । वोळखी आतां ॥ ३३९ ॥
तरी ज्ञान गा तें एथें । वोळख तूं निरुतें । आक्रोशेंवीण जेथें । क्षमा असे ॥ ३४० ॥
अगाध सरोवरीं । कमळिणी जियापरी । कां सदैवाचिया घरीं । संपत्ति जैसी ॥ ३४१ ॥
पार्था तेणें पाडें । क्षमा जयातें वाढे । तेही लक्षे तें फुडें । लक्षण सांगों ॥ ३४२ ॥
तरी पढियंते लेणें । आंगीं भावें जेणें । धरिजे तेवीं साहणें । सर्वचि जया ॥ ३४३ ॥
त्रिविध मुख्य आघवे । उपद्रवांचे मेळावे । वरी पडिलिया नव्हे । वांकुडा जो ॥ ३४४ ॥
अपेक्षित पावे । तें जेणें तोषें मानवें । अनपेक्षिताही करवे । तोचि मानु ॥ ३४५ ॥
जो मानापमानातें साहे । सुखदुःख जेथ सामाये । निंदास्तुती नोहे । दुखंडु जो ॥ ३४६ ॥
उन्हाळेनि जो न तपे । हिमवंती न कांपे । कयसेनिही न वासिपे । पातलेया ॥ ३४७ ॥
स्वशिखरांचा भारु । नेणें जैसा मेरु । कीं धरा यज्ञसूकरु । वोझें न म्हणे ॥ ३४८ ॥
नाना चराचरीं भूतीं । दाटणी नव्हे क्षिती । तैसा नाना द्वंद्वीं प्राप्तीं । घामेजेना ॥ ३४९ ॥
घेऊनी जळाचे लोट । आलिया नदीनदांचे संघाट । करी वाड पोट । समुद्र जेवीं ॥ ३५० ॥
तैसें जयाचिया ठायीं । न साहणें काहींचि नाहीं । आणि साहतु असे ऐसेंही । स्मरण नुरे ॥ ३५१ ॥
आंगा जें पातलें । तें करूनि घाली आपुलें । येथ साहतेनि नवलें । घेपिजेना ॥ ३५२ ॥
हे अनाक्रोश क्शमा । जयापाशीं प्रियोत्तमा । जाण तेणें महिमा । ज्ञानासि गा ॥ ३५३ ॥
तो पुरुषु पांडवा । ज्ञानाचा वोलावा । आतां परिस आर्जवा । रूप करूं ॥ ३५४ ॥
तरी आर्जव तें ऐसें । प्राणाचें सौजन्य जैसें । आवडे तयाही दोषें । एकचि गा ॥ ३५५ ॥
कां तोंड पाहूनि प्रकाशु । न करी जेवीं चंडांशु । जगा एकचि अवकाशु । आकाश जैसें ॥ ३५६ ॥
तैसें जयाचें मन । माणुसाप्रति आन आन । नव्हे आणि वर्तन । ऐसें पैं तें ॥ ३५७ ॥
जे जगेंचि सनोळख । जगेंसीं जुनाट सोयरिक । आपपर हें भाख । जाणणें नाहीं ॥ ३५८ ॥
भलतेणेंसीं मेळु । पाणिया ऐसा ढाळु । कवणेविखीं आडळु । नेघे चित्त ॥ ३५९ ॥
वारियाची धांव । तैसे सरळ भाव । शंका आणि हांव । नाहीं जया ॥ ३६० ॥
मायेपुढें बाळका । रिगतां न पडे शंका । तैसें मन देतां लोकां । नालोची जो ॥ ३६१ ॥
फांकलिया इंदीवरा । परिवारु नाहीं धनुर्धरा । तैसा कोनकोंपरा । नेणेचि जो ॥ ३६२ ॥
चोखाळपण रत्नाचें । रत्नावरी किरणाचें । तैसें पुढां मन जयाचें । करणें पाठीं ॥ ३६३ ॥
आलोचूं जो नेणे । अनुभवचि जोगावणें । धरी मोकळी अंतःकरणें । नव्हेचि जया ॥ ३६४ ॥
दिठी नोहे मिणधी । बोलणें नाहीं संदिग्धी । कवणेंसीं हीनबुद्धी । राहाटीजे ना ॥ ३६५ ॥
दाही इंद्रियें प्रांजळें । निष्प्रपंचें निर्मळें । पांचही पालव मोकळे । आठही पाहर ॥ ३६६ ॥
अमृताची धार । तैसें उजूं अंतर । किंबहुना जो माहेर । या चिन्हांचें ॥ ३६७ ॥
तो पुरुष सुभटा । आर्जवाचा आंगवटा । जाण तेथेंचि घरटा । ज्ञानें केला ॥ ३६८ ॥
आतां ययावरी । गुरुभक्तीची परी । सांगों गा अवधारीं । चतुरनाथा ॥ ३६९ ॥

No comments:
Post a Comment