१० मे २०२० निरुपण
अध्याय १२ : भक्तीयोगः ( श्लोक १५-१६ /ज्ञानेश्वरी ओव्या १६५-१८९)
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः । हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १५॥
तरी सिंधूचेनि माजें । जळचरां भय नुपजे । आणि जळचरीं नुबगिजे । समुद्रु जैसा ॥ १६५ ॥
तेवीं उन्मत्तें जगें । जयासि खंती न लगे । आणि जयाचेनि आंगें । न शिणे लोकु ॥ १६६ ॥
किंबहुना पांडवा । शरीर जैसें अवयवां । तैसा नुबगे जीवां । जीवपणें जो ॥ १६७ ॥
जगचि देह जाहलें । म्हणौनि प्रियाप्रिय गेलें । हर्षामर्ष ठेले । दुजेनविण ॥ १६८ ॥
ऐसा द्वंद्वनिर्मुक्तु । भयोद्वेगरहितु । याहीवरी भक्तु । माझ्यां ठायीं ॥ १६९ ॥
तरी तयाचा गा मज मोहो । काय सांगों तो पढियावो । हें असे जीवें जीवो । माझेनि तो ॥ १७० ॥
जो निजानंदें धाला । परिणामु आयुष्या आला । पूर्णते जाहला । वल्लभु जो ॥ १७१ ॥

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः । सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १६॥
जयाचिया ठायीं पांडवा । अपेक्षे नाहीं रिगावा । सुखासि चढावा । जयाचें असणें ॥ १७२ ॥
मोक्ष देऊनि उदार । काशी होय कीर । परी वेचावें लागें शरीर । तिये गांवीं ॥ १७३ ॥
हिमवंतु दोष खाये । परी जीविताची हानि होये । तैसें शुचित्व नोहे । सज्जनाचें ॥ १७४ ॥
शुचित्वें शुचि गांग होये । आणि पापतापही जाये । परी तेथें आहे । बुडणें एक ॥ १७५ ॥
खोलिये पारु नेणिजे । तरी भक्तीं न बुडिजे । रोकडाचि लाहिजे । न मरतां मोक्षु ॥ १७६ ॥
संताचेनि अंगलगें । पापातें जिणणें गंगे । तेणें संतसंगें । शुचित्व कैसें ॥ १७७ ॥
म्हणौनि असो जो ऐसा । शुचित्वें तीर्थां कुवासा । जेणें उल्लंघविलें दिशा । मनोमळ ॥ १७८ ॥
आंतु बाहेरी चोखाळु । सूर्य जैसा निर्मळु । आणि तत्त्वार्थींचा पायाळु । देखणा जो ॥ १७९ ॥
व्यापक आणि उदास । जैसें कां आकाश । तैसें जयाचें मानस । सर्वत्र गा ॥ १८० ॥
संसारव्यथे फिटला । जो नैराश्यें विनटला । व्याधाहातोनि सुटला । विहंगु जैसा ॥ १८१ ॥
तैसा सतत जो सुखें । कोणीही टवंच न देखे । नेणिजे गतायुषें । लज्जा जेवीं ॥ १८२ ॥
आणि कर्मारंभालागीं । जया अहंकृती नाही आंगीं । जैसें निरिंधन आगी । विझोनि जाय ॥ १८३ ॥
तैसा उपशमुचि भागा । जयासि आला पैं गा । जो मोक्षाचिया आंगा । लिहिला असे ॥ १८४ ॥
अर्जुना हा ठावोवरी । जो सोऽहंभावो सरोभरीं । द्वैताच्या पैलतीरीं । निगों सरला ॥ १८५ ॥
कीं भक्तिसुखालागीं । आपणपेंचि दोही भागीं । वांटूनियां आंगीं । सेवकै बाणी ॥ १८६ ॥
येरा नाम मी ठेवी । मग भजती वोज बरवी । न भजतया दावी । योगिया जो ॥ १८७ ॥
तयाचे आम्हां व्यसन । आमुचें तो निजध्यान । किंबहुना समाधान । तो मिळे तैं ॥ १८८ ॥
तयालागीं मज रूपा येणें । तयाचेनि मज येथें असणें । तया लोण कीजे जीवें प्राणें । ऐसा पढिये ॥ १८९ ॥

No comments:
Post a Comment