१५ डिसेंबर २०१९ निरुपण
अध्याय ११ : विश्वरूपदर्शनयोगः (गीता श्लोक ३४-३६ / ज्ञानेश्वरी ओव्या ४७२-५०६)
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णां तथान्यानपि योधवीरान् । मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ॥ ३४॥
द्रोणाचा पाडु न करीं । भीष्माचें भय न धरीं । कैसेनि कर्णावरी । परजूं हें न म्हण ॥ ४७२ ॥
कोण उपायो जयद्रथा कीजे । हें न चिंतूं चित्त तुझें । आणिकही आथि जे जे । नावाणिगे वीर ॥ ४७३ ॥
तेही एक एक आघवें । चित्रींचे सिंहाडे मानावे । जैसे वोलेनि हातें घ्यावें । पुसोनियां ॥ ४७४ ॥
यावरी पांडवा । काइसा युद्धाचा मेळावा ? । हा आभासु गा आघवा । येर ग्रासिलें मियां ॥ ४७५ ॥
जेव्हां तुवां देखिले । हे माझिया वदनीं पडिले । तेव्हांचि यांचें आयुष्य सरलें । आतां रितीं सोपें ॥ ४७६ ॥
म्हणौनि वहिला उठीं । मियां मारिले तूं निवटीं ।न रिगे शोकसंकटीं । नाथिलिया ॥ ४७७ ॥
आपणचि आडखिळा कीजे । तो कौतुकें जैसा विंधोनि पाडिजे । तैसें देखें गा तुझें । निमित्त आहे ॥ ४७८ ॥
बापा विरुद्ध जें जाहलें । तें उपजतांचि वाघें नेलें । आतां राज्येंशीं संचलें । यश तूं भोगीं ॥ ४७९ ॥
सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद । ते वधिले विशद । सायासु न लागतां ॥ ४८० ॥
ऐसिया इया गोष्टी । विश्वाच्या वाक्पटीं । लिहूनि घाली किरीटी । जगामाजीं ॥ ४८१ ॥
संजय उवाच ।
एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥ ३५॥

ऐसी आघवीचि हे कथा । तया अपूर्ण मनोरथा । संजयो सांगे कुरुनाथा । ज्ञानदेवो म्हणे ॥ ४८२ ॥
मग सत्यलोकौनि गंगाजळ । सुटलिया वाजत खळाळ । तैशी वाचा विशाळ । बोलतां तया ॥ ४८३ ॥
नातरी महामेघांचे उमाळे । घडघडीत एके वेळे । कां घुमघुमिला मंदराचळें । क्षीराब्धी जैसा ॥ ४८४ ॥
तैसें गंभीरें महानादें । हें वाक्य विश्वकंदें । बोलिलें अगाधें । अनंतरूपें ॥ ४८५ ॥
तें अर्जुनें मोटकें ऐकिलें । आणि सुख कीं भय दुणावलें । हें नेणों परि कांपिन्नलें । सर्वांग तयाचें ॥ ४८६ ॥
सखोलपणें वळली मोट । आणि तैसेचि जोडले करसंपुट । वेळोवेळां ललाट । चरणीं ठेवी ॥ ४८७ ॥
तेवींचि कांहीं बोलों जाये । तंव गळा बुजालाचि ठाये । हें सुख कीं भय होये । हें विचारा तुम्हीं ॥ ४८८ ॥
परि तेव्हां देवाचेनि बोलें । अर्जुना हें ऐसें जाहलें । मियां पदांवरूनि देखिलें । श्लोकींचिया ॥ ४८९ ॥
मग तैसाचि भेणभेण । पुढती जोहारूनि चरण । मग म्हणे जी आपण । ऐसें बोलिलेती ॥ ४९० ॥

अर्जुन उवाच ।
स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः ॥ ३६॥

ना तरी अर्जुना मी काळु । आणि ग्रासिजे तो माझा खेळु । हा बोलु तुझा कीर अढळु । मानूं आम्ही ॥ ४९१ ॥
परि तुवां जी काळें । आजि स्थितीचिये वेळे । ग्रासिजे हें न मिळे । विचारासी ॥ ४९२ ॥
कैसेनि आंगींचें तारुण्य काढावें ? । कैचें नव्हे तें वार्धक्य आणावें ? । म्हणौनि करूं म्हणसी तें नव्हे । बहुतकरुनी ॥ ४९३ ॥
हां जी चौपाहारी न भरतां । कोणेही वेळे श्रीअनंता । काय माध्यान्हीं सविता । मावळतु आहे ? ॥ ४९४ ॥
पैं तुज अखंडिता काळा । तिन्ही आहाती जी वेळा । त्या तिन्ही परी सबळा । आपुलालिया समयीं ॥ ४९५ ॥
जे वेळीं हों लागे उत्पत्ती । ते वेळीं स्थिति प्रळयो हारपती । आणि स्थितिकाळीं न मिरविती । उत्पत्ति प्रळयो ॥ ४९६ ॥
पाठीं प्रळयाचिये वेळे । उत्पत्ति स्थिति मावळे । हें कायसेनही न ढळे । अनादि ऐसें ॥ ४९७ ॥
म्हणौनि आजि तंव भरें भोगें । स्थिति वर्तिजत आहे जगें । एथ ग्रसिसी तूं हें न लगे । माझ्या जीवीं ॥ ४९८ ॥
तंव संकेतें देव बोले । अगा या दोन्ही सैन्यांसीचि मरण पुरलें । तें प्रत्यक्षचि तुज दाविलें । येर यथाकाळें जाण ॥ ४९९ ॥
हा संकेतु जंव अनंता । वेळु लागला बोलतां । तंव अर्जुनें लोकु मागुता । देखिला यथास्थिति ॥ ५०० ॥
मग म्हणतसे देवा । तूं सूत्रीं विश्वलाघवा । जग आला मा आघवा । पूर्वस्थिति पुढती ॥ ५०१ ॥
परी पडिलिया दुःखसागरीं । तूं काढिसी कां जयापरी । ते कीर्ति तुझी श्रीहरी । आठवित असे ॥ ५०२ ॥
कीर्ति आठवितां वेळोवेळां । भोगितसें महासुखाचा सोहळा । तेथ हर्षामृतकल्लोळा । वरी लोळत आहें ॥ ५०३ ॥
देवा जियालेपणें जग । धरी तुझ्या ठायीं अनुराग । आणि दुष्टां तयां भंग । अधिकाधिक ॥ ५०४ ॥
पैं त्रिभुवनींचिया राक्षसां । महाभय तूं हृषीकेशा । म्हणौनि पळताती दाही दिशां । पैलीकडे ॥ ५०५ ॥
येथ सुर नर सिद्ध किन्नर । किंबहुना चराचर । ते तुज देखोनि हर्षनिर्भर । नमस्कारित असती ॥ ५०६ ॥

No comments:
Post a Comment