काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः । धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥ १७॥
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते । सौभद्रश्च महाबाहुः शंखान्दध्मुः पृथक् पृथक् ॥ १८॥
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥ १९॥
तेथ भूपति होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक ।हा काशीपति देख । महाबाहु ॥ १५१ ॥
तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु ।धृष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन ॥ १५२ ॥
विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर ।तिहीं नानाशंख निरंतर । आस्फुरिले ॥ १५३ ॥
तेणें महाघोषनिर्घातें । शेष कूर्म अवचितें ।गजबजोनि भूभारातें । सांडूं पाहती ॥ १५४ ॥
तेथ तीन्ही लोक डळमळित । मेरु मांदार आंदोळित ।समुद्रजळ उसळत । कैलासवेरी ॥ १५५ ॥
पृथ्वीतळ उलथों पहात । आकाश असे आसुडत ।तेथ सडा होत । नक्षत्रांचा ॥ १५६ ॥
सृष्टी गेली रे गेली । देवां मोकळवादी जाहली ।ऐशी एक टाळी पिटली । सत्यलोकीं ॥ १५७ ॥
दिहाचि दिन थोकला । जैसा प्रलयकाळ मांडला ।तैसा हाहाकारु जाहला । तिन्हीं लोकीं ॥ १५८ ॥
तें देखोनि आदिपुरुषु विस्मितु । म्हणे झणें होय पां अंतु ।मग लोपिला अद्भुतु । संभ्रमु तो ॥ १५९ ॥
म्हणौनि विश्व सांवरलें । एर्हवीं युगांत होतें वोडवलें ।जैं महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकीं ॥ १६० ॥
तो घोष तरी उपसंहरला । परि पडिसाद होता राहिला ।तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा ॥ १६१ ॥
जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु ।तैसा हृदयातें भेदितु । कौरवांचिया ॥ १६२ ॥
तो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हिये घालिती ।एकमेकांतें म्हणती । सावध रे सावध ॥ १६३ ॥

अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्कपिध्वजः ।प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥ २०॥
तेथ बळें प्रौढीपुरतें । महारथी वीर होते ।तिहीं पुनरपि दळातें । आवरिलें ॥ १६४ ॥
मग सरिसेपणें उठावले । दुणवटोनि उचलले ।तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ॥ १६५ ॥
तेथ बाणवरी धर्नुधर । वर्षताती निरंतर ।जैसे प्रळयांत जलधर । अनिवार कां ॥ १६६ ॥
ते देखलिया अर्जुनें । संतोष घेऊनि मनें ।मग संभ्रमें दिठी सेने । घालीतसे ॥ १६७ ॥
तंव संग्रामीं सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले ।तंव लीलाधनुष्य उचललें । पंडुकुमरें ॥ १६८ ॥

हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
अर्जुन उवाच ।
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ २१॥
यावदेतान्निरिक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ।कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे ॥ २२॥
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥ २३॥
ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा । आतां झडकरी रथु पेलावा ।नेऊनि मध्यें घालावा । दोहीं दळां ॥ १६९ ॥
जंव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक ।न्याहाळीन अशेख । झुंजते ते ॥ १७० ॥
येथ आले असती आघवें । परी कवणेंसीं म्यां झुंजावें ।हे रणीं लागे पहावें । म्हणौनियां ॥ १७१ ॥
बहुतकरूनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव ।वांटिवेवीण हांव । बांधिती झुंजीं ॥ १७२ ॥
झुंजाची आवडी धरिती । परी संग्रामीं धीर नव्हती ।हें सांगोनि रायाप्रती । काय संजयो म्हणे ॥ १७३ ॥

संजय उवाच ।
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥ २४॥
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥ २४॥
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ।उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति ॥ २५॥
तत्रापश्यत्स्थितान्पार्थः पितृनथ पितामहान् ।आचार्यान मातुलान्भ्रातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ॥ २६॥
श्वशुरान्सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्बन्धूनवस्थितान् ॥ २७॥
कृपया परयाऽऽविष्टो विषीदमब्रवीत् ।
कृपया परयाऽऽविष्टो विषीदमब्रवीत् ।
आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव श्रीकृष्णें रथु पेलिला ।दोही सैन्यांमाजीं केला । उभा तेणें ॥ १७४॥
जेथ भीष्मद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख ।पृथिवीपति आणिक । बहुत आहाती ॥ १७५॥
तेथ स्थिर करूनियां रथु । अर्जुन असे पाहातु ।तो दळभार समस्तु । संभ्रमेंसीं ॥ १७६॥
मग देवा म्हणे देख देख । हे गुरुगोत्र अशेख ।तंव कृष्णमनीं नावेक । विस्मो जाहला ॥ १७७॥
तो आपणयां आपण म्हणे । एथ कायी कवण जाणे ।हें मनीं धरलें येणें । परि कांहीं आश्चर्य असे ॥१७८॥
ऐसी पुढील से घेतु । तो सहजें जाणें हृदयस्थु ।परि उगा असे निवांतु । तिये वेळीं ॥ १७९ ॥
तंव तेथ पार्थु सकळ । पितृ पितामह केवळ ।गुरु बंधु मातुळ । देखता जाहला ॥ १८० ॥
इष्ट मित्र आपुले । कुमरजन देखिले ।हे सकळ असती आले । तयांमाजी ॥ १८१ ॥
सुहृज्जन सासरे । आणीकही सखे सोइरे ।कुमर पौत्र धर्नुर्धरें । देखिले तेथ ॥ १८२ ॥
जयां उपकार होते केले । कीं आपदीं जे रक्षिले ।हे असो वडील धाकुले । आदिकरूनि ॥ १८३ ॥
ऐसें गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळीं ।हे अर्जुनें तिये वेळीं । अवलोकिलें ॥ १८४ ॥
तेथ मनीं गजबज जाहली । आणि आपैसी कृपा आली ।तेणें अपमानें निघाली । वीरवृत्ति ॥ १८५ ॥
जिया उत्तम कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथी ।तिया आणिकीतें न साहती । सुतेजपणें ॥ १८६ ॥
नविये आवडीचेनि भरें । कामुक निजवनिता विसरे ।मग पाडेंवीण अनुसरे । भ्रमला जैसा ॥ १८७ ॥
कीं तपोबळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी ।मग तया विरक्तता सिद्धी । आठवेना ॥ १८८ ॥
तैसें अर्जुना तेथ जाहलें । असतें पुरुषत्व गेलें ।जे अंतःकरण दिधलें । कारुण्यासी ॥ १८९ ॥
देखा मंत्रज्ञु बरळु जाय । मग तेथ कां जैसा संचारु होय ।तैसा तो धनुर्धर महामोहें । आकळिला ॥ १९० ॥
म्हणौनि असतां धीरु गेला । हृदया द्रावो आला ।जैसा चंद्रकळीं शिवतला । सोमकांतु ॥ १९१ ॥
तयापरी पार्थु । अतिस्नेहें मोहितु ।मग सखेद असे बोलतु । श्रीअच्युतेसीं ॥ १९२ ॥

दृष्ट्वेमम् स्वजनं कृष्ण युयुत्सुम् समुपस्थितम् ॥ २८॥
दृष्ट्वेमम् स्वजनं कृष्ण युयुत्सुम् समुपस्थितम् ॥ २८॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ २९॥
गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते ।न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥ ३०॥
तो म्हणे अवधारी देवा । म्यां पाहिला हा मेळावा ।तंव गोत्र वर्गु आघवा । देखिला एथ ॥ १९३ ॥
हें संग्रामीं उदित । जहाले असती कीर समस्त ।पण आपणपेयां उचित । केवीं होय ॥ १९४ ॥
येणें नांवेचि नेणों कायी । मज आपणपें सर्वथा नाहीं ।मन बुद्धि ठायीं । स्थिर नोहे ॥ १९५ ॥
देखे देह कांपत । तोंड असे कोरडें होत ।विकळता उपजत । गात्रांसीही ॥ १९६ ॥
सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला ।तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ॥ १९७ ॥
तें न धरतचि निष्टलें । परि नेणेंचि हातोनि पडिलें ।ऐसें हृदय असे व्यापिलें । मोहें येणें ॥ १९८ ॥
जें वज्रापासोनि कठिण । दुर्धर अतिदारुण ।तयाहून असाधारण । हें स्नेह नवल ॥ १९९ ॥
जेणें संग्रामीं हरु जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला ।तो अर्जुन मोहें कवळिला । क्षणामाजीं ॥ २०० ॥
जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें ।परि कळिकेमाजी सांपडे । कोंवळिये ॥ २०१ ॥
तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परि तें कमळदळ चिरूं नेणें ।तैसें कठिण कोवळेपणें । स्नेह देखा ॥ २०२ ॥
हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाही नयेचि आया ।म्हणौनि भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ॥ २०३ ॥
अवधारी मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु ।विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥ २०४ ॥
कैसी नेणों सदयता । उपनली तेथें चित्ता ।मग म्हणे कृष्णा आतां । नसिजे एथ ॥ २०५ ॥
माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ ।जे वधावे हे सकळ । येणें नांवें ॥ २०६ ॥
सारांश - अध्याय 1 (गीता श्लोक १७ ते ३० / ज्ञानेश्वरी ओव्या १५१ ते २०६ )
मागच्या आठवड्यात आपण पाहिले की आधी भीष्मांनी आणि मग श्रीकृष्णाने व पांडवांनी शंख फुंकून युद्ध सुरु करण्याचा संकेत दिला.
या शंखांचा महाध्वनी असा होता कि ज्यामुळे त्रैलोक्य डळमळू लागले, आकाश कोसळून पडेल असे वाटू लागले, सूर्य भयाने थांबला, तिन्ही लोकांमध्ये हाहाकार उडाला. यामुळे कदाचित सृष्टीचा नाश होईल हे जाणून श्रीकृष्णाने तो अद्भुत शंखनाद बंद केला. तथापी शंखनादाचा प्रतिध्वनी घुमतच होता आणि त्यायोगानें कौरवसैन्याची दाणादाण उडाली. घाबरणाऱ्या सैन्याला धीर देण्यासाठी म्हणून कौरव सैन्यातील महारथी अधिक बळ सावरून पुढे सरसावले ज्यामुळे सैन्यामध्ये आवेश निर्माण झाला. हे सर्व पाहून अर्जुनाच्या मनात संतोष झाला; युद्धात सज्ज असलेले कौरव अर्जुनाने पाहिले आणि त्याच्यामध्ये क्षत्रिय धर्मानुसार वीरभाव निर्माण होऊन त्याने सहज आपले (गांडीव) धनुष्य उचलले.
तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला कि आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर. अधर्मी अशा दुर्योधनाला यश मिळावे या हेतूने जे योध्ये इथे आले आहेत त्यांना बघायची इच्छा अर्जुनाला झाली. मात्र श्रीकृष्णाने रथ जेव्हा दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेला तेव्हा आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रांना बघून अर्जुनाचे मन बावरून गेले आणि त्याच्या मनात करूणा उत्पन्न झाली व त्याचा वीरभाव निघून गेला. तपोबलाच्या सहाय्याने ऋद्धी-सिद्धी प्राप्त झाल्यामुळे वैराग्यशील मनुष्याच्या बुद्धीस भ्रम पडून त्याला वैराग्याचीच आठवण राहत नाही तसाच भ्रम अर्जुनालादेखील झाला. खेदयुक्त अंतःकरणाने अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, "माझी गात्रे शिथिल झाली आहेत, तोंडाला कोरड पडली आहे; मी इथे उभा राहण्यास समर्थ नाही. माझे मन भ्रमित झाले आहे". अर्जुनाची स्थिती कशी होती याविषयी ज्ञानेश्वर महाराज उपमा देतात : जसा भुंगा कठीण अशा लाकडाला भोक पाडू शकतो पण तोच भुंगा जेव्हा कमळामध्ये अडकतो तेव्हा त्याला भोक पाडण्याचे आठवत देखील नाही - तसाच आप्तस्वकियांचा कोमल असा मोह अर्जुनाला झाला. आणि त्यामुळे अर्जुनाचा युद्धाविषयीचा अभिमान पार गळून गेला.
No comments:
Post a Comment