अर्चना बोधे स्वाध्याय

 श्री परमात्मने नमः🌺🙏🏻

सगळ्या साधकांनी चौदाव्या अध्यायाचे स्वाध्याय अतिशय छान सोप्या शब्दात सांगितले आहेत.  तुम्हाला वंदन करून मी माझा स्वाध्याय मांडते.🙏🏻 

शाळेत शिक्षिका असल्यामुळे मुलांना काय activities द्यायच्या हे मनात विचार चालू असतात. त्याच वेळी समोर computer screen वर The three little pigs ची गोष्ट होती. ती गोष्ट अशी आहे. 

The three little pigs built three little houses .

The first 🐷built house of straw 🛖

The second 🐷built house of wood 🎪.

The third 🐷built house of brick🏡.

Then comes the big bad 🐺wolf, who puffed and blew the straw house down,  then he puffed even harder and blew the wood house down. The two pigs ran to the third 🐷brick house. The wolf tried to blow the brick house down but he failed.

ही गोष्ट सांगण्याचं कारण आपण ही आपल्या भोवती अशीच घरं बांधून घेतो. पहीली दोन घरं जी (तमो,रजो) गुणी थोड्याश्या वादळ, वारं आणि संकटात कोलमडून जातात. आणि आधार उरतो तो भक्कम दगड मातीच्या(सात्विक) घराचा. 

मग हे गुण माणसा मधे कसे,कधी  निर्माण होतात? वयाच्या तिसर्या-चौथ्या वर्षातच आपण मुलांना स्पर्धे मध्ये उतरण्याची तयारी सुरू करतो. जसं वय वाढतं तसा माणसाचा जगण्याचा संघर्ष सुरू होतो.आजूबाजूचं वातावरण, सामाजिक वळण ह्या मुळं mind trained होत जातं. मग जसं पेरू तसं ते रुजत जातं. 

शाळेत असताना छान मार्क मिळाले किंवा कुठलीही स्पर्धा जिंकली की सगळे कौतुक करतात, मग त्यात तामस- राजस गुण बळावत जातो आणि सतत  बक्षिसं मिळावी म्हणून प्रयत्न करत राहतो. त्याची त्यांना सवय होते. मग कधी मनासारखे नाही घडलं कि दुःखी, कष्टी होतात. काही वेळेस वाईट मार्गी लागतात.

जर इथे सात्विकतेचा मार्ग अवलंबला तर जिवन सुखी आणि आनंदी होऊ शकते. 

म्हणून स्पर्धा किंवा परिक्षा बंद करणं हा उपाय नव्हे. मग जग प्रगती कशी करेल? 

भगवंतांनी अर्जुनला युध्द अटळ आहे हा सल्ला दिला. 🙏🏻

आपल्या सामांन्यांसाठी आपली दैनंदिन क्रिया,स्पर्धा, परिक्षा हेचं आपलं युध्द समजुन जिवन  जगता आलं पाहिजे. ह्या  तिन्ही गुणांचा समतोल राखत आपल्या भूमिका पार पाडायच्या आहेत. 

आपल्या विचारांना  वळण लावणं आपल्या हातात आहे. आपण कुठली पुस्तके वाचतो,कुणाच्या संगतीत वावरतो हे कळणं फार गरजेचं आहे. 

धन्यवाद 🙏🏻

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099