अध्याय ७: ओव्या २९-३२

९ डिसेंबर २०१८ निरुपण 
अध्याय ७: ज्ञानविज्ञानयोग (गीता श्लोक ७/ ज्ञानेश्वरी ओव्या २९-३२)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


मत्तः परतरं नान्यत्किंचिदस्ति धनंजय । मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ ७॥

हें रोहिणीचें जळ । तयाचें पाहतां येइजे मूळ । तैं रश्मि नव्हती केवळ । होय तें भानु ॥ २९ ॥
तयाचिपरी किरीटी । इया प्रकृती जालिये सृष्टी । जैं उपसंहरूनि कीजेल ठी । तैं मीचि आहें ॥ ३० ॥
ऐसें होय दिसे न दिसे । हें मजचि माजीं असे । मियां विश्व धरिजे जैसें । सूत्रें मणि ॥ ३१ ॥
सुवर्णाचे मणी केले । ते सोनियाचे सुतीं वोविले । तैसें म्यां जग धरिलें । सबाह्याभ्यंतरीं ॥ ३२ ॥



उपनिषदातील पंचीकरण हा भाग ह्या तक्त्यावरून आणि विवरण ऐकून समजून घेता येईल.
पंचीकरण म्हणजे सूक्ष्मापासून स्थुलाची निर्मिती कशी झाली? सृष्टीची निर्मिती कशी झाली? हे समजावून सांगते.

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099