२३ सप्टेंबर २०१८ निरुपण
अध्याय ६: ध्यानयोग (गीता श्लोक १५ / ज्ञानेश्वरी ओव्या २९३-३४४)
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः । शान्ति निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥ १५॥
ऐकें शक्तीचें तेज जेव्हां लोपे । तेथ देहाचें रूप हारपे । मग तो डोळ्यांमाजीं लपे । जगाचिया ॥ २९३ ॥
एर्हवीं आधिलाचि ऐसें । सावयव तरी दिसे । परी वायूचें कां जैसें । वळिलें होय ॥ २९४ ॥
नातरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनी उभा । कां अवयवचि नभा । उदयला तो ॥ २९५ ॥
तैसें होय शरीर । तैं तें म्हणिजे खेचर । हें पद होतां चमत्कार । पिंडजनीं ॥ २९६ ॥
देखें साधकु निघोनि जाये । मागां पाउलांची वोळ राहे । तेथ ठायीं ठायीं होये । अणिमादिक ॥ २९७ ॥
परि तेणें काय काज आपणयां । अवधारीं ऐसा धनंजया । लोप आथी भूतत्रया । देहींचा देहीं ॥ २९८ ॥
पृथ्वीतें आप विरवी । आपातें तेज जिरवी । तेजातें पवनु हरवी । हृदयामाजीं ॥ २९९ ॥
पाठीं आपण एकला उरे । परि शरीराचेनि अनुकारें । मग तोही निगे अंतरें । गगना मिळे ॥ ३०० ॥
ते वेळीं कुंडलिनी हे भाष जाये । मग मारुती ऐसें नाम होये । परि शक्तिपण तें आहे । जंव न मिळे शिवीं ॥ ३०१ ॥
मग जालंधर सांडी । ककारांत फोडी । गगनाचिये पाहाडीं । पैठी होय ॥ ३०२ ॥
ते ॐ काराचिये पाठी । पाय देत उठाउठी । पश्यंतीचिये पाउटी । मागां घाली ॥ ३०३ ॥
पुढां तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाच्या अंतरीं । भरती गमे सागरीं । सरिता जेवीं ॥ ३०४ ॥
मग ब्रह्मरंध्रीं स्थिरावोनी । सोऽहंभावाच्या बाह्या पसरुनी । परमात्मलिंगा धांवोनी । आंगा घडे ॥ ३०५ ॥
तंव महाभूतांची जवनिका फिटे । मग दोहींसि होय झटें । तेथ गगनासकट आटे । समरसीं तिये ॥ ३०६ ॥
पैं मेघाचेनि मुखीं निवडिला । समुद्र कां वोघीं पडिला । तो मागुता जैसा आला । आपणपयां ॥ ३०७ ॥
तेवीं पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे । तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा ॥ ३०८ ॥
आतां दुजें हन होतें । कीं एकचि हें आइतें । ऐशिये विवंचनेपुरतें । उरेचिना ॥ ३०९ ॥
गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे । तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ॥ ३१० ॥
म्हणौनि तेथिंची मातु । न चढेचि बोलाचा हातु । जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ॥ ३११ ॥
अर्जुना एर्हवीं तरी । इया अभिप्रायाचा जे गर्व धरी । ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली ॥ ३१२ ॥
भ्रूलता मागिलीकडे । तेथ मकाराचेंचि आंग न मांडे । सडेया प्राणा सांकडें । गगना येतां ॥ ३१३ ॥
पाठीं तेथेंचि तो भेसळला । तैं शब्दाचा दिवो मावळला । मग तयाहि वरी आटु भविन्नला । आकाशाचा ॥ ३१४ ॥
आतां महाशून्याचिया डोहीं । जेथ गगनसीचि थावो नाहीं । तेथ तागा लागेल काई । बोलाचा इया ? ॥ ३१५ ॥
म्हणौनि आखरामाजीं सांपडे । कीं कानवरी जोडे । हे तैसें नव्हे फुडें । त्रिशुद्धी गा ॥ ३१६ ॥
जें कहीं दैवें । अनुभविलें फावे । तैं आपणचि हें ठाकावें । होऊनियां ॥ ३१७ ॥
पुढती जाणणें तें नाहींचि । म्हणौनि असो किती हेंचि । बोलावें आतां वायांचि । धनुर्धरा ॥ ३१८ ॥
ऐसें शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे । वाराही जेथ न शिरे । विचाराचा ॥ ३१९ ॥
जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य । अनादि जें अगण्य । परमतत्त्व ॥ ३२० ॥
जें विश्वाचें मूळ । जें योगद्रुमाचें फळ । जें आनंदाचें केवळ । चैतन्य गा ॥ ३२१ ॥
जें आकाराचा प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु । जेथ आदि आणि अंतु । विरोनी गेले ॥ ३२२ ॥
जें महाभूतांचें बीज । जें महातेजाचें तेज । एवं पार्था जें निज- । स्वरूप माझें ॥ ३२३ ॥
ते हे चतुर्भुज कोंभेली । जयाची शोभा रूपा आली । देखोनि नास्तिकीं नोकिलीं । भक्तवृंदें ॥ ३२४ ॥
तें अनिर्वाच्य महासुख । पैं आपणचि जाहले जे पुरुष । जयांचे कां निष्कर्ष । प्राप्तिवेरीं ॥ ३२५ ॥
आम्हीं साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीरीं जिहीं केलें । ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया ॥ ३२६ ॥
परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसें । वोतींव जाहले तैसे । दिसती आंगें ॥ ३२७ ॥
जरी हे प्रतीति हन अंतरीं फांके । तरी विश्वचि हें अवघें झांके । तंव अर्जुन म्हणे निकें । साचचि जी हें ॥ ३२८ ॥
कां जें आपण आतां देवो । हा बोलिले जो उपावो । तो प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे ॥ ३२९ ॥
इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरंवसेनि ब्रह्मत्वा येती । हें सांगतियाची रीती । कळलें मज ॥ ३३० ॥
देवा गोठीचि हे ऐकतां । बोधु उपजतसे चित्ता । मा अनुभवें तल्लीनता । नोहेल केवीं ? ॥ ३३१ ॥
म्हणौनि एथ कांहीं । अनारिसें नाहीं । परी नावभरी चित्त देईं । बोला एका ॥ ३३२ ॥
आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु । परि न शकें करूं पांगु । योग्यतेचा ॥ ३३३ ॥
सहजें आंगिक जेतुलें आहे । तेतुलियाची जरी सिद्धि जाये । तरी हाचि मार्गु सुखोपायें । अभ्यासीन ॥ ३३४ ॥
नातरी देवो जैसें सांगतील । तैसें आपणपें जरी न ठकेल । तरी योग्यतेवीण होईल । तेंचि पुसों ॥ ३३५ ॥
जीवींचिये ऐसी धारण । म्हणोनि पुसावया जाहलें कारण । मग म्हणे तरी आपण । चित्त देइजो ॥ ३३६ ॥
हां हो जी अवधारिलें । जें हें साधन तुम्हीं निरूपिलें । तें आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके ? ॥ ३३७ ॥
कीं योग्यतेवीण नाहीं । ऐसें हन आहे कांहीं । तेथ श्रीकृष्ण म्हणती काई । धनुर्धरा ॥ ३३८ ॥
हें काज कीर निर्वाण । परि आणिकही जें कांहीं साधारण । तेंही अधिकाराचे वोडवेविण । काय सिद्धि जाय ? ॥ ३३९ ॥
पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीची अधीन जाणिजे । कां जे योग्य होऊनि कीजे । तें आरंभिलें फळें ॥ ३४० ॥
तरी तैसी एथ कांहीं । सावियाचि केणी नाहीं । आणि योग्यतेची काई । खाणी असे ? ॥ ३४१ ॥
नावेक विरक्तु । जाहला देहधर्मीं नियतु । तरि तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया ? ॥ ३४२ ॥
येतुलालिये आयणीमाजिवडें । योग्यपण तूतेंही जोडे । ऐसें प्रसंगें सांकडें । फेडिलें तयाचें ॥ ३४३ ॥
मग म्हणे पार्था । ते हे ऐसी व्यवस्था । अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ॥ ३४४ ॥

No comments:
Post a Comment