अध्याय १६ : ओव्या ११ - २०

 १४  मार्च २०२१ निरुपण 

अध्याय १६ । दैवासुरसंपत्तिविभागयोगः । ज्ञानेश्वरी ओव्या ११-२० )


ते वेळीं विश्वस्वप्नासहितें । कोण अन्यथामती निद्रेतें । सांभाळी नुरेचि जेथें । मायाराती ॥ ११ ॥
म्हणौनि अद्वयबोधपाटणीं । तेथ महानंदाची दाटणी । मग सुखानुभूतीचीं घेणीं देणीं । मंदावो लागती ॥ १२ ॥
किंबहुना ऐसैसें । मुक्तकैवल्य सुदिवसें । सदा लाहिजे कां प्रकाशें । जयाचेनि ॥ १३ ॥
जो निजधामव्योमींचा रावो । उदैलाचि उदैजतखेंवो । फेडी पूर्वादि दिशांसि ठावो । उदोअस्तूचा ॥ १४ ॥
न दिसणें दिसणेंनसीं मावळवी । दोहीं झांकिलें ते सैंघ पालवी । काय बहु बोलों ते आघवी । उखाचि आनी ॥ १५ ॥
तो अहोरात्रांचा पैलकडु । कोणें देखावा ज्ञानमार्तंडु । जो प्रकाश्येंवीण सुरवाडु । प्रकाशाचा ॥ १६ ॥
तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती । आतां नमों म्हणों पुढतपुढती । जे बाधका येइजतसे स्तुती । बोलाचिया ॥ १७ ॥
देवाचें महिमान पाहोनियां । स्तुति तरी येइजे चांगावया । जरी स्तव्यबुद्धीसीं लया । जाईजे कां ॥ १८ ॥
जो सर्वनेणिवां जाणिजे । मौनाचिया मिठीया वानिजे । कांहींच न होनि आणिजे । आपणपयां जो ॥ १९ ॥
तया तुझिया उद्देशासाठीं । पश्यंती मध्यमा पोटीं । सूनि परेसींही पाठीं । वैखरी विरे ॥ २० ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099