८ जुलै २०१७ निरुपण
अध्याय २: सांख्ययोग (गीता श्लोक ५४- ६०/ ज्ञानेश्वरी ओव्या २८५-३१४ )
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् । नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५७॥
सारांश:
अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला आहे, स्थितप्रज्ञ कोण आहे? कसा दिसतो, वागतो? असे मला पण आचरण करता येईल. भगवंत प्रश्नाचे उत्तर सरळ न देता फिरवून देतात. गीता का वाचावी, ज्ञानेश्वरी का वाचावी याचे उत्तर स्थितप्रज्ञ पुरुष यामध्ये दिले आहे. स्थितप्रज्ञ पुरुष फक्त ज्ञानेश्वरी मध्येच आला आहे, बाकी कोणत्याही ठिकाणी याचा उल्लेख आलेला नाही. हा अतिशय महत्वाचा श्लोक आहे. आपण पूजाअर्चा, जप सगळे करतो, गुरु होतो, शेवटी कुठे जायचे, याचे उत्तर स्थितप्रज्ञ ह्या शब्दामध्ये मिळते.
अर्जुन उवाच ।
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव । स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥ ५४॥
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव । स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥ ५४॥
तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा । मी पुसेन आतां सांगावा । कृपानिधी ॥ २८५ ॥
मग अच्युत म्हणे सुखें । जें किरीटी तुज निकें । तें पूस पां उन्मेखें । मनाचेनि ॥ २८६ ॥
या बोला पार्थें । म्हणितलें सांग पां श्रीकृष्णातें । काय म्हणिपें स्थितप्रज्ञातें । वोळखों केवीं ॥ २८७ ॥
आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसिया चिन्हीं जाणिजे । जो समाधिसुख भुंजे । अखंडित ॥ २८८ ॥
तो कवणें स्थिती असे । कैसेनि रूपीं विलसे । देवा सांगावें हें ऐसें । लक्ष्मीपती ॥ २८९ ॥
तंव परब्रह्म अवतरणु । जो षडगुणाधिकरणु । तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ॥ २९० ॥
श्रीभगवानुवाच ।
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् । आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ ५५॥

म्हणे अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं । तो अंतराय स्वसुखेंसीं । करीतु असे ॥ २९१ ॥
जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरण भरितु । परी विषयामाजीं पतितु । जेणें संगें कीजे ॥ २९२ ॥
तो कामु सर्वथा जाये । जयाचें आत्मतोषीं मन राहे । तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणैं ॥ २९३ ॥
जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरण भरितु । परी विषयामाजीं पतितु । जेणें संगें कीजे ॥ २९२ ॥
तो कामु सर्वथा जाये । जयाचें आत्मतोषीं मन राहे । तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणैं ॥ २९३ ॥
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ ५६॥
नाना दुःखीं प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं । आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना ॥ २९४ ॥
अर्जुना तयाच्या ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं । आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्णु तो ॥ २९५ ॥
ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि । जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ॥ २९६ ॥
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् । नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५७॥
जो सर्वत्र सदा सरिसा । परिपूर्णु चंद्रु कां जैसा । अधमोत्तम प्रकाशा- । माजीं न म्हणे ॥ २९७ ॥
ऐसी अनवच्छिन्न समता । भूतमात्रीं सदयता । आणि पालटु नाहीं चित्ता । कवणें वेळे ॥ २९८ ॥
गोमटें कांहीं पावे । तरी संतोषें तेणें नाभिभवे । जो वोखटेनि नागवे । विषादासी ॥ २९९ ॥
ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु । तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥ ३०० ॥

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः । इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५८॥
कां कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी ।ना तरी इच्छावशें आवरी । आपुले आपण ॥ ३०१ ॥
तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिति । पातली असे ॥ ३०२ ॥
तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिति । पातली असे ॥ ३०२ ॥
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः । रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ ५९॥
यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः । इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ ६०॥
येर्हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना । जे राहटताती जतना । निरंतर ॥ ३१० ॥
जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी । जे मनातें सदा मुठी । धरूनि आहाती ॥ ३११ ॥
तेही किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी । जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ॥ ३१२ ॥
देखैं विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धिचेनि मिषें । मग आकळिती स्पर्शें । इंद्रियांचेनि ॥ ३१३ ॥
तिये संधीं मन जाये । मग अभ्यासीं ठोठावलें ठाये । ऐसें बळकटपण आहे । इंद्रियांचें ॥ ३१४ ॥
अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला आहे, स्थितप्रज्ञ कोण आहे? कसा दिसतो, वागतो? असे मला पण आचरण करता येईल. भगवंत प्रश्नाचे उत्तर सरळ न देता फिरवून देतात. गीता का वाचावी, ज्ञानेश्वरी का वाचावी याचे उत्तर स्थितप्रज्ञ पुरुष यामध्ये दिले आहे. स्थितप्रज्ञ पुरुष फक्त ज्ञानेश्वरी मध्येच आला आहे, बाकी कोणत्याही ठिकाणी याचा उल्लेख आलेला नाही. हा अतिशय महत्वाचा श्लोक आहे. आपण पूजाअर्चा, जप सगळे करतो, गुरु होतो, शेवटी कुठे जायचे, याचे उत्तर स्थितप्रज्ञ ह्या शब्दामध्ये मिळते.
स्थितप्रज्ञ पुरुष म्हणजे उत्तम पुरुष, थोर पुरुष, सिद्ध पुरुष, जीवन मुक्त पुरुष. त्या ठिकाणी साधना संपते. साधकाचा सिद्ध पुरुष होतो. आपल्याला जे प्रश्न पडले आहेत तेच बरोबर अर्जुनाला पडलेले आहेत. भगवंत म्हणतात, " ज्यावेळी पुरुष मनातील सर्व कामना टाकून देतो, आत्म्याने आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्याला स्थितप्रज्ञ म्हणले जाते". माउलींनी एका वाक्यात सांगितले आहे, जो माणूस आपल्या आतच आनंदी आहे, त्याला स्थितप्रज्ञ म्हणले जाते. ज्याच्या सर्व कामना , सर्व इच्छा, संकल्प मनातून गेले आहेत, तो स्थितप्रज्ञ होण्यासाठी तयार आहे, असे म्हटले आहे.
आपण सगळे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आनंदासाठी काम करत असतो. कोणताही माणूस दुःखासाठी काम करत नाही. मला आतून आनंद पाहिजे म्हणून काम करत असतो, आनंद हा माझा स्वभाव आहे. आनंद नेहमी विषयामध्ये, दुसऱ्यामध्ये शोधत असतो.माझा आनंद मी दुसऱ्यावर अवलंबीवला आहे. हा आनंद आहे तो शाश्वत नाही. अशाश्वत आनंद पाहिजे असेल तर, जो कधीही संपणार नाही, जो दुसऱ्याकडे जाता कामा नये, तो आनंद कोठे आहे असा प्रश्न निर्माण होतो, तो आनंद कस्तुरीमृगासारखा आहे. तो आपल्या आतमध्ये आहे. घाण्याला जुंपलेला बैल असतो, त्याला समोर गाजर दाखवले जाते, त्यामागे तो पळतो, तशी आपली अवस्था आहे. लहानपणापासून वृद्धापकाळापर्यंत अशीच अवस्था आहे. असेच आपले रहाटगाडगे चालू आहे. याचा जरा विचार कर आणि थांब जरा. खरा आनंद कोठे आहे, मी म्हणजेच सच्चिदानंद आहे, मी हे सगळे जग, सृष्टी, प्राणी निर्माण करून वैकुंठात नाही, मी माझ्या भक्ताच्या हृदयात आहे. म्हणजे मीच तो आनंद आहे. तो आत आहे तर मला का दिसत नाही. माझी अवस्था अंधारात चाचपडत चालल्यासारखी आहे. सुख हे माझे मलाच शोधले पाहिजे.
अंतरमुख होऊ त्यावेळी आम्हाला कळेल "मी कोण आहे". आणि मग हे जर जायचे असेल तर आमच्या कामना सगळ्या गळून पडल्या पाहिजेत. पण पडत नाहीत हा अनुभव आहे. कुठलीही सवय आपल्याला लागते व आपण त्या सवयीचा गुलाम बनतो. ठराविक वयानंतर कळतं पण वळत नाही. विषासारखा विषय आहे. पहिल्यांदा विषय आपल्याला पकडतात व नंतर आपण विषयांना पकडतो. आज मला पैसा, हुद्दा, घर या गोष्टींची किंमत वाटते, तोपर्यंत त्या तुम्हाला सोडता येणे शक्य नाही. उदाहरणार्थ :- गोट्या.
लोकेच्छा , पुत्र्येच्छा आणि वितेच्छा या तीन इच्छा माणसामध्ये आजन्म आहेत. ज्या वेळी मला कळेल पैसा अडका, सत्ता या सगळ्यापेक्षा जास्त काहीतरी आहे, ज्यावेळी मनाला पटेल, त्यावेळी सगळे गळून पडेल. आपण त्याला अवास्तव महत्व देतो व त्याबद्दल आसक्ती निर्माण होते. आयुष्य त्रासदायक होण्यसाठी या गोष्टी गरजेच्या आहेत पण ठराविक मर्यादेपर्यंत. तुकाराम महाराज म्हणतात, आता मला काही नको, पण मला फक्त तू पाहिजे, परमेश्वर पाहिजे. तो शाश्वत आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण साधना संपेल, साधकाचा सिद्ध पुरुष होईल. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे.
देव हा आमच्या नामदेवांनी, तुकारामांनी, ज्ञानेश्वरांनी पाहिला आहे. हे आम्हाला पक्के माहित आहे. त्यांना दिसत असेल तर मला पण मिळेलच हे जेव्हा पटेल तेव्हा काम संपेल. श्रद्धा, विश्वास निर्माण होईल. कोणतीही गोष्ट करण्यासाठी प्रयत्न पाहिजेत. माझ्यावरतीही एक शक्ती आहे, ती मला चालवते, असा मला जेव्हा विश्वास बसेल, त्यावेळी या सगळ्या गोष्टी गळून पडतील.शंकराचार्य म्हणतात, आज मला विषयांची एकच बाजू दिसतेय. वाईट बाजू दिसत नाही, चांगलीच बाजू दिसत आहे. केळ्याच्या खुंटासारखे आहे, खुंट अवजड आहे, गुबगुबीत आहे, चकचकीत आहे. मला वाटते अजून एक साल काढले तर मला काही चांगले मिळेल, असे करत शेवटी हाती काहीच लागत नाही. शेवटी सगळे फोलकटच आले.
दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखाच्या प्राप्ती विषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, ज्याचे भीती, भय, क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हणीला जातो. इतर प्राण्यांत आणि मनुष्यामध्ये बुद्धीचा फरक आहे, सगळा भर बुद्धीवर आहे. चंद्राचे उदाहरण दिले आहे. पौर्णिमेचा चंद्र म्हणत नाही हा चांगला आहे तो वाईट आहे, याला प्रकाश देणार याला देणार नाही. तो सगळ्यांना प्रकाश देतो. समबुद्धीमुळे चिंता कधी चंचल होत नाही. कासवाचे उदाहरण दिले आहे. कासव हातपाय पसरून बसते, धोका दिसेल त्यावेळी ते आपले इंद्रिय सावरून घेते. त्यामुळे त्याला कोणी मारू शकत नाही. स्थितप्रज्ञ पुरुषाची आसक्तीही नाहीशी होते. आपल्यामध्ये बदल झाला आहे असे दिसते, आपली इंद्रिये थोड्याफार प्रमाणात ताब्यात अली आहेत असे दिसते, पण याचा अर्थ असा नव्हे कि आपण पूर्ण विजय मिळविला आहे. वरून शांत वाटले तरी आतील वासना, संस्कार, प्रारब्ध संचित जात नाहीत. पालवी खुडली तरी काळीभोर जमीन दिसली कि आतील सुप्त संस्कार उफाळून वरती येतात. उदाहरणार्थ: काँग्रेस गवत.
ज्ञानाची प्रचिती येते तेव्हा संचित संपते. त्यावेळी सिद्धपुरुष होतो. शब्द, गंध, स्पर्श, रस, रूप पाचही इंद्रिये माणसामध्ये प्रबळ आहेत ती जातच नाहीत. इंद्रियांनी माणसाला पकडून ठेवले आहे. हरिणीला पकडायचे असेल तर नादाला भुलवून पकडले जाते. हत्तींमध्ये स्पर्श इंद्रिये प्रबळ आहेत. हत्तीला पकडण्यासाठी हत्तीणीला खड्यात सोडले जाते व हत्तीला पकडले जाते. पतंग झेप घेतो दिव्याकडे व तो आगीत जाळून जातो. माश्याला पकडायचे असेल तर गळाला लावतो व मासा अडकतो. भुंगा हा गंधाच्या मागे जातो व फुलामध्ये अडकून मरून जातो. हडळ मांत्रिकाला चकवते तसे आहे, तसे साधकही इंद्रियापुढे दिन होतात, परत त्यातच अडकून पडतो.
No comments:
Post a Comment