१० फेब्रुवारी २०१९ निरुपण
अध्याय ८ : अक्षरब्रह्मयोगः (गीता श्लोक ४ / ज्ञानेश्वरी ओव्या २१-५८)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् । अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥ ४॥
आतां अधिभूत जें म्हणिपे । तेंहि सांगों संक्षेपें । तरी होय आणि हारपे । अभ्र जैसें ॥ ३० ॥
तैसें असतेपण आहाच । नाहीं होईजे हें साच । जयातें रूपा आणिती पांचपांच । मिळोनियां ॥ ३१ ॥
भूतांतें अधिकरूनि असे । आणि भूतसंयोगें तरी दिसे । जें वियोगवेळे भ्रंशें । नामरूपादिक ॥ ३२ ॥
तयातें अधिभूत म्हणिजे । मग अधिदैव पुरुष जाणिजे । जेणें प्रकृतीचें भोगिजे । उपार्जिलें ॥ ३३ ॥
जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशींचा अध्यक्षु । जो देहास्तमानीं वृक्षु । संकल्प विहंगमाचा ॥ ३४ ॥
जो परमात्माचि परी दुसरा । जो अहंकारनिद्रा निदसुरा । म्हणौनि स्वप्नीचिया वोरबारा । संतोषें शिणे ॥ ३५ ॥
जीव येणें नांवें । जयातें आळविजे स्वभावें । तें अधिदैवत जाणावें । पंचायतनींचें ॥ ३६ ॥
आतां इयेचि शरीरग्रामीं । जो शरीरभावातें उपशमी । तो अधियज्ञु एथ गा मी । पंडुकुमरा ॥ ३७ ॥
येर अधिदैवाधिभूत । तेहि मीचि कीर समस्त । परि पंधरें किडाळा मिळत । तें काय सांके नोहे ?॥ ३८ ॥
तरि तें पंधरेपण न मैळे । आणि किडाळाचियाही अंशा न मिळे । परि जंव असे तयाचेनि मेळें । तंव सांकेंचि म्हणिजे ॥ ३९ ॥
तैसें अधिभूतादि आघवें । हें अविद्येचेनि पालवें । झांकलें तंव मानावें । वेगळें ऐसें ॥ ४० ॥
तेचि अविद्येची जवनिका फिटे । आणि भेदभावाची अवधी तुटे । मग म्हणों एक होऊनि जरी आटे । तरी काय दोनी होती ? ॥ ४१ ॥
पैं केशांचा गुंडाळा । वरि ठेविली स्फटिकशिळा । ते वरि पाहिजे डोळां । तंव भेदली गमती ॥ ४२ ॥
पाठीं केश परौते नेले । आणि भेदलेपण काय नेणों जाहालें । तरी डांक देऊनि सांदिलें । शिळेतें काई ? ॥ ४३ ॥
ना ते अखंडचि आयती । परि संगें भिन्न गमली होती । ते सारिलिया मागौती । जैसी कां तैसी ॥ ४४ ॥
तेवींचि अहंभावो जाये । तरी ऐक्य तें आधींचि आहे । हेंचि साचें जेथ होये । तो अधुयज्ञु मी ॥ ४५ ॥
पैं गा आम्हीं तुज । सकळ यज्ञ कर्मज । सांगितलें कां जें काज । मनीं धरूनि ॥ ४६ ॥
तो हा सकळ जीवांचा विसांवा । नैष्कर्म्य सुखाचा ठेवा । परि उघड करूनि पांडवा । दाविजत असे ॥ ४७ ॥
पहिलिया वैराग्यैंधन परिपूर्तीं । इंद्रियानळीं प्रदीप्तीं । विषयद्रव्याचिया आहुती । देऊनियां ॥ ४८ ॥
मग वज्रासन तेचि उर्वी । शोधूनि आधारमुद्रा बरवी । वेदिका रचे मांडवीं । शरीराच्या ॥ ४९ ॥
तेथ संयमाग्नीचीं कुंडें । इंद्रियद्रव्याचेनि पवाडें । यजिजती उदंडें । युक्तिघोषें ॥ ५० ॥
मग मनप्राणसंयमु । हाचि हवनसंपदेचा संभ्रमु । येणें संतोषविजे निर्धूमु । ज्ञानानळु ॥ ५१ ॥
ऐसेनि हें सकळ ज्ञानीं समर्पें । मग ज्ञान तें ज्ञेयीं हारपे । पाठी ज्ञेयचि स्वरूपें । निखिल उरे ॥ ५२ ॥
तया नांव गा अधियज्ञु । ऐसें बोलिला जंव सर्वज्ञु । तंव अर्जुन अतिप्राज्ञु । तया पातलें तें ॥ ५३ ॥
हें जाणोनि म्हणितलें देवें । पार्था परिसतु आहासि बरवें । या कृष्णाचिया बोलासवें । येरु सुखाचा जाहला ॥ ५४ ॥
देखा बालकाचिया धणि धाइजे । कां शिष्याचेनि जाहलेपणें होइजे । हें सद्गुरूचि एकलेनि जाणिजे । कां प्रसवतिया ॥ ५५ ॥
म्हणौनि सात्त्विक भावांची मांदी । कृष्णाआंगीं अर्जुनाआधीं । न समातसे परी बुद्धी । सांवरूनि देवें ॥ ५६ ॥
मग पिकलिया सुखाचा परिमळु । कीं निवालिया अमृताचा कल्लोळु । तैसा कोंवळा आणि सरळु । बोलु बोलिला ॥ ५७ ॥
म्हणे परिसणेयांचिया राया । आइकें बापा धनंजया । ऐसी जळों सरलिया माया । तेथ जाळितें तेंही जळे ॥ ५८ ॥

No comments:
Post a Comment